*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*
*भाग.. १६*
महाराज सोता काम करु लागामुये दिवाण ना संगे तेस्ना मतभेद व्हवाले लागीग्यात. पयला संस्थानिकस्ना बद्दल सर टी माधवराव येस्न मत अनुकूल नही व्हत. पण महाजस्ना तेस्ले न्यारा आनुभव उन्हात. तेस्नी तल्लख बुध्दी मुये, नी तेस्ले मियेल सिक्सन मुये तेस्नी प्रगती प्रमाण ना बाहेर व्हयेल व्हती. त्यामुये एखादा वादग्रस्त प्रश्नावर चर्चा व्हये तव्हय दोन्हीस्ना मजार मतस्न समर्थन करण आवघड व्हये. तेन्हामुये दोन्हीस्ना मजार मतभेद तीव्र व्हयी ग्यात. सर टी माधवराव येस्ना बद्दल महाराजस्ना मन मजार आजिबात आदर राहेल नही व्हता. कारण बी तस व्हत, इंग्रज सरकार ना संगे करेल करार मजार इंग्रजस्ले झुकत माप सर टी माधवराव येस्नी देल व्हत. ते महाराजस्ले पसंत पडन नही. सर टी माधवराव येस्नी इंग्रजधार्जिना भुमिका मुये, केसरी पेपर मजार अग्रलेख लिखीसन लोकमान्य टीळक येस्नी कडक टीका करेल व्हती.
दिवाण आणि महाराज येस्ना वाद न एक उदाहरण देवा सारख शे, १८८२ साल ले पथाजी लालाजी नावना एक माणुस्नी डुंगरशी नावना एक पोय्राना आंगवरना डागिना चोरीसन तेल्हे मारी टाकेल व्हत. खानला कोर्ट नी तेल्हे फाशीनी शिक्षा सुनाडेल व्हती, पण तेन्ही वरला कोर्टमजार अपिल कर नी तेन्ही फाशी रद्द व्हयनी, नी तेल्हे जन्मठेप नी शिक्षा दिन्ही. तव्हय तेन्ही मंजुरी करता हायी काम दिवाण कडे उन्ह, तव्हय तेस्नी वरला कोर्ट नी देल शिक्षा कायम करा करता आप्ला अभिप्राय दिन्हा. पण ते महाराजस्ले पटन नही, नी तेस्नी असा हुकूम करा की, "कागद पत्र दखता आरोपी नी खुन करेल शे, तेन्हामुये जन्मठेप हायी शिक्षा तेल्हे कमी शे, तेन्हामुये खालना कोर्ट नी देल फाशी नी शिक्षाच उचीत शे" ह्या गोटवर दिवाण सर टी माधवराव, नी महाराज येस्ना मतभेद झायात, तसा दिवाण धूर्त, नी चतुर व्हता, तेस्नी दखी लिन्ह मव्हरे आप्ली दाय शिजाव नही, म्हनीसन तेस्नी दिवाण पद ना राजीनामा दिन्हा. महाराजस्नी तो मंजूर करा.
सर टी माधवराव येस्ना जागावर काजी शहाबुद्दीन येस्नी दिवाण म्हनीसन नेमणूक करी. त्या सावंतवाडी संस्थान ना रहिवासी व्हतात. त्या कायना महाराष्ट्र मजारला नेता लोकहितवादी, न्या रानडे, नी मामा परमानंद येस्ना संगे तेस्ना गयरा सलोखाना संबंध व्हतात. बडोदा मजार त्या पयले रेव्हेन्यू खाताना मंत्री व्हतात. तेस्न चांगल काम मुयेच तेस्ले दिवाण पदवर बढती मियनी. सर टी माधवराव बडोदा सोडीसन चालना ग्यात, महाजस्नी तेस्ना मन मा तेस्ना बद्दल नी जी आढी व्हती ती काढी टाकी. नी तेस्ना संगे पत्रव्यवहार चालु ठेवा. सरकारी कामकाजना आधिकारी, कर्मचारी येस्ना बद्दल नी आढी महाराज कायम मन मजार नही ठेत. कोणा बदल बी जर रागलोभ झाया ते इसरन थोडस कठीण ह्रास, मव्हरे संबंध ठेवण बी कठीण व्हत, पण महाराज येस्नी ते कसब विचारस्नी, आत्मसंयमनी साध्य करेल व्हत, तसच सर टी माधवराव येस्नी बी महाराजस्ना बद्दल, पिरीम, स्नेह कायम टीकाळी ठेल व्हत. बडोदाले एक काॅलेज ना समारंभना येले, भाषण कराना ओघ मजार, टी माधवराव येस्ना बद्दल बोलनात "त्या येले मन्हा शेजारले दिवाण, नी विश्वासु मित्र सर टी माधवराव ह्या उभा व्हतात. मन्हा जीवन मजार माल्हे ज्या रस्ताले जाण व्हत, त्या रस्ता तेस्नी मन्ह्या वाटचाली करता नामी करी ठेल व्हत्यात. तेस्ना चेहरावरन मुत्सद्दीपणा न तेज नजरमा भरा शिवाय ह्राहे नही. तेस्नी त्या मोजका पाऊल टाकानी पद्धत, पल्लेदार आंगरखा, मद्रासी धोतर, तांबडेलाल ब्राह्मणशाही जुत्ता, मोगलाई पागोट, धव्यपरब जरीकाठन उपरन, नी कानमजारला हिरास्ना कुंडल, नी बोटस मजार हिरास्नी आंगठी, हाउ तेस्ना दरबारी थाट नी गव्हायी व्हती. "
ब्रिटिश राज्यकारभार समजी लिसन तेस्न्या आदर्श सुधारणा बडोदा राज्य मजार कश्या आणता येतीन, म्हनीसन त्या काही दिन आमदाबादले ह्रायन्हात. तठला शैक्षणिक, औद्योगिक, नी सार्वजनिक स्थळ दखात. नजर मजार येल गोष्टी टाचण करीसन उतारी लिन्ह्यात, नी ह्या गोष्टी आप्ला राज्या मजार कश्या राबवता येतीन, येन्हा इचार पक्का करा. आसा टाचण लिखी काढानी सवय तेस्ले पयले पासुन लायी धरी. तेस्ना आभ्यास ना टेबलवर, जेवाना टेबलवर, झोपान जागावर कोरा कागद, नी दोरा वरी पेन बांधेल ह्राहे. दौरावर ह्रायन्हात म्हणजे हायी पद्धत कायजी करीसन पायेत. आमदाबादना ना दौरा व्हवावर, त्या दोन तीन महिनामजार कलकत्ता ना दौरावर ग्यात. तठे तेस्नी सययर नी रचना दखी, कारखानास्न निरीक्षण कय, तठला कामगारस्नी आर्थिक परिस्थिती, आणि तेस्ना कौसल्यानी माहिती करी लिन्ही, कलकत्ताथाईन वापस उन्हात तव्हय ग्वाल्हेरना जयाजीराव महाराज येस्ना मानपान करीसन स्वागत कर. तेस्नी सयाजीराव महाराज येस्नी बारीक पारख करी. नी रावजी इठ्ठल पुणेकर येस्ले त्या बोलनात, "तुम्हणा महाराजस्नी तल्लख बुध्दी, चौकसपना, नी प्रौढ वागणूक दखीसन माल्हे गयरा हारीक वाटना. आणि आते खरज बडोदा संस्थान ले चांगला दिन येथीन आस मन आंतरमन बोलस", हायी बोलेल पुणेकरस्नी महाराजस्ले सांग, त्या येले कृतार्थनी महाराजस्ना डोया मजार आनंद ना आसू वायन्हात.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६