*[ई बुक अहिरानी बोली भाषेतील प्रकाशित कविता संग्रहातून ...]*
*गोड बोलाना वं सन*
उनी उनी उतरानं
गोड बोलाना वं सन
गोड बोला हायीच से
तिय-गुयनं सांगन॥धृ॥
उनी उनी उतरानं
हिनं निरायचं गानं
सांगा सांगा दुनियाले
गोडी गोड बोलाम्हान॥१॥
गोड बोलाना बी आठे
देखा करतस सन
गोड गोड बोला म्हने
बठ्ठा भाऊबैनीस्वन॥२॥
द्यारे पलटाईसन
आतंकनं वावधन
मन्हा भारत महान
याना काय सांगू गुन॥३॥
दसराले बी उगना
आठे दिन व सोनाना
झगमग देखा आठे
दिवा करे दिवायीना ॥४॥
*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे*
*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये .
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
●●●●●●●●●●●●●●●●●●●
शब्दार्थ :- उनी =आली, उतरानं =संक्रांत, हिनं=हिच, बोलाना=बोलायचा, सन=सण, तियगुय=तीळगुळ, निरायच=निराळच-वेगळच, गानं =गाणं, करतस=करतात, बोलाम्हान=बोलण्यामधे, बठ्ठा =सर्व, भाऊबैनीस्वन =भाऊबहिनींनो, पलटाईसन =पलटवून, वावधन=वादळ,
मन्हा =माझा, याना=याचा, दसर्याले=दसर्याला, उगना =उगवला, आठे=इथे,दिन=दिवस, सोनाना=सोन्याचा, करे=करतो, दिवायीना =दिवाळीचा.
●●●●●●●●●●●●●●●●●●●
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा