बुधवार, ३१ मार्च, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग... १५*

*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

*भाग... १५*

"राज्य हायी जनतानी राजाकडे समायाले ठेवाले देल डबोल ह्रास, राजा त्या डबोला ना मेढ्या ह्रास आस ध्यानमा ठिसन राजानी वागाले जोयजे, नी राज्य ना भरभराटी करता राजानी रात दिन प्रयत्न कराले जोयजेत" आशी शिकवण गंगनाथ, आठला ब्रम्हानंद स्वामीस्नी महाराजस्ले शिकवण देल व्हती.महाराजस्नी तीच शिकवण ना आदर्श ठिसन राज्यकारभार चालावाले सुरवात करी. तेस्ले मार्गदर्शन कराले प्रतिभावंत असा दिवाण सर टी माधवराव व्हतातच. माधवराव येस्नी पाश्चिमात्य शासनपध्दतना आभ्यास करेल व्हता. तेल्हे आपला आनुभव नी जोड दिसन शासनव्यवस्था मजार गयय्रा नया गोष्टी आन्यात. नया नया लोकउपयोग पायंडा चालु करात. महाराजांनी त्याच धोरण चालु ठेवात. सर टी माधवराव येस्ना कारभारवर महाराजस्नी बारीक नजर राहे. प्रत्येक खाताना महत्वाना कागदपत्र महाराज सोता तपासेत. दिवाण येस्ना महत्वाना निर्णययस्ले महाराजस्नी मंजुरी लागे...

              योग्य पध्दत नी राज्यकारभार चालवता येव्हो, म्हणीसन महाराजस्नी राज्याले नजीकथाइन दख परिचय करान ठराव, बठ्ठा मुलूख नजरखाल जाव्हा ले जोयजे, मुलूख ना परिचय, प्रजान सुख दुक कयाले जोयजे म्हनीसन महाराज येस्नी राज्याना दौरा करान ठराव. नी खेडोपाडी जाईसन परिस्थिती समजी लिन्ही. त्या येले महाराजस्ना संगे गयरा मोठा लवाजमा ह्राहे. अधिकारी, पोलीस, नवकरचाकर आसा शेगणती लोक ह्राहेत. तसच घोडा, बैल, हत्ती असा शेगणती जनावर ह्राहेत, नदी ना काठ धरीसन निय्यगार  आमराईस्मा, शामियाना, तंबू फुलझाडस्न्या कुंड्या लायेल ह्राहेत. नविन ठिकाणवर जस गावच उभ ह्राहे. सामान नी रेलचेल ह्राहे, उदाहरण दाखल म्हणजे, महाराजस्ना पायतनस्ना करता स्वतंत्र तंबू उभारेल ह्राहे, हजारो जुत्तासना भर ह्राहे, मराठी, गुजराथी, साऊथ, मुसलमान, मारवाडी घडावन जुत्ता ह्राहेत, महाराजस्ना १२ वरीस पासुन ना बठ्ठा जुत्ता ह्या तंबू मजार ह्राहेत, महाराजस्नी ह्या गोटवर ध्यान गयी, तेस्नी अधिकारीस्ले इचार इतला जुत्ता कसा करता, तव्हय अधिकारी बोलणा, राजाले लह्रेर नुसार जुनी चालीयेल हायी पध्दत शे, महाराज बोलणात "मी गरीबस्ना राजा शे, हाऊ थाट माल्हे नको, राज्याना खर्च कमी कराले जोयजे, मंग महाराज येस्नी त्या एक तंबू भरेल हजारो जुत्ता गोर गरीबस्ले वाटी दिन्हात. महाराज दौरावर ह्राहेत तव्हय, गावमजारल्या शाय, कचेऱ्या, बाकीना सार्वजनिक जागा चौकसपणे देखत. दप्तर सोता तपाशेत. अधिकारीस्ले सोता इचारपुस करेत. ह्या सर्व बाबीस्न्या टाचण तयार करीसन लिखी काढेत. बठ्ठा धंदेवाईक लोकस्ले बलायीसन इचारपुस करेत. तेस्नी परिस्थिती, तक्रारी समजी लेत, कारागीर लोकस्न हस्तकौशल्य दखेत, तेस्न कवतीक करेत, घोडावर बशीसन शेतकरीस्ना वावर दखेत. शेतकरीस्ना हाल सोता दखेत, अस प्रकारे बठ्ठा राज्याना दौरा च्यार पाच वरीस्मा करी काढा. दौरा ना ठिकाणवर लोक येत तेस्न कवतीक करेत, स्वागत करेत. काही लोक ते राजा कसा ह्रास हायी दखाले येत, कारण येन्हा पयले राजा प्रजा लगुन भिडेच नही. त्यामुये झुंग्या न झुंग्या लोकस्न्या येत, महाराजस्न दर्शन लेत. स्वारी मोठ्ठला समारंभ ले जायेत तव्हय शायन्हा पोर नाच गाणा सादर करेत. मानपान्ह् लोकस्न्या गाठभेट व्हयेत. रातले लोकरंजन करता शोभन्या दारुकामस्नी आतषबाजी व्हये. 

           आसा दौरामुये महाराजस्ले प्रत्यक्ष परिस्थिती ना आंदाज उन्हा, आडीआडचन नी कल्पना उन्ही. राज्या मजार काय कमतरता शे, काय सुधारणा करता येतीन येन्हा आभ्यास झाया. लोकस्ले भेटीसन लोकस्ना इश्वास, पिरीम जिकता उन्ह, आपुलकी तयार व्हयनी. त्यामुये सामाजिक सुधारणा करतांना महाराजस्ले अज्ञानपणाना इरोध व्हयना नही. 

*क्रमशः*

      (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...