*जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)*....
*भाग... ९*
त्याच दिन दुपारले इंग्रज सरकारनी तेस्ना दरबार मजार महाराज ना सत्कार नी तयारी करी.. तेस्ना करता खास दरबार भरायेल व्हता. तेस्ले हिरा, मोती माणिक जळेल पोषाख अर्पण करा, इंग्रजस्ना तोफखानाम्हायीन १२२ तोफास्नी सलामी दिन्ही, राज्याभिषेकना निमित्त करीसन दिवाण येस्नी जाहिरनामा जाहिर करा. "इंग्रज सरकारना जाहिरनामा नुसार जमनाबाईसाहेब येस्नी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ले दत्तक लिसन विधीयुक्त दत्तकविधी पार पाडेल शे, त्या आते बडोदा ना राजा व्हयेल शेत, तरी बठ्ठी प्रजानी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या निरक, दिर्घआयुष्य होव्होत येन्हा करता देवबाले साकड घाला... नी प्रार्थना करा"...
आते बडोदानी अस्थिरता सरनी, नी नया. युगला सुरवातझायी. बडोदा पासुन शेकडो कोस दूर एक खेडा गावना ढोरक्या पोय्राना आज राज्याभिषेक व्हयेल व्हता अफाट संपत्ती ना मालक व्हयेल व्हता, ३५०० गावेस्ना २ लाख लोकस्ना पोशिंदा बनेल व्हता. त्या प्रसंगले धरीसन महाराष्ट्र मजारतुन न्या रानडे येस्नी महाराजस्ले शुभेच्छा देवा करता, नी कवतीक करा करा करता एक शिष्टमंडळ बडोदाले रवाना कर... महाराष्ट्र मजार त्या येले न्या रानडे येस्न जास्त वर्चस्व व्हत .. न्या रानडे येस्ना इतला प्रभाव कोणाच नही व्हता. त्यामुये वडीलकीना मान न्या रानडे येस्ना कडे ग्या. ब्रिटिश सरकारना राज मजार त्या उच्ची जागावर न्यायनिवाडा करेत. ब्रिटिश राजवटी नी तेस्ले सहानुभूती व्हती, इंग्रजी,उच्चा इचार, इंग्रजानी मगज नी हुशारी, तेस्नी रितभात ना अवलंब, तेस्ना आधार लिसन आपली भरभराटी, प्रगती, नी बरकत व्हयीन अस तेस्ले वाटे, नी तस तेस्न मत बी व्हत. मुर्दाड व्हयेल जनता जित्ती कराना, तेस्ना मजार जीव ओतान काम त्या करेत. चैतन्य पयदा करान काम न्या रानडे करेत. तसा तेस्नी ध्यास धरेल व्हता... त्या करता तेस्नी नानापरकारना काम हात मजार लेल व्हतात. पोरीस्न्या शाय, ग्रंथालय, व्याख्यानमाला, साहित्य परिषद, बॅक, नी कागद कारखाना, अस्या न्याय्रान्याय्रा संस्तास्ले तेस्नी गती देल व्हती. भारतना राष्ट्रसभाना आणि सामाजिक परिषद ना, त्या संस्थापक व्हतात. तेस्ना इचार तेस्न प्रतिबिंब व्हत, आस तेस्ना संदेश मजार समजे.. म्हणुन तेस्ले खास महत्व व्हत, तेस्ना इचार नी शिदोरी महाराजस्ले जनमभर उपयोगी ठरना.....
गोपाळ बडोदा ना राजा व्हयना हायी गोट वारा सारखी भिन्नाट पसरनी, दिनमाव्हतले वडना पार खाले बठ्ठा जण बशेल व्हतात.. मस्त गप्पा चालू व्हत्यात.. विठ्ठल खैरनार आचंबा करीसन बोलणा..
"तुम्ले माहित जाये कारे, गड्यास्वन"
"काय झाय रे भाऊ" तात्या गायकवाड बोलनात..
"आप्ला गोपाळ बडोदा ना राजा व्हयी ग्या म्हणे"
"तुल्हे कोणी सांग?" गटलु बोरसे बोलणा..
"कागद मजार लिखी उन्ह, आस मालेगाव मजार चाव्वी ह्रायन्हात म्हणे" विठ्ठल खैरनार बोलणा..
"पहायरे इठ्ठल, मी सांग व्हत ना? हाऊ गोपाळ बु पटाईत शे, तो राजा व्हयीच" गटलु बोरसे बोलणा...
बडोदा मजार बी उलटी सुलटी चर्चा सुरु व्हयेल व्हती. कुणी म्हणाले, "आरे जमनाबाईसाहेब महाराणी नी कोठीन तरी धनगर न कोकरू धरी आणेल शे, दिसीनच मव्हरे तो काय दिवा लायीन.. कोणती बी नयी गोट न स्वागत करान सोडीसन लोक निंदानालस्तीज जास्त करतस, पण श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी कायना इचार करीसन, दूरदृष्टी ना इचार करीसन,आप्ली कर्तबगारीवर शहाणपण, आणि चतुराईवर जगदुन्या उजयी काढी, एक आदर्श राजा म्हनीसन किर्तीवान व्हयनात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा