बुधवार, ३१ मार्च, २०२१

😄 निवडणूक😄

 😄  निवडणूक😄

🙏🙏🙏🙏🙏🙏

================

दर  पाच  वरिसम्हा

येस  वाजत  गाजत...

ऊनं  हाई  इलेक्शन

दारू दर्फडा पाजत.......1

दर  पाच  वरिसम्हा

त्याच इटेल तमासा...

कुत्रा चघयी रे देखा

रोज मटण नी मासा......2

जेनी पत शे रे बांडी

तोच निवडम्हा हुबा...

चार चत्रा लांडगास्नी

ढाण्या वाघलेच दाबा.....3

झाई लोकशाही खट्टी

मन  रोज  तीन्हं  तुटे...

उठे   नंगेशाही..रोज 

अन  लोकशाही लुटे......4

समाजना आरसाम्हा

जेन्ह तोंड दिसे कायं...

तोच  धराले  पयस

सिंघासन्ना च्यारी पाय....5

जसं  एक  कुत्रीमांघे

चौदा कुत्रास्नं गव्हारं...

तसं  हाई  खुर्चीसाठे

कोन्ही कालर सव्हारं.....6

जसा पाची पांडवस्नी

लिन्हा धुर्पतीम्हा वाटा...

खुर्चीलोंग भिडासाठे 

कोण कसा लाये साटा...7

काय नाव ठेऊ त्येंस्ले

बाता करस मी मोठ्या...

सस्ता इकावस मी भी

दोन घोट, दोन बोट्या....8

======================कवी ======

प्रकाश जी पाटील..........

.............. पिंगळवाडेकर

================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...