बुधवार, ३१ मार्च, २०२१

अशी मनले वाटत नही

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️



*अशी मनले वाटत नही !*


च्या पेतांना कप म्हाईन

च्या बशीम्हा पडत नही !

मिशा बुडाईसन च्याम्हा

तोंडवाटे फुर्का वढतं नही !


*तवलोक च्या पिनुत*

*अशी मनले वाटत नही ...*


तोंडम्हां बरश धरेलवर

कोनाशी बात व्हत नही !

तोज कानले हात लाई

येकदा बहिरा व्हत नही !


*तवलोक दाते घसायनात*

*अशी मनले वाटत नही ...*


नातुना बिस्कुटेस म्हाईन

दोन बिस्कुटे चोरत नही !

नातू आजला सारखाज

अशी सूनबाई म्हनत नही !


*तवलोक बिस्कुट खाद*

*अशी मनले वाटत नही ...*


आंग धोई वल्ला रुमाल

बाजवर जवय पडत नही !

आनी घरम्हाईन धल्लीना

कानवर आलाप पडत नही !


*तवलोक आंग धोय ब्वा* 

*अशी मनले वाटत नही ...*


काम वरथुन येलवर

कपडा फेकतस नहीं !

बय गयरा दमनू आज

तोंडवाटे निघत नही !


*तवलोक दमनुत ब्वा*

*अशी मनले वाटत नहीं ...*


कपडास्ना पसारा देखी

बायको संताप करत नही !

रागे रागे जवय खोचाट

दोन टोमना मारत नही !


*तवलोक नवरा से ब्वा*

*अशी मनले वाटत नही ...*


आपलं तसज तिन्ह बी

रोजनं ते काही नवं नही !

माहीत र्हास तरी बी ती

परत आखो बोलत नही !


*तवलोक तिले बायको से*

*अशी तिले वाटत नही ...*


आपीन अशा वागतस

तशी ती बी बोलत र्हास !

भांडाले भांड लागत नही

असं जर रोज घडत नही !


*तवलोक सुखी सौसार से*

*अशी मनले वाटत नही ...*


*✍️✍️कवि✍️✍️*

*विजय व्ही.निकम*

*धामणगाव,चाळीसगाव*

*मो.नं.८८८८९४५३३५*

*दि.१४/३/२०२१*


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...