बुधवार, ३१ मार्च, २०२१

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो) भाग..

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)*

 *भाग... ७*

इलियट कलेक्टर येस्ले कवळाणा गावन येड भरी जायेल व्हत. ते नित्यनेम नाशिक ना गल्ली बोय मजार फिरीसन जोतिष दखनाय्रा बाम्हणसांकडे जाइसन तालतपास कराले लागना. नशिबाथाइन तेस्ले नाशिक मजार दोन भाट भेटणात, एक व्हता विनायक भट दिक्षित,नी दुसरा व्हता त्र्यंबकेश्वर ना धोंडभट शुक्ल, येस्नाकडथाइन आशी माहिती भेटणी प्रतापराव हाऊ पिलाजीराव येस्नी आंडोर नी दमाजीराव येस्ना धाकला भाऊ व्हता. नी बडोदा संस्थान ना राजाना एकच रंगत मजारला शेत. कमिशनराव येस्नी हायी वंशावय बनाइसन कवळाणा ना गायकवाड कसा एकच रंगत ना शेत आस मत इंग्रज सरकारले कळायी दिन्ह. मंग तेन्हा धागादोरा पकडीसन उखाजीराव नी काशिराव येस्ना धाकल्ला आंडोर बदोदा संस्थान ले धाडा नी कलेक्टर इलियट येस्ले आदेश करा.

                  दुसरा दिन कलेक्टर इलियट रामपायटा मजार दिन उगताच कवळाणा ले भिडी ग्या. एक शिपाई काशिराव बाबा कडे धाडा, तो शिपाई काशिराव बाबाले बोलणा "चला तुम्ले कलेक्टर साहेबनी बलाव्ह, त्या दखा कलेक्टर साहेब झाड ना घोडावर बशेल शेत" काशिराव पाटील गांगरी ग्यात, तशीच आप्ली पगडी डोकावर चढाई, उपरन खांदावर टाक नी बाहेर निंघनात. काशिराव पाटील साहेबकडे उन्हात, संगे आप्ला धाकल्ला नमस्कार आंडोर बी व्हतात, लंगोटी घालेल नी डोकावर तेस्न्या पगड्या होत्यात, गावना लोक बी जमा हुयीग्यात, बठ्ठास्ले गावमजार कलेक्टर साहेब येल न आचंबा व्हये. बठ्ठाजन त्या गोरा साहेबकडे कवतिक मा दखेत. गोरा साहेब घोडवरथाइन पाय उतार झाया, नी मोडकी तुडकी मराठी बोलाले लागना.

"टुमास मुलगे किती पाटील?"

"ह्या दखा मन्हा तीन आंडोर, जेठा आनंदा, मझारला गोपाळ, नी धाकला संपत "

"आणि टुमच्या घरात बंधुचे मुलगे असटीलना"

"शेत साहेब, काही आते संगे शेत, बाकीना खयामजार जायेल शेत"

"बर ठीक आहे, टुमी, टुमचे मुलगे, नी भावाचे मुलगे घेवुन नाशिकला बंगल्यावर या. "

" हायी गयी करु नका, "

इतल बोलीसन गोरा साहेब, घोडाले टांग मारीसन चालना ग्या.

                         राजा बोले नी दल गाळे, तठे परजा न काय चाले, आशीगत ह्रास. काशिराव पाटील येस्नी बठ्ठा पोरस्ले लिसन नाशिकले जावानी तयारी चालु करी, उमामाय आप्ला आंडोरस्ले धाडाले तयार व्हये नही," तठे काय शे, मी मन्हा सातनवस्ना आंडोर बडोदाले इतला दुर जाऊ देणार नही"काशिराव पाटील उमामाय नी समज काढतस, नी दुसरा दिन नाशिकले जावान ठरी गये... रामपायटा मजार काशिराव पाटील येस्नी दोन घोडास्ना टांगा जुपाले लिन्हा, रात न निख्खय चांदण आभायमजार माव्यानी तयारी मजार व्हत, घरघरस्माइन घट्यास्ना दयाना आवाज नी गोड घट्यान्या ॴवीस्ना आवाज यी ह्रायनंता, गायी, म्हयसी गोठा मजार हांबरी ह्रायन्ह्यात, बठ्ठ वातावरण निरमय व्हयेल व्हत, काशिराव येस्नी टांगा जुपीसन पोरस्ले टांगामजार बसाड, बठ्ठा गावन्या बाया माणस जमा व्हयेल व्हत्यात... उखाजीराव येस्ना आंडोर दादासाहेब, काशिराव येस्ना मझारला गोपाळ, नी धाकला संपत टांगा मजार बशेल व्हतात, उमामाय न्या डोयास्न्या धारीस्ले काहीज खंड पडे नही, काशिराव येस्नी टांगा हाकलावले सुरवात करी तसा उमामाय नी हंबरडा फोडा, टांगा निंघी घ्या, गावना शिवलगुन टांगा गया, पण गोपाळ माय ना ताटातूट व्हयेल मुये तेन्हा हुंदका दाटी येल व्हता... देवबानी काय कमाल ह्रास कव्हय कोणले राजाले रंग, नी रंग ले राजा बनाई दिन.   उपडीनी झोपडी, नी झोपडनी उपडी व्हयी जास, गोपाळ नी इचार बी करेल नही व्हयीन की, मी वापस कवळाणाले येणार नही, मन्हा, मैयतर, ढोर नाला, बठ्ठा खेय कायमना सोडीसन जासु.... नाशिकले भिडावर काशिराव येस्ना व्हयखीना गोपाळ डोंगरे येस्ना कडे मुक्काम करा... दुसरा दिन कलेक्टरना बंगलावर जायीसन भेट लिन्ही, कमिशन एथरिज, नी कलेक्टर इलियट येस्नी ह्या पोरस्ले बडोदाले पवसाडानी परवानगी दिन्ही... गोपाळराव डोंगरे येस्ना कडे दोन दिन मुक्काम झाया, गोपाळराव डोंगरे येस्नी आप्ला पदरना पयसास्ना तिन्ही पोरस्ले नवा कपडा लिन्हात. नी मंग लगेच प्रेसकाॅच नावना फौजदार ना संगे कलेक्टर, नी कमिशन येस्नी परवानगी भेटताच तिन्ही पोरस्ले मुंबई मार्गे रेल्वाई मार्गे बडोदाले रवाना करी दिन्ह..... 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

            अनुवाद 

          सुरेश पाटील             ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...