🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
*अष्टाक्षरी कविता*
*पय पय पयना तू*
पय पय पयना तू
रानभर काम गुंता
राब राब राबना तू
इतभर पोट गुंता
तय तय तयना तू
आंगवर लीध उनं
किर किर रातना तू
खेतवर नाकं दिनं
कय कय मनले ती
डोकावर वझं देनं
दिनगने वाढे याज
हातवर कसं जीनं
जितरब संगे ठेल
खांदवर ती दुसर
रट्टा घट्टा पडी पडी
पडा दुखना इसर
ग्यात उनात कितला
कयवार त्या बईना
मनी येकज मायना
बठ्ठा नारद कईना
वर वर म्हनतस
तोंडवर पोशिंदा रे
पाठमोर्हा व्हइसन
उपराना तो धंदा रे
✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगाव,चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५
दि.१८/३/२०२१
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा