आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजमजा करतात. शेतकरी सालदार बदलतात. त्यांना नविन कपडेलत्ते देतात. सादर आहे लेवा गणबोलीतील माझी कविता-
शेतकऱ्याची आखजी
आली आखजी आली
आली दुष्काया पावली
दिस आशे केविलवानी
पिवू आसवाईचंच पानी
सासरच्या कामामंधी
पोर माही पिसोयली
माहेरच्या सावलीले
लेक माही आसोयली
लेक माहेरी आन्याले
कोनी धाळा रे मुऱ्हाई
चार दिस कवतिकाचे
भोगू दे माह्या बाई
भरा घागर पितराईची
घरी नशेना का दाना
रीण काढीसन धन्याचं
तेल तूप घरी आना
तया सांजऱ्या करंज्या
झोका निंबोनीले बांधा
रोज कोल्ळी भाकर
आज गोळ धोळ रांधा
जरा ईसरा संसार
घरी गोकुय भरवा
चार दिस सुखाचे
बाकी जगनं वनवा
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(२२.०४.२०२३)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा