बुधवार, ३१ मार्च, २०२१

भावकी ते गावकी

 भावकी ते गावकी

दखा भो आते सध्या एकच चर्चा भावकी ते गावकी... १५ तारीख ले महाराष्ट्र, नी खान्देश मजार ग्रामपंचायतन मतदान शे, हायी मतदान म्हणजे भावकी आणि गावकीनी कजाक ह्रास... खान्देशी माणस तर इकास नी गोट सोडीसन वाडा, भावकी, गल्ली, जात, धर्म येणावर व्हस.. मतदार बी बठ्ठा पॅनल, उमेदवारस कडथाईन हात धुवान मांगे ह्रातस... मंग ह्या बी निवडी उन्हात की तुम्हले बी, गावले बी मस्त धोतस... 

      म्हनीसन सांगस दादास्वन चांगला माणस निवाडा, बोट्या, दारूवर इकाउ नका, तेन्हा गु व्हस... मंग ह्या निवडेल तुम्हणच बोट तुम्हणा गांड मजार घीलतस तुम्लेज ५ वरीस सुंगाले लावतस.. तरणा जुवान इचार करा.. भावकी, गावकी ना बाहेर निंघा, चांगला जुवान निवाडा, शिकेल सवरेल निवाडा, गावना जिव्हाडाना माणस निवाडी द्या.. आते जातपात, धर्माना बाहेर काम व्हवाले जोयजेत...

     केंद्र सरकार वित्त आयोग कडथाईन लाखो रुप्या देस, अनुदान, लोकवर्गणी, बरीच निधी येस... पण आपले माहित ह्रास नही, आपीन जाग्रुत नागरीक बनाले पाहिजे, राजकीय, सामाजिक साक्षर बनाले जोयजे, नी नागरीकस्ले बी राजकीय सामाजिक साक्षर बनाडाले जोयजे... जर गावोगाव इकास व्हयीन ते गावमजार रोजगार मियीन, खान्देश न स्थलांतर थांबीन... पण बठ्ठास्नी मनवर लेवाले जोयजे... भाऊ, दादा, ह्या मोठ्ठला राजकारणी भडवास्ना नांद सोडा...

       काय मियस तुम्ले इचार करा.. ५०० फुलीवर इकाई जातस नी ५ वरीस थोबाड बंद ठेवतस... काही ठराविक गावेस्ना इकास दखा, प्रगती दखा, गावन्या शाया देखा, आरोग्य... पण गावस्ले महिना, पंधरा दिनमजार पाणी येस, काही गावस्ले पाणी रोज शे, पण तेस्ना पीएच जर तपासा ते, ढोर पेव्हाव, नहीत आस पाणी ह्रास, गाव जंगल इकावस, लायेल झाड उपाडतस, गावमा सुशिक्षित पोर असिसन बाहेर ना गाव वालास्ले रेशन दुकान चालावाले देतस, खोट्या ग्रामसभा, सरकारी खोट अनुदान चाटी लेथस... गावना संडास खायी जातस, गटारी खायी जातस, आसा उमेदवार निवाडु नका, भावकी आणि गावकी चेटाळानी तयारी करणारस्ले आते चेटाळानी गरज शे... नही ते ५ वरीस तोंडले मुकस बांधीसन बसा... बाकी काय? दादास्वन राजकीय, सामाजिक साक्षर बना, गावना इचार करा, गाव करी ते राव काय करीन... बस पैसासवर इकावु नका, हाऊ टाकेल फटुक तरुणस्नी डीपी ठेवाना प्रयत्न करा.... 

     .... ..... प्रवक्ता..... 

        खान्देश हित संग्राम 

......... 

          ९००४९३२६२६...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...