बुधवार, ३१ मार्च, २०२१

बडोदा संस्थान ना उगम भाग... ४

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग... ४*

मल्हारराव येस्न लयरी आणि इचित्र वागण चालुज व्हत. राजधानी मजार दर वरीस्ले शिमगाले फाग खेवाना गयरा मोठा उत्सव व्हये.एक लेखक नी लिखेल शे, त्या सण न वर्णन करेल शे "मल्हाररावनी खास मंडई मोठा तोरा मिराई ह्रायंतात. ज्या तेस्ना खासे स्वारी होतात तेस्ना संगे रंगना भरेल बंब, नी शेकडा गणती पखाली तयार ठेल व्हत्यात. हजारो गुलहौवसी रिकामचोट लोकस्नी रंग ना फाग खेवाले सुरवात करी. शेकडागणती तेन्हामजार सामील व्हयेल व्हतात, हायी चिनगी जायेल व्हतात, येरायेरना आंगवर. रंग उडावान चालु व्हत. आसामा हत्ती बिथरी ग्यात, बठ्ठी कडे दाणादाण उडनी बाया, माणस कथा बी पयाले लागणार, हत्ती बेफाम व्हयेल व्हता, त्या बेफाम हात्तीस्ना पाय खाले गयरा लोकस्ना चेंदामेंदा व्हयना, काही पांगु व्हयनात, काही घायाळ व्हयनात, इकडे राजवाडावर मल्हारराव येस्नी राजवाडावर ह्या वरीस्ले रंगना फाग खेवाना करता शेकडागणती नायकिनी आणेल व्हत्यात, रोज सकाय पासुन दिनमाव्हतलगुन बयजबरीनी रंग न्या पिचकाऱ्या तिस्नावर उडायेत. मल्हारराव आणि हरीबादादा गायकवाड येस्ना पुढाकार व्हता. त्या मजार गयय्रा बाया आजारी पडण्यात, काही मरीग्यात... राजान पद ले न सोभनारी हायी गोट व्हती, मल्हारराव येस्नी आंडेर सौ कमलादेवी राजेशिर्के ह्या राजकारण न्या चांगल्या मुरायेल व्हत्यात, तेस्नी मल्हारराव येस्ले समजाडाना प्रयत्न करा, पण काही फायदा झाया नही...

               मल्हारराव येस्ना ह्या गंभीर अपराध, नी बेजाबदार वागणूक मुये रेसिडेंट कर्नल फेअर नी तेस्ना मजार झगडा चालु झाया, लोकस्नी जीव हानी, नी मालमत्ता न नुकसान धोका मजार येल मुये इंग्रज सरकारनी कमिशन नेमसीन मल्हाररावस्नी चवकशी करी, तेस्ना हाऊ अनागोंदी कारभार सुधारा करता दिवाण म्हनीसन दादाभाई नौरोजी येस्नी नेमणूक करी, दादाभाई नौरोजी येस्नी प्रशासकीय मोजमाप प्रस्थापन कराना प्रयत्न करा, पण मल्हारराव आणि रेसिडेंट येस्ना झगडास्ले कटाईसन तेस्नी राजीनामा दिना. मव्हरे मुंबई सरकारनी कर्नल फेअर येस्ले काढीसन नवीन रेसिडेंट म्हणीसन सर लुई पेली येस्नी नेमणूक करी, तेस्नी शिफारस नुसार मल्हारराव येस्ले राज गादीवरथाईन पायउतार करान ठराव. मल्हारराव येस्ले अटक करीसन बडोदा संस्थान ना कारभार रेसिडेंट येस्ले समायना आदेश दिन्हा.

             त्या वखतले जमनाबाईसाहेब ह्या पुणाले व्हत्यात, पण गयय्रा चतुर आणि धूर्त व्हत्यात, तेस्न बठ्ठ ध्यान बडोदा संस्थान कडे व्हत. पुणाले जमनाबाईसाहेब येस्नी धाकलामोठ्ठला लोकस्न्या गाठभेट चालु कय्रात, त्या चवकस, नी चतुर असामुये तेस्नी दत्तक मंजूर करा करता प्रयत्न चालु करात, ह्या कामाकरता तेस्ले आमदाबादना न्यायाधीश लोकहितवादी येस्नी चांगली मदत झायी, न्या. रानडे येस्नी मदत झायी, तेस्न तोलमोल न सहाय्य, नी सल्ला मियना. लोकहितवादी येस्ना आंडोर कुष्णराव देशमुख आतेच बॅरिस्टर व्हयीसन इंग्लडथाईन वापस येल व्हता. तेन्हा मित्र ड्युक ऑफ कॅनाॅट हाऊ राणी व्हिक्टोरिया जवाई व्हता, तेन्हा मार्फत दत्तक मंजुरीना प्रयत्न करा, तेन्हा मजार तेस्ले यश उन्ह. जमनाबाईसाहेब येस्ले दत्तक लेव्हानी इंग्रज सरकार कडथाईन परवानगी भेटनी, हिंदुस्तान सरकारनी परवानगी लिसन गायकवाड घराना मजारला न्हान्ह पोरग दत्तक लेवो आस ठरण. त्याच येल्हे व्हाईसरॉय नाॅर्थबुक येस्नी रेसिडेंटले हुकुम करीसन मल्हारराव येस्ले गुप्तपणे रेल्वाई गाडीवर मद्रासले लयी ग्यात, कायमदा बंदीवास करी ठेव.

     . मल्हाररावनी रवानगी मद्रासले व्हताच रेसिडेंट येस्नी जमनाबाईसाहेब येस्ले मानसन्मान दिसन पुनाथाईन बडोदाले बलाव्ह. जमनाबाईसाहेब बडोदा रेल्वाई स्टेशन येताच रेसिडेंट घोडास्नी गोरास्नी फौजफाटा लीसन जमनाबाईसाहेब येस्ना स्वागतले ग्या. सन्मान करा साठे सरकारी बॅडवाजा हजर व्हता. गाडी स्टेशन मजार घुसताच तेस्ले तोफास्नी सलामी दिन्ही. लष्कर नी भी मानवंदना करी. जमनाबाईसाहेब येस्ना आते वनवास सरेल व्हता, नी वापस वैभव तेस्ले भेटन. मव्हरे जमनाबाईसाहेब येस्ना राजकारभार नेम्मन चाला करता दिवाण म्हनीसन टी. माधवन येस्नी नेमणूक करी, त्या गयरा हुशार, चतुर, मुत्सद्दी व्हतात म्हनीसन राजकारभारले तेस्ना चांगला उपयोग व्हयना. तेस्न जनम तंजवावर व्हयेल व्हता, च्या ब्राह्मण होतात, गणित आणि तत्वज्ञान ना प्रोफेसर व्हतात. त्रावणकोर आणि इंदूर ना त्या दिवाण व्हयेल व्हतात. तठे बी तेस्नी कामगिरी नमुदबन, नी कटबन व्हती. १८ ७५ ना मे महिना मजार जमनाबाईसाहेब, नी टी माधव ह्या बडोदा संस्थानले आगमन झाय, आणि तव्हय पासुन तेस्नी बडोदा नी गादीवर बसाडा करता भागबल्ली वारस झामला प्रयत्न सुरु करा. *त्याच वखतले नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका मजार कवळाना काशिवराव बाबाना मजारला आंडोर गोपाळ ढोर चारी ह्रायंता..*

*गोपाळ नशिब आते फळफळी येल व्हत... तेन्हा कुंडली मजार राजयोग, नी एश्र्वर्य प्राप्ती नी मर्जी व्हयेल व्हती*.....

(हाऊ लेखना संदर्भ, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, आप्ला खान्देशी लोकस्ले आपला राजा कयावा म्हनीसन हायी धडपड शे... मी मा निंबाजीराव पवार येस्ले नतमस्तक व्हस)

    आपला

   सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...