बुधवार, ३१ मार्च, २०२१

😎बाप्पाना चष्मा😎

 😎बाप्पाना चष्मा😎


बोट्यास्न मटण न  कस रटरट शिजी ह्रायन्ह ..

दारुन आंधण कस खयखय उकाई ह्रायन्ह...

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

जुवारी नी सपथ नी पोरस्नी सपथ लेव्हायीह्रान्ह...

घरना देव्हारा न देवपण हाली ह्रायन्ह...

लंगड्या देव बी कसा डांगेडांग पयी ह्रायन्हा...

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

गांधी बाप्पा नोटवर हाशी ह्रायन्हा....

बाप्पानी आंधी लोकशाही चष्मा दखी ह्रायन्हा...

आंधा मतदारस्ले पाच वरीस करता...

बाप्पाना चष्मा पाचशे, हजार ले इकाई ह्रायन्हा

मायच्यान भो मन्ह बी गाव आज इकाई ह्रायन्ह...

           त्रिवेणीकुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...