बुधवार, ३१ मार्च, २०२१

नवरा बायकोनी जुगलबंदी

 😃😃😝😜😂😃😃


*नवरा बायकोनी जुगलबंदी*


गाय सांगे सासरा कवतिक करी

गयाम्हा वाघीनले आटकाई गये

गुर गुर करी र्हास दिनरात माले

मन्हं भलतं मनले खटकाई गये


करानं नै व्हतं लगीन तुमनीसंगे

मायबापनं मनं मातर धराई गये

तयार व्हतात लगीनले मन्हासंगे

खैरबांड ते कपायले पूजाई गये


राहूदे राहूदे कितल झगडशी तू

मन्हं डोकं वं दुखाले लागी गयं

लयते ती बामनी बाटली आथी

मन्हा जराखी माथाले चोय वयं


हाले नही मन्हा बिगर पत्त बरं

म्हने बाम तो टकलाले लाई दे

साडीना बोया लयाले सांगो ते

म्हनतस कशा माहेरले जाई ये


जाय जाय लवकर तू माहेरले

माले बी जराख ऐकलं राहू दे

किरकिर तुन्ही आयकी रोज

जराखी वं शांती मनले लागू दे


कोन शे हाई भिंगोटी शांती

आज मन्हा डोयाले दखु द्या

मन्हा सौसारना खेय करे ती

तिन्ह्या झिपोटीसले वढू द्या


काय उपाधी से भो हाई मरो

मनंनी शांतीले सवत म्हनस

निमीत जोयजे तुले जराखं

कायिमज मन्हा जीव रगडस


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगाव,चाळीसगाव

दि.१०/३/२०२१


😃😃😜😝😝😃😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...