बुधवार, ३१ मार्च, २०२१

बडोदा संस्थान ना उगम* भाग.. ३

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग.. ३*

मल्हारराव येस्नी तेस्ना मर्जीना लोकस्ले हत्ती आणि घोडा, पालख्या असा पानपान न्या वस्तु तेस्ना मर्जी ले पटीन तस दिन्ह्यात. बडोदा संस्थान मजार फक्त वशिला काम व्हयेत. आस बी मल्हारराव येस्ले वाटे बडोदा नी गादी म्हणजे तात्पुरती शे, तेस्नी गादीन भविष्य जमनाबाईसाहेब येस्ना कुस मजार वाढणारा वंशजवर तग धरेल व्हत... म्हणीसन मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्ना घातपात कराना प्रयत्न, तेस्नावर तंतर मंतर ना उपयोग करा.. मल्हाररावना हायी वागणुक ना जमनाबाईसाहेब येस्ना मनवर गयरा परिणाम झाया, तेस्ले समजी उन्ह की मल्हारराव माल्हे मारी टाकीन... जमनाबाईसाहेब धोयेल (गरोदर) नही शे आसा आटापिटा मल्हारराव येस्नी करा. मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी तेस्ना मर्जीना सरकारी डाॅक्टर कडथाईन करी लिन्ही. आणि त्या डाॅक्टर नी रिपोर्ट दिन्हा की, जमनाबाईसाहेब ह्या धोयेल नही शेत... पण जमनाबाईसाहेब हायी गोट मानाले तयार नही होत्यात, तेस्नी बडोदा संस्थान ना रेसिडेंट येस्ले पत्र लिख, वैद्यकीय रिपोर्ट नी माहिती दिन्ही आणि मन्हा जिवले धोका शे, माल्हे संरक्षण द्या, मंग जमनाबाईसाहेब ना पत्र ना संदर्भ लिसन रेसिडेंट येस्नी मुंबई गव्हर्नरले सविस्तर पत्र लिख, त्या पत्रानी दखल लिसन मुंबई गव्हर्नर येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी करा करता, मुंबईथाईन तज्ञ डाॅक्टर बडोदा ले धाडात, नी वैद्यकीय तपासणी करी, त्या रिपोर्ट मजार जमनाबाईसाहेब ह्या धोयेल (गरोदर) शेत असा निष्कर्ष निंघना, आणि जमनाबाईसाहेब येस्नी राव्हानी येवस्था सरकारी रेसिडेंट बंगलावर करी, तेस्ले पोलीस संरक्षण दिन्ह, मेजर काल्स येस्ना कडे जमनाबाईसाहेब येस्ना जीव नी हमीकारी दिन्ही... इतलज नही ते मल्हारराव ह्या बायतपन करणाऱ्या सुयांसना मार्फत होणार पोर आदलीबदली करु शकतस नही ते मारी टाकथीवन हायी भिती मजार जमनाबाईसाहेब ह्या घाबरी जायेल व्हत्यात... इकडे मल्हारराव बिथरी जायेल व्हता, त्या बुध्दीभ्रष्ट भ्रमिष्ट सारखा वागेत.

               इकडे जमनाबाईसाहेब येस्ना बायतपन दिन नजीक यी ह्रायन्तांत.. तशी उत्कंठा बडोदा संस्थान मजार वाढेल व्हती, आणि तो दिन उन्हा ५ जुलै १८७१ रोजले जमनाबाईसाहेब बायतीन झायात, तेस्ले आंडेर व्हयनी, ती राजकन्या मल्हारराव येस्ले दाखाडी... पोर दखताच मल्हारराव येस्ले हर्षवाद झाया, आते बडोदा संस्थान ना मालक मीच शे, मन्हा शिवाय कोणीच नही, म्हनीसन मल्हारराव येस्नी हत्तीवर बशीसन मोठी मिरवणूक काढी... रस्तान्या दोन्ही बाजुस्ले सोनान्या मोहरी उधळ्यात... जमनाबाईसाहेब मात्र खिन्न, नी उदास झायात, जमनाबाईसाहेब आशी परिस्थिती मजार असतांना तेस्ले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख भेटनात, लोकहितवादी आमदाबादले न्यायाधीश व्हतात. बडोदा संस्थानशी तेस्ना पयले पासुन जुन्हा संबंध होतात जमनाबाईसाहेबले त्या आंडेर मानेत, जमनाबाईसाहेब येस्ना जीवले आणि तेस्नी आंडेरले धोका शे, हायी व्हयखीसन लोकहितवादी जमनाबाईसाहेब आणि आंडेर ताराराजे येस्ले पुणाले राव्हा ले लयी ग्यात, च्यार वरीस जमनाबाईसाहेब येस्नी भलता दुकना, कष्टाना दिन काढात, त्या पुणाले शनिवार पेठमजार गद्रे येस्ना वाडावर राव्हाले व्हतात.....


(संदर्भ जेव्हा गुराखी राजा होतो, लेखक मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल पुस्तक म्हायीन लेल शे...)

संकलन आणि अनुवाद

सुरेश पाटील

९००४९३२६२६.... कल्याण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...