बुधवार, ३१ मार्च, २०२१

गझल मन्ही बोलस..

 💫⚜

*◆गझल मन्ही बोलस..◆*__


💫☘ *गझलवृत्त-सौदामिनी*


________________________


नदारी दुन्याले दखाडू नको

कमाई लुटीनी कमाडू नको


रिकामा गया जो जगाले उना

लबाडी करी धन दपाडू नको


हयाती घडीनी भरोसा नही

फुकट देहले तू सजाडू नको


सहारा बनीस्नी उभारी दिन्ही

भिडू त्या कधीबी फसाडू नको


खरी संपती जप परीवारनी

जलम देवतास्ले कटाडू नको


पसारी पथारी सदानीकदा

सुखी मैतरस्ले सताडू नको


टिलकचंदबी भो उताना पडस

हुशाऱ्या करी जग चगाडू नको


✍🏼©️ *कवी-देवदत्त बोरसे*✍🏼

नामपूर ता.बागलान जि.नाशिक.

*9421501695*

_____________________▪⚜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...