≠========परनायला जाणे ==========
*************************************
दनदन.. दनदन.. दननन.. दनदन.......
छनछन.. छनछन... छननन.. छन छन....
दनदन करत चालणं हाई गाडं,
मांगे पये लगीननी जान.....
हातोया सोडी गाठपलो मारी,
लौत हिरामोतिस्नी खाण..........//ध्रु //
तुन्ही वहिलीना चाकेंस्ले, सोनारूपान्या मांडोया
आवते भवते बसन्यात, तुन्या कंडोलनी सोया...
सर्ज्या राज्यानी खुरीस्ले, नाल सोनानी रे मारी
हायद लायीनी कम्मरले, भांदी शेलाम्हा कट्यारी
दन दन करत चालणं.......1
रंगीत छकडांना दुस्सेरले, लाल लोकेरना गोंडा
मन्ही बालंगी याहीनव्हर,आज चढाऊत बोन्डा..
त्या काकन्ना धागासंगे,जिकूत चिकनी सोपारी
उपर्नाम्हा भांधी आनुत, नव्वा सोयरानी कुवारी...
दन दन करत चालणं.......2
तुन्हा सासराना देव्हडीम्हा, बामन पंचांग वाची
धुमडाना तालव्हर मोती, तुन्हा बाशिंगना नाची
शीव उनी रे धुरकरी, आठे थांबाड तुन्हा टांगा
वाजत गाजत लेवाले या, याहीले निरोप सांगा
दन दन करत चालणं.......3
============================
****************कवी ****************
--------प्रकाश जी पाटील... पिंगळवाडेकर ------
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा