☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
*अष्टाक्षरी*
*कोन करस किवना*
ताप ताप तापे सुर्या
जसं वके तोंडे ऊन ...
ल्हाई ल्हाई करे आंग
चढे माथा वरे दिन ...
फफुटानी धरी वाट
चाले लव लव पाय ...
झाड नही वाट वरे
लागे उंडायानी झय ...
वावरम्हा दिखे डोये
कायमना तो पसारा ...
मन्हा बईना जिवना
घस घस तो घसारा ...
राब राब राबे बई
कसटना तो फुलारा ...
हाते काही नही र्हाये
कायपात ना डोलारा ...
मान हेटे करी व्हढे
खांदे दुसरना भार ...
जिनगिनं गाडं व्हढे
लाये कंबरना जोर ...
नको लेजो मवरला
हाऊ जलम रे बईना ...
खस्ता खाईसन मंग
कोन करस किवना ...
✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगाव,चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५
दि.३०/३/२०२१
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा