अहिराणी कथा खान्देशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिराणी कथा खान्देशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

चाला पोरी हो पये येचाले

कथा

चाला पोरी हो पये येचाले

सूचना
या कथा मजारला बठ्ठा पात्र काल्पनिक सेतस त्यासना वास्तविक जीवनसी कोणता बी परकारना काडीमात्रना समदं नई अशी ते तो योगायोग समजी लेवा कथा लिखाना उद्देश अहिराणी बोलीना प्रचार प्रसार आनी खेडा मजारला बई राजानी आजनी खरा खातीनी परिस्थिती मांडाना हाऊ एक निस्वार्थपणा,प्रामाणिक परेत्न से ...

कथा बद्दल जराख

माघला दोन वरीस पाईन देवना पानी चांगला पडी रायना पिकं, वावर,शिवार निय्यगार से जथा तथा कामधंदानी हायतोबा घाई गर्दी से.बईराजाना वावरम्हां कामे पसात पडेल सेतस कापूस वेचाले,गहू पेराले,खत लावाले,कांदा लावाले,बारा धराले,दाना(धान्य)काढाले मजूर भेटी नई रायन.बईराजा किदरी जायेल से तो रोज मजूरना दार पुढे खेटरा झिजाई रायना आनी मजूर तेले रोज आज येसू सकाय येसू सांगी रायनं,एकंदर हाई परिस्थिती आज परतेक खेडाम्हा देखाले आयकाले भेटी रायनी,आनी या परिस्थितीम्हा बईराजा आनी मजूर यासना मजारला संवाद जराखा इनोदी कथाना रूपम्हा आपला समोर सादर करस तो तुम्हले बठ्ठासले नक्कीज आवडी आशी आशा धरस.

कथाकार 
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगांव
अहिराणी बोली कवी, गितकार,कथाकार-खान्देश
दि.२१/११/२०२०


चला तर मंग ...
आते कथाकडे जाऊत ...

चार पाच दिन पाईन नामु ताथ्या मजूरना घर चक्कर वर चक्कर मारी रायना पन एक रोज्या बी भेटत नई तरी बी आज मोठाभु
आशाना मारे मेयवालाना घर येल ऱ्हास ...

आंगल म्हा उभा राही मोठा आवाज देस ...

नामु ताथ्या :-वैनजी आहो  वैनजी ...मोठाभु सेत का घर

(घर म्हाईन वैनजी आवाज देस)
वैनजी :-कोन से ..!

नामु ताथ्या :-मी नामु ताथ्या !

वैनजी :- ताथ्या तुमीन सेतस का ? माले वाटणं परकास आप्पा सेत ! बोला काय काम काढ व्हतं आज (बठठ माहीत से तरी बी)

नामु ताथ्या :-कोना वावरम्हां जाई राईनात सकाय पये वेचाले
आमनीकडे बी या दोन चार दिन बठ्ठ वावरम्हां दही भात व्हई जायेल से !

वैनजी :-परकास आप्पां तेसना वावरम्हा जाई रायनुत रोकडा पैसा दि जायेल सेतस त्या दोन दिन पयले आज ताकना डबा देवाले ई रायनात तेसनीज वाट देखी रायनू मी शाकले कढी ऱ्हांधानी व्हती म्हनीसन !

नामु ताथ्या :-मंग काही जमाव नई सकाय ?

वैनजी :- आज नी यायनं से तेसनं पये येचानं पन अडीचशे रुप्या थाईन कालदिनज भगा मास्तर पया दि जायेल सेतस !

नामु ताथ्या :-वैनजी अशी करा मी तुमले तीनशे रुप्या रोज देस पन मना वावरम्हां पये येचाले या भलता हाल सेतस आखो देवबा वरथाईन गर्दी न्यारा करी रायना ,माघामोलना कापूसन्या कवड्या व्हई जातीन !

वैनजी :-दम खावा मी तुम्हना भाऊ ले शोधस (आज लोक भाऊले काईज ईचारेल नई)
काहो ह्या ताथ्या काय म्हनी रायनात तीनशे रूप्या रोज दी रायनात काय करतस मंग 
(आते लालूचम्हा गोट ई जास
तेवढाम्हा मोठाभु म्हनस)

मोठाभु :-काव चार दिन पयले परकास आप्पाना पया लेलं सेतस कालदिनज भगा मास्तर पाईन पया लेलं सेतस आज आखो नामु ताथ्या पाईन ली रायनी मंग सकायले का मवनदादांना वावरम्हा जासी तुनबी काही खरं दिखत नई माले !

वैनजी :-गुच्चीप बठा तुमीन तुमले काय समंजस घर येती लकशमीले असे पाठ दावनी पडस का !
ताथ्या तुमीन घर जावा निवांत आमीन येसूत सकाय तुम्हना वावरम्हां !

नामु ताथ्या :- भलता उपकार व्हतीन वैनजी तुम्हना !

दुसरा दिन सकायले

नामु ताथ्या आंगतोंड धोई मोठाभुना घर चक्कर माराले उनात आनी म्हणतस...

नामु ताथ्या :-मोठाभु ओ मोठाभु सेत का घरम्हां 

(घरम्हाथिन आवाज देस पोरगा)

पोरगा :-ताथ्या मन्हं पप्पां त्या का पायठेज गावले ग्यात !

 नामु तात्या :- आरे पन त्या ते आज मन्हा वावरम्हां येवाव व्हतात ना ? 

पोरगा :- ताथ्या आम्हनी गावनी आजी मरी गई तठे ग्यात त्या आते काही आठ दहा दिन येवात नई त्या !

नामु ताथ्या :- जाऊ दे मंग आते काय नाईलाज से तुन्ही आजलीज मरी गई मी देखस आते दुसरं कोनी भेटीन ते !

(ताथ्या आते गयरा किदरी जायेल व्हता पन काय करी मजूर ना मवरे हात टेकी देल व्हतात.चालता चालता शानाभुना घर जोडे थाईन जाई रायनथा म्हणीसन ताथ्यानी भाहीर थुन शानाभुले आवाज दिधा ...)

नामु ताथ्या :- शानाभुरे ओ शानाभु से का घरम्हां !

(तेवढाम्हा देवका धल्ली काठी टेकत टेकत भायिर उनी आनी तपकीर सुंगत सुंगत बोलनी ...)

देवका माय :-ताथ्या से का ?
(ताथ्यानी व्हकारा भरा )

नामु ताथ्या :- हवं मी ज से देवका माय !

देवका माय :- काय काम व्हतं आम्हना शान्या कडे !

नामु ताथ्या :- माय व्हका ली ऊनथू पये येचाना त्या मोठाभु नी हा सांगेल व्हतं पन तेंन्ही सासू जात रायनी त्या दोन्ही जीव वाटे लावाले चालना ग्यात 
मंग आते आईन वखतले कोनले रोजे देखु म्हणीसन उनथु शानाभु कडे कोठे जायेल से तो !

देवका माय :- काय म्हणस ताथ्या मोठाभुनी सासू मरी गई असं ! तेले मरी खायजो ... शिक्क्याले ...लबाड कथाना ...
असं सांग तुले त्या पोऱ्यानी 
अरे ताथ्या तेनी सासू दोन महिना पयले कोरोना व्हई मरी गई ह्या भडवा वाटे लावाले बी ग्यात नई कितला लबाड बोलस तो पायटेज चेटना व्हता तो घर शान्याले होका लईसनी 

नामु ताथ्या :- वं तेनी बय मारू मी तिनशे रुप्या रोज थाईन रोख पया दिधात तेले कालदिन आज तो दुसराना वावरम्हां चालना ग्या !कोना वावरम्हां ग्या तो भडवा ...

देवका माय :- तो तेन्ही ती बडबडी बायको सुंदरी आनी आमन्हा शान्या मन्ही ववू रंजी या बठ्ठा भिकारी आबाना वावरम्हां पायटेज न्याहरी बांधी 
चालना ग्यात माले दहा रूपे किलोगंती पये येचाले ...

(आते नामु ताथ्यानं कटबन जिव्हर ई जायेल व्हतं)

नामु ताथ्या :- देख देवका माय पये कसबी फुटी जायेल से एक बी मजूर भेटत नई येसनी माले हा सांग आनी खुशाल त्या भिकारी आबाना वावरम्हां चालना ग्यात हाई काही बराबर नई से ...

देवका माय :- हवं गड्या मी तेज ते म्हनी रायनथू की हाई बडबडी सुंदरी पायटेज कढीनी शाक लिसन उनी आनी आम्हना बिनडोक भेजाना वांदरेसले फिताडी गई देख ना रे भु ताथ्या !

ताथ्यानी देवका माय ले येस आस सांगी घरकडे उना आनी रिकाम्या बोन्दऱ्या लिसन वावरकडे जावाले लागना तेवढा दिवाईले येल दोन्ही आंडरी मवरे उन्यात आनी ताथ्याले बोलन्यात ...

ताथ्या आमीन बी येतीस पये येचाले वावरम्हां ...
तुमन्हा हाल देखावतस नई आमन्हा घाई ...

ताथ्या :- पोरी हो दिवाईले येल से तुम्हींन बापना घर जवाईजमले माहिती पडनं ते त्या काय म्हनतीन माले ?

आंडेर ;- काही नई बोलावं ताथ्या आमीन बी शेतकरीज सेतसना ! आनी आम्हनी माय सरगे गई तवय पाईन तुमिनज माय आनी बाप म्हनी आम्हनं बठठ करी रायनात ना !

(आते मातर नामु ताथ्याना बान फुटी जायेल व्हता ढसा ढसा रडना ताथ्या आनी सोताले सावरत आसू बंडीले पुसत बोलना ...)

नामु ताथ्या :- चाला पोरी हो 
पये येचाले बठ्ठा पये येची टाकुत दोन चार दिनम्हा मग मी तुम्हले मन्हा नातरेस्ले सहेरम्हा जाई भारी कपडा लयसू ,फटुकडा लयसू आनी तुम्हले भारी भारी साडी लयसू
सांगा बर तुमले कोनती साडी आनु बरं

दोन्ही आंडरी एक साथ :- ताथ्या आम्हले ना ...
आम्हले ना ...आते ती नवाईन येल से ती साडी लय ज्यात !
कोरोना साडी

कथा समाप्त

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...