*जव्हय एक ढोरक्या राजा व्हस*. *(जेव्हा गुराखी राजा होतो)*. . भाग... ६
गावना नजीक एक नाला व्हता, त्या मजार झेपा करता संपत, गणपत, नी खंडू येस्ना संगे गोपाळ बी जाये. हाऊ नाला म्हणजे तेस्न रमतगमत राव्हानी जागा व्हती. सकाय.. दिनमाव्हतले त्या नालावर ह्या बठ्ठा पोर रवाले जमा व्हयेत. पावसाया मजार ह्या नालाले पूर यी जाव्हा वर येन्ह पाणी, निथ्थय, निर्मळ व्हयी जाये, मंग तेन्हावर रंगीबेरंगी पोषाख मजार तरण्या पोरी, नालाना काठवर दांडगायीनीमस्ती करणारा काही पोर, आवतेभवते पसरेल निय्यगार वावर, येस्नी सय तेस्ना आंतरमन मजाय कायम व्हती. उखाजीराव काकांस्नासंगे एक सावा गोपाळ बठ्ठा भावंडस्ना संगे बैलगाडीवर वेरुळ नी लेणी दखाले जायेल व्हता. तठे आपीन काय काय मज्या दखी हायी सारख सारख आपला मयतरस्ले गोपाळ सांगे. गाव मजार धाकलुसी साय होती, पण गोपाळ साय मजार ग्याज नही. त्यामुये गोपाळ नी अक्षयव्हयख बी व्हयेल नही व्हती. पण मस्त खाव्हान, हिंदयान, निख्खयपने भवडान, नी रवान इतलाज ह्या पोरस्ना कार्यक्रम राहे, गावमजार होणाऱ्या कुस्त्या, गारुडी ना खेय, रायरंगना खेय, डोंबारीना खेय ह्या लोकस्ना खेय दखाले भेटे..
गावना शीववर मालेगाव ना राजेबहाद्दर. येस्नी शेकडो एकर गवताळी जंगल व्हत. गोपाळ जसा रवता झाया तसा ह्या जंगल मजार आप्ला मयतरस्ना संगे ढोर चाराले जाये. सकय्रा, चिंधा, ह्या भिलस्ना पोर, नी धनजी खैरनार ह्या गोपाळ ना मयतर व्हतात. गोपाळ नी माय उमामाय बाजरीना भाकर ना काला तुप गुयी टाकीसन, रायत, तिख, भात्यामजारा बांधी दे, झुयीझुयी वाहणारा वारा, नी नालाना काठवर संगे बशीसन मस्त न्यारीवर ताव मारेत, झरामजारल निरमय पाणी पेत.
काय बदली ह्रायंन्ता, कवळाणा ना गायकवाड बंधुस्ले याद व्हती की, बडोदा ना घराना संगे आम्हन नात शे. वाडवडील कडथाईन मव्हरली पिढीले माहिती मियत ह्राहे, दमाजीराव गायकवाड येस्नी आपला भाऊ प्रतापराव येस्ले वाटनीसंबंधी करी देल दोन ताम्रपट नी याद व्हती, त्या ताम्रपट तेस्ना कडे व्हतात. गयरी नादारी व्हती, नी नादारी मुये तेस्ले बडोदा ले जाता उन नही बडोदा ले जाईसन काही फायदा नही अस तेस्ले वाटे. एक सावा उखाजीराव येस्ना मनमजार उन की, बडोदाले जाव्हो, तठे नवकरी मांगो, नही ते काही पयसाआळखास्नी मदत मांगो, म्हणजे परिवार नी नादारी दुर व्हयीन, आस तेस्ना मनमा येव्हावर त्या मालेगावले ग्यात, तठे तेस्ले अचानक खंडेराव महाराज येस्ना हुजय्रा दामोदर पवार ह्या पवार वाडा मजार भेटणात. दामोदर पवार हाऊ आप्ला धाकला भाऊना करता सोयरीक दखाले निरपुर ता बागलाण आठे येल व्हतात, नी उखाजीराव येस्नी चुलतबहिण निरपुर नजीक खमतानाले देल व्हती, त्या बागमजारली सगासाई नातागोतानी चांगली माहिती उखाजीराव येस्ले व्हती, म्हनीसन दामोदर पवारना संगे त्या निरपुर ले ग्यात, नी पोरगी पसंत करीसन लगीन सोबन आयोजन बडोदाले करान ठराव. मंग निरपुर ना वायना संगे लगीन सोबन ले उखाजीराव बडोदाले ग्यात, लगीन सोबन आवरावर हुजय्रा दामोदर पवारना जेठा भाऊ गणपतरावना संगे जायीसन मोती बाग मजार खंडेराव गायकवाड येस्नी भेट लिन्ही... उखाजीराव येस्नी संगे आणेल दोन ताम्रपट खंडेराव गायकवाड येस्ले दाखाडात. उखाजीराव येस्नी तेस्ले इंनंती करी की, माल्हे आठे बडोदा संस्थान मजार कोठेतरी नेमणूक करा, नही ते तुम्हले पोरसोर नही शे, ते तुम्ही आम्हना एखादा आंडोर दत्तक लेव्हो. खंडेराव महाराज येस्नी उखाजीराव येस्ना मानपान करा, पांगोट, धोतर, उपरन, मानपान पोषाख दिन्हा नी खर्चा करता काही रक्कम दिन्ही. बाकी काही बोलना नहीत. तीन च्यार वरीस्मा खंडेराव महाराज स्वर्गे ग्यात, नी तो इषय तसाच मांगे पडना. मव्हरे जव्हय जमनाबाईसाहेब पुणाले होत्यात तव्हय उखाजीराव येस्नी तेस्नी भेट लिन्ही, जमनाबाईसाहेब येस्नी एकज सांग, जर देबाना क्रुपाथाईन जर चांगला दिन उन्हात ते मी तुम्ले नक्की मदत करसु, नी जरासाच दिन मजार एक अकल्पित बाका प्रसंग घडी उन्हा...
१८ ७५ मजार कवळाणा गाव मजार एक अकल्पित घटना घडणी, रामपायटा मजार पुरव कडथाईन काही पोलीस येतांना दिसनात, लोकस्ना मन मजार भिती, नी नवल निर्माण झाय. नजीक येव्हावर तेस्नी उखाजीराव, नी काशिराव येस्ना पोरसोरस्ना बाबत इचार पुस करी, काशिराव येस्नी सांगेल बठ्ठी गोट पोलीसस्नी नाशिकना कलेक्टरले डब्लु जी इलियट येस्ले सांगी, उखाजीराव, नी काशिराव येस्ना आंडोर बडोदाले जाणार आशी चर्चा रंगनी, बठ्ठी कडे बातमी पसरनी, तव्हय उमामाय आप्ला आंडरोस्ले घरना बाहेर निंघु नही दे.. कारण लालूच दाखाडीसन पोर पयाडी लयी जातस आसा उमामाय ना समज व्हता.....
(हाऊ लेख, अहिरानी अनुवाद मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
*क्रमशः*
आपला
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा