जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)
भाग.. ८...
काशिराव बाबा पोरस्ले लिसन बडोदाले ग्यात,हायी बातमी गावभर पसरणी. दिनमाव्हतले वडना पारवर गावनी काही मंडई बसीशन गप्पा कराले लागणात, तव्हय विठ्ठल खैरनार बोलना,
*"काशिराव पाटील ना आंडोर ले बडोदा ना राजा कराले लयीग्यात म्हणे"*..
"हावो! काय बी काय बडोदा मजार काय दुसरा पोर नसतीन का? " तेस्नी सांगो नी आपुन आयको, काशिराव पाटीलबी भरांतबी पडेल शे, उठना नी बडोदाले पयत सुटना, मी सांगस दखा कसा येतीन त्या फफुडा उडावत"आस गटलु बोरसे बोलना, न्यारा न्यारा तर्कवितर्क लढायी ह्रायन्हांत..
काशिराव बाबा बडोदाले भिडणात, मस्त हवाशिर बंगला मजार तेस्ना मुक्काम झाया. ह्या तीन धाकल्ला पोरस्माइन एक पोरग बडोदा ना अधिपती बनणार होता. जो बी बनीन तो कसा निंघीन, कस राज करीन हायी बठ्ठास्नी आचंबानी गोट व्हती. तिसरा दिन ह्या तिन्हिस्ले बी राजवाडा मजार लयीग्यात. महाराणी जमनाबाईसाहेब येस्ना समोर लयनात. तेस्नी तिन्हिस्ले प्रश्न विचारात, *"तुम्हास येथे कशासाठी आणले आहे?"*... संपतराव बोलनात *"माल्हे काय माहित"*... तोच प्रश्न दादासाहेबले इचारा, तेस्नी उत्तर दिन्ह *"शाळा शिकाडाले"*..... गोपाळला तोच प्रश्र्न इचारा, पण तेस्नी धीट हुयीसन उत्तर दिन्ह, *"मी बडोद्याचा राजा होण्यासाठी आलो आहे"*... हायी उत्तर आयीकसन महाराणी जमनाबाईसाहेब चकीत व्हयी ग्यात. नी गोपाळना चेहराकडे कवतीक मजार देखत ह्रायन्ह्यात. तेन्हा बुध्दीमान चेहरा, निश्चयी हनुवटी, तीक्ष्ण आणि भेदक डोया चेहरावरना गुढ स्वाभिमान, करारीपणा, नी उपजत बुद्धीमत्ता नी प्रचिती तेस्ले उन्ही...
जमनाबाईसाहेब येस्नी तेस्ना इस्वास मजारला लोकस्ले ह्या पोरस्नी पारख करान, नी निरीक्षण करान सांगेल व्हत. तसच रेसिडेंट मीड, दिवाण सर टी माधवराव ह्या बठ्ठास्ना निर्णय, नी जमनाबाईसाहेब येस्ना निर्णय ना मेय बसना. मंग गोपाळनी निवड पक्की व्हयनी. ह्या तिन्ही पोरस्ले कॅप मजारथुन हत्तीवर बसाड, नी वाजत गाजत बडोदा सयर मजार आण, जुना राजवाडा ना समोरला वाडा मजार येस्ना मुक्काम ठरना. आप्ला निर्णय नी इंग्रज सरकार कडथाईन परवानगी लिन्ही, तव्हय दत्तकविधी, नी राज्याभिषेकनी. तारीख पक्की करी.त्याज दरम्यान कवळाणानी मंडई बी बडोदाले भिडी जायेल व्हती २७ मे १८७५ गुरवारले राज्याभिषेक समारंभनी तयारी झायी, बठ्ठा सयर मजार, झेंडा, पताका बांधायी ग्यात, सयर सजाडी टाक, राजवाडा मजार समारंभ नी धामधूम सुरू झायी, सुंदर पेहराव करीसन, बाया, माणस, पोरसोर बठ्ठा जमा झायात, दरबारी पेहराव ना नवकर चावकरस्नी धावपय चालु व्हयनी, बठ्ठ कस उत्साहित व्हत. जुना राजवाडाना समोर दत्तकविधी ना कार्यक्रमले महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी स्वारी उन्ही, तठे बठ्ठी खान्देश नी मंडई जमा व्हयेल व्हती, कवळाणाना काशिराव गायकवाड येस्ना एक ढोरक्या आंडोर ले आज महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी दत्तक लिन्हा. *आणि गोपाळ येस्न नाव बदलीसन सयाजीराव आस ठेव*, नी साखर वाटी, तोंडे गोड करात. आणि मंग श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड येस्ले बठ्ठा लवाजमा संगे लिसन राजवाडा मजार लयीग्यात. तव्हय दरबार हाॅल आकर्षकरित्या सजाडेल व्हता. खाले जाड गालिचा, नी रुजामा आथेरल व्हतात. खिडकीस्ले मस्त मखमली परदा झुलता ठेल व्हतात, छत ले रंगबिरंगी हंडा, झुंबर, झगमगी ह्रायंतात, धूप,, अत्तर ना सुगंध दरवळी ह्रायंता, दरबार बरोबर माज भाग मजार, हिरा मोतीस्न सजाडेल चांदीन. सिंहासन व्हत. राजवाडाना बाहेर सैनिक, गोय्रा फलटनी शिस्ती. मजार उभा व्हतात, पोलीस बॅड पथक लष्करी गीत गायी ह्रायंतात,, सनई ना मंगल सुरमजार राज्याभिषेक सोडा चालु झाया, गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, नर्मदा, कावेरी अश्या सात नदीस्न पाणीवरी बाम्हनस्नी मंत्रस्ना जपकरा, विधिपूर्वक राज्याभिषेक पार पडना, अभिषेक झाया, आणि श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना मस्तक वर हिरामोती, माणिक येस्ना सजाडेल मुकुट ठेवा. आंगवर भारी कपडा घालात, भारी डागडागिने, चढावात. तिसरा सयाजीराव महाराज आस नाव लिसन जयजयकार करा, मंग तेस्ले सिंवासन वर बसाडानी तयारी चालु झायी, दिवाण सर टी माधवन येस्ना संगे महाराज पुरवदिशाले मुख करीसन उभा राहयनात, तेस्ना संगे गावनी मंडई, सरदार, कारभारी बठ्ठा उभा राहिनात, आणि मंग श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी बठ्ठास्ले अभिवादन कर नी, सिंवासनवर विराजमान झायात, ११ तोफास्नी सलामी व्हयनी, सरदार, मानकर मंडई महाराजस्ले मुजरा कराले लागणात, तेन्हा मजार पहिला मान काशिराव बाबाना व्हता. महाराज तव्हयस्नी आठवण सांगेत, *"माझ्या वृद्ध वडिलांनी जेव्हा मला वाकून मुजरा केला तेव्हा मला वाईट वाटले, अंगावर शहारे आली, आणि वाटले सुध्दा की, आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे"*.. शेवटले अत्तर, गुलाब, पानसुपारी, मिठाई, नजराणा, दानधर्म दिसन दकबारना कार्यक्रम संपन्न झाया.....
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
...
... अनुवाद..
सुरेश पाटील.... ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा