बुधवार, ३१ मार्च, २०२१

कालदिन रातले धुळ्याम्हा पाऊस पडना त्या करता हायी कविता.

 *[ कालदिन रातले धुळ्याम्हा पाऊस पडना त्या करता हायी कविता...]*   

     *हिवायाम्हा पाऊस रे*                                                                       

हिवायाम्हा पाऊस रे

तुले कोन बलावसं

येता येता सांग तुले

         हिवं नही का वाजसं॥धृ॥

बिन बलावाना सांग 

कसा पाव्हना तू यसं

पानी पाऊसना दिन

           वाट देखाले लावस॥१॥

जसा तुन्हा पावसाया

तसा हिवाया बी र्हास 

देख हिवाया बी र्हास 

          दिन मान ना रे खास॥२॥

तुन्हा बिगर धरनी

माय मन्ही  रे रडसं

तिन्हा करता कसा रे

             नही तव्हयं पडस॥३॥

बयं तूच से बयीनं

तुले हात तो जोडसं

तुन्हा बिगर तव्हयं

         पिके त्याना बयतसं॥४॥

त्याना तमासा देखस

नही तव्हयं पडस

हिवायाम्हा पाऊस रे

         तुले कोन बलावसं॥५॥

    *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये.

दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

...................................................................

हिवायाम्हा =हिवाळ्यात, तुले=तुला, बलावस=बोलावतो,

हिव=थंडी, वाजस=वाजतो, बिन बलावाना=बिना बोलवायचा, यस=येतो, पाव्हना=पाहुणा, लावस=लावतो,

पावसाया =पावसाळा, र्हास =राहतो, तुन्हा =तुझा, बिगर=शिवाय, मन्ही =माझी, तव्हय=तेव्हा, बयं=बळ, बयीनं=बळीचं, बयतस=जळतात. 

........................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...