श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार..
भाग... १०...
सोयन नामी सिक्सन आणि चांगला सवसकार ह्या भावी सुखी जीवन नी गुरुकिल्ली शे! कवळाणाले महाराज येस्ले सिक्सन ना लाभ व्हयेल नही व्हता. त्यामुये सिक्सन नी योजना, जमनाबाईसाहेब, टी माधवराव, व रेसिडेंट. येस्नी आखी, महाराज बारा वरीसना व्हतात पण तेस्ना आत्मा, नी मन सवसकारी व्हत, सुरवातले केशवराव पंडीत, जोशी उर्फ भाऊ मास्तर येस्नी मराठी, उजळणी, ते रतनराम मास्तर येस्नी गुजराथी शिकाडाले सुरवात करी. शरीर बयकट बना करता तालीम करण, नी घोडावर बसाले सुरू कर, सयरना बाहेर मोतीबाग, ह्या हवेशीर बंगला मजार शाय भरू लागणी खे खेवा करता, नामी सोय करी, सरदार, शेठ सावकार, प्रमुख अधिकारी येस्ना हुषार पोरस्न नाव त्या शायमा टाकात. ह्या शाय ना प्राचार्य म्हणून फ्रेड्रिक इलियट या उमदा सभावना इंग्रज माणुस्नी नेमणूक करी. इलियट साहेब बडोदा ना पयले वह्राडमजार सिक्सन खाताना संचालक व्हतात, तेन्हा बी पयले त्या साताराना कलेक्टर व्हतात. तेन्हामुये तेस्ले जरुसी मराठी ये, त्या देखणा, नी तेस्न व्यक्तीमत्व प्रसन्न व्हत त्या ज्ञानी व्हतात, तेस्नी महाराजस्ना करता शाय सजाडी, त्या शाय ले आदर्श शाय बनाई गयरी मोठी मोकीचोकी हायली, आकर्षिक बाग, खेव्हान मैदान, देसपरदेसना, खेयना, बॅडमिंटन, टेनिस करता न्यारा हाॅल,, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, नजीकच झेपाना तलाव, आस बठ्ठ तयार करी लिन्ह, नामी फर्निचर, नकाशा, नामी कर्तबगारी मोठा लोकस्ना फटुक, खाले मस्त गालिचा आथरेल, न्यारा न्यारा क्लासरुम, समारंभ करता मस्त टुमदार सभागृह, अशी नयी शाय सुसज्ज झायी.
महाराजस्ना संगे शाय मजार तेस्ना भाऊ संपतराव, चुलतभाऊ दादासाहेब, नी बाकीना पोर व्हतात, महाराज कसकायी अभ्यास कराले लागनात, तेन्हामुये बाकीना पोरस्ले तेस्नी मांगे पाडी दिन्ह, अभ्यास मजार स्पर्धा, बादाबादी व्हयाले जोयजे म्हनीसन त्या शाय मजार, गोडबोले, नी ढमढेरे ह्या हुशार पोरस्ले शायमा लिन्ह. तेन्हा फाइन. महाराजस्नी आजुन प्रगती वाढत गयी, तेस्नी रोजनी दिनचर्या, सकाय ६ वाजता उठीसन दंडबैठका, कुस्ती, मल्लखांब, आसा व्यायाम व्हयेत. तेन्हा नंतर घोडावर बशीसन रपेट, रपेट नंतर घंटा भर आभ्यास करेत. मंग जमनाबाईसाहेब येस्ना संगे भोजन व्हये. जेवण मजार तयेल मासा, मांस, अंडी, मसीलान्या. मस्त हिरवा भाजीपाला, नी शेवटले फयफयावन आसा बेत राहे. साडे दहा वाजता सायना पेहराव करीसन अरबी घोडावर बशीसन शायमा जायेत, संगे दोन रक्षक घोडेस्वार राहेत महाराज शाय मजार येताच पोलीस तेस्ले सलामी करे महाराज घोडावरथाइन पाय उतार व्हताज शायमा येत तव्हय, इद्यार्थी, शिक्षक उभा राहिसन मुजरा करेत, महाराज सुध्दा वाकीसन बठ्ठास्ना मुजरा आदाब मजार स्विकार करेत. वर्गाना बाहेर एक हुजय्रा थांबेल ह्राहे, उन्हाया उन्हा की एक शिपाई, छतवर लायेल कपडाना पंखा व्हढा करता बशेल ह्राहे, तठे दिनमाव्हतले ५ वाजा लगुन शाय भरे, पोर आभ्यास करेत, मधली सुट्टीना एक तास राखीसन ठेत. पाच सुटी झायी, की मंग मयदानवर, रवान चालु व्हये, खोखो, आट्यापाट्या, व्यायाम, आसा देशी खे खेयेत, टेनिस, बॅडमिंटन ह्या इदेसना खे महाराज खेत. रवाना कार्यक्रम मजार इलियट साहेब, उखाजीराव, आनंदराव, दादासाहेब, भाचे माधवराव पवार, नी गजानन शेवाळे ह्या बठ्ठा जण आनंदमजार सामिल व्हयेत. तेस्ले बठ्ठास्ले वाटे कव्हय शाय सुटीन, कव्हय मयदान मजार रवाले जासुत आस व्हये, मनमुराद रवेत, हासत खिदळत दिन जाये, तेन्हामुये मयदान बी गजबजी जाये, दिनमाव्हतले त्या सरकार वाडावर येत, गृहपाठ करेत, नी मंग भोजन करेत, नी दहा वाजता जपी जायेत, आसा हाऊ महाजस्ना आनंद ना काय मज्या मजार जाये.
नियमितपणा, नी शिस्ताना धडा महाराजस्ले भेटू लागनात महाराजस्ले जमनाबाईसाहेब सारख्या, प्रेमळ, दयाळू, करारी माय भेटेल व्हती. महाराजस्ना वायफळ लाडकोड तेस्नी करातच नही. ह्या कायनी. एक याद महाराज सांगेत *माझा राज्याभिषेक झाल्यावर मला सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळू देत नव्हते* *वडिलांची खुप आठवण येई, त्यांना भेटायला पाहिजे तशी मोकळीक नव्हती, मी जुन्याराजवाड्यातील वरच्या गॅलरीतून हातहलवुन त्यांना खुणा करीत असे. तेही मला हात हलवून प्रतिसाद देत, मला इतर मुलांमध्ये सुद्धा मिसळू देत नव्हते"*
सुरवातले, मराठी लिखण, वाचन, उजळणी नी भुगोलनी रूपरेखा इतला आभ्यास तयार झाया, तेस्ना मजार तडफ, विनय, सभ्यता नी आत्मविश्वास ह्या गुण दिसु लागणात, इलियटसाहेब शिकाडाले लागनात तव्हय एक आडचन येवु लागनी, साहेब ले पाहिजे तशी मराठी, नी महाराजस्ले पाहिजे तशी इंग्रजी जमे नही, मंग हायी अडचण सोडा करता केशवराव पंडीत येस्ले नेम, मंग त्या इलियटसाहेब ले इंग्रजी न मराठी, नी महाराजस्ले इंग्रजी नी मराठी समजाडु. लागनात, हायी बी आडचन महाराजस्नी एक वरीस्मा दुर करी. महाराजस्नी प्रगती जोरबन व्हयाले लागणी. एक वरीस नंतर परिक्षा लेव्हाले वह्राडमजारला शिक्षणखाताना प्रमुख श्रीराम जठार येस्ले बलावन कर. तेस्नी महाजस्नी प्रगती नी वाहवा करी, दोन वरीस नंतर डाॅ भालचंद्र भाटवडेकर ह्या तेस्ले रसायन शास्त्र शिकाडाले लागनात, तसच हिंदुस्थान, आणि इंग्लंड ना त्या आभ्यास करु लागणात, इंग्रजी भाषा बोलू लागणात, आभ्यास मजारला रस आणि श्रम करानी तेस्नी दानत वाढाले लागनी...
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
अनुवाद
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा