बुधवार, ३१ मार्च, २०२१

🌷🌹खान्देश🌹🌷

 🌷🌹खान्देश🌹🌷

           *********

      ....नानाभाऊ माळी

 

कोनी कन्न म्हनंस तुले

कन्नडनां घाट छावलें

कोनी कान्ह म्हनस तुले

कृष्णानं रंग रुपले.....🌺!


तून्हा भाऊभन नी गोट

घरमा कानबाईनां रोट

आंगे विंध्य सातपुडा

टाचं मारी पये घोडा..🌺!


 तथा बऱ्हाणपूरलें पयेनां

तून्हा झेंडा गाडी वूना

खुरव्हरी उना करी खुणा

धडक राहुल बारीलें वूनां.🌺!


दगड माटीन्ह्या सेंत खानी

कये सोनानं रे पानी

भुरंट खुरटम्हा तू दपेलं

पडीत खाट्यानी कहानी!...🌺!


किल्ला हुभा ताट भामेरं

मव्हरे लळीगं से थायनेरं

 व्हाये दूध तूपनां महापूर

खान्देश गायी म्हैसीस्ना घर.🌺!


केयी कपाशीन्ह्या खानी

किर्र जंगल मांगस पानी

आभीर गोतनां तू राजा

अहिर भाषानी कहानी...🌺!


राज करे शूर गवई राजा

खड्डाम्हा बठेल खान्देश

मोजा पायव्हरी कान्हदेश

तापी गिरणांना मन्हा देश..🌺!

        🌹*********🌹

      ....नानाभाऊ माळी

(मु.पो.ता.शिंदखेडा.जि.धुळे)

ह मु हडपसर, पुणे-४११०२८

  दिनांक-२८डिसेंबर२०२०

विश्व अहिराणी साहित्य संमेलन लें मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌹👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...