बुधवार, ३१ मार्च, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - राज्यकारभार* *भाग १४.*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - राज्यकारभार*

*भाग १४.*

जुना राज्यकारभार मजार गैरशिस्त तयार व्हयीसन गयरी बजबजपुरी मातेल व्हती, राज्यना मुख्य पाच इभाग व्हतात. त्या इभागले प्रांत म्हणेत, बडोदा, आम्ररेली, नवसारी, महेसाणा, नी पाटण साल्हेर पासुन उत्तरले व्दारकालगुन संस्थान ना मुलूख पसरेल व्हता. राज्य ना पसारा म्हणजे क्षेत्रफळ साडेआठ चौरस कोस व्हत. राज्यान उत्पन्न दीड कोट पेक्षा जास्त होत. जमीन सुपीक व्हती, पण पाणी जेमतेम पडे, कपाशी हायी मुख्य पीक व्हत. पाणीनी कमतरता मुये अजार मजार दुस्काय पडे, राज्यतंत्र राजानी लहरीपनावर आवलंबुन राहे. नोकरशाही मनमानी करे, दिवाणी, फौजदारी अधिकार बी महालना, मुलकी अधिकारी समाये, तेन्ही वाटीन तसा आत्याच्यार करा तरी चाले. जनता ले न्याय मियान काहीच साधन नही व्हत. कागदपत्रास्मा गयरी गफलत व्हती. राजवाडा मजारला मानिकमोती, आणि पोषाकस्नी नोंद नही व्हये. उत्पन्न कमी, नी खर्च जास्त व्हवामुये करस्ना बोझा वाढे, राजाना पाठिलागा, नी नातागोताना लोकस्ले वाटे त्या मार्गातून संपत्ती भेटे, नोकरस्ले पगार येवर नही व्हये, म्हणीसन लोकस्ना कढथाईन लाच लेव्हानी सर्रास हिंमत व्हये, पोलीस खाताले वयन राहेल नही व्हत. सिक्सना प्रसार व्हयेल नही व्हता.

             पेव्हाना पाणीनी येवस्था खुद्द सरमा सुध्दा सुदनी नही व्हती. सार्वजनिक हायल्या नही व्हत्यात, लढाया नही व्हत्यात म्हणीसन सरदार, दरकदार, खुशालचेंडू, नी रिकामचोट बनेल व्हतात. अर्थात ह्या लोक राजानी हुजरेगिरी करेत लाय घोटेत, बाकीना येले काहीना काही कुरापत्या करेत, नोकरस्मा कामकरानी चालढकलनी सवय पडेल व्हती.

        महाराजास्न सिक्सन चालु व्हत तव्हय सर टी माधवराव येस्नी राज्यामजार कायदा, येवस्था कटबन करी, न्याय निवाडा मजार सुधार करी, सार्वजनिक हायल्या बांधाले सुरवात करी, खाजगी, सरकारी खर्च ले सरळकरी टाक. पोलीस खात, वैद्यकीय खातास्नी उभारणी करी, सार्वजनिक सिक्सन चालु कर, राज्यानी कमाई वाढाई,असा सयाजीराव महाराज येस्ना करता राज्यकारभार ना रस्ता सोपा करा, त्यामुये तेस्ले आप्ला राज्यकारभार येगाने, नी चांगल्या पद्धत मजार करता उन्हा.

     राज्या मजार राज्यकारभार करा करता महाराजस्ना करता न्यारा न्यारा व्याख्यान चालु करात, महाराज येस्ले राज्य ना आधिकार सोपाडान व्हाईस राॅय लाॅर्ड रिफन येस्नी ठराव, त्या प्रमाणे आधिकार दालन ना खलिता, मुंबई ना गव्हर्नर येस्ना कडे धाड.

     आधिकार दान ना राज्यारोहण समारंभ २८ डिसेंबर १८८१ रोजी सकायले साजरा व्हयना. नजरबाग राजवाडानी मोठ्ठी जागा मजार, प्रशस्त शानियामा उभारेल व्हता. मंडप मजार रेशमी गालिचा आथरेल व्हतात, चांदीना सिंवासन ठेल व्हत, सिंवासन ना मागे चुणीदार. मलमल ना पडदा सोडेल व्हता. भालदार चोपदार, दरबारी पेहराव मजार जागा जागावर उभा व्हतात. धाकला मोठा बाया माणस्ना मंडप फुलेल व्हता. बाहेर मानवंदना करता, बडोदा, नी ब्रिटीश सरकारन्या तुकड्या उभ्या होत्यात, सकायन कव्वे उन पडेल व्हत. हवा थंडगार व्हती,आत्तरना, फुलस्ना वास पसरेल व्हता. आसा वातावरण मजार सभारंभ साजरा हुयी ह्रायंता. दरबारी उच्चा पेहराव नी माणिक मोतीस्ना डाग घालीसन महाराज मानकरी, नी हुजरास्ना संगे शामियाना मजार उनात. सर टी माधवराव गव्हर्नर साहेब येस्नी तेस्न कवतीक कर, सर्वास्ना आभिवादन ना स्विकार करीसन, मंद पावल टाकत समारंभना ठिकाणे यीसन एक आसन वर बसनात.

          मुंबई ना गव्हर्नर सर गेम्स फरगुसन येस्नी आधिकार वागना खलिता वाची दाखाडा, अभिष्टचिंतन करीसन मव्हरे म्हणेल व्हत, ब्रिटीश सरकारना संगे राजनिष्ठ राहीसन, महाराजस्नी लोक कल्याण करता वाही लेव्हो. मल्हारराव येस्नी व्यत्तय आणा, म्हणुन तेस्नी गत तशी झायी, हाऊ प्रकार इसरु नही, नी मंग तेस्नी महाराजस्ले पिरीम मजार हात धरीसन चांदीना सिंवासन वर बसाड. नी तेस्ना संगे जेवना हातले सोता बसनात. तेस्नी महाराजस्ले सन्मानित माणिक मोतीना पेहराव अर्पण करा. त्या येले बडोदा ना तोफखाना, मी ब्रिटिश तोफखाना कडथाईन सलामी दिन्ही, उत्तरादाखल करेल भाषण मजार महाराज बोलणात, "मन्हा सोतावर येल गंभीर जबाबदारीनी जाणीव माल्हे माहित शे, आप्ल कार्य कठीण ह्रायन्ह तरी, प्रजाना सुख करता प्रयत्न करान पेक्षा दुसरी गोट मन्हा करता जास्त प्रिय नही, प्रजान राखण, नी संवर्धन, हायी मनोमन इच्छा राहीन" , टायासना कयकयाट मजार महाराजास्न भासन सरन, नी सकायना कार्यक्रम सरना....

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

          सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...