बुधवार, ३१ मार्च, २०२१

🌹माय अहिरानी 🌹

 🌹माय अहिरानी 🌹

मन्ही अहिरानी बोली 

तिन्हा कसा गाऊ गुन... !

मराठीना कपायले 

सोभे आभिरनि खूण... !1

अहिरानी अहिरानी 

धार तापीनी नित्तय..... !

सोनं खान्देशनं हाई 

बाकी चौफेर पित्तय.... !2

गोड अहिरानी बोली 

जसं त्ये उसनं कांड.....!

आनी रांगडीबी तसी 

ठोके कुऱ्हाडले दांड....!3

जसं शबरीनं बोर 

थोडं गोड थोडं खट्ट.... !

मन्ही अहिरानी भाषा 

काया समारनं बट्ट.......!4

ग्यानेसरी छातीठोकी 

पाजे अमृतना घोट ........!

मन्ही अहिरानी तिले  

दाये सहदनं बोट........ !5

मऱ्हाठीना दरबारे 

गर्जी उनी अहिरानी..... !

बेरी काढेल मी तूप 

मगं..मगं.. गावरानी..... !6

मन्हा मायना व्हटस्नी 

भाषा जीवथून प्यारी.... !

तीन्ह सम्मेलन वाटे 

माले पंढोरीनी वारी......!7

🙏🙏🙏🙏🙏🙏

...........कवी............ 

प्रकाश जी. पाटील 

पिंगळवाडेकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...