☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
*काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना*
काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना !
मायले मन्हा घरम्हां आते माडी म्हनसना !!
आहिरानी बोलाले तुम्ही
लावा आते गोडी ...
कसाले कोन काय म्हनी
सरम द्याना सोडी ...
परका देशनी भाषाले
नेसाडी चोई साडी ...
मायबोली आहिरानीले
आज एकली पाडी ...
आहिरानी बोलीना मी जागर करसना ।।धृ।।
समृद्ध से आपली भाषा
मायबोली आहिरानी ...
आयका बोलाले वाटस
जशी दही दूध लोनी ...
जयगाव धुये नंदुरबार
नाशिक बागलाननी ...
कान्हाना हाऊ कान्हदेश
बोली से आहिरवानी ...
आहिरानी बोलाले मन्हा हुरूप वाढसना।धृ।
आहिरानी बोलीना इतिहास
दुनियाम्हा से भारी ...
कान्हदेशी मानोसनी मारेलसे
उद्योगधंदाम्हा भरारी ...
आहिरानी धनगोतनी देवा
मायबोली ले हुभारी ...
घरेघर मायबोलीना द्या हो
आते गोडवा ले पेरी ...
आहिरानी लिखा वाचाले मवरे चालना ।धृ।
काय सांगू दादा मी आहिरानी बोलसना ।।
मायले मन्हा घरम्हां आते माडी म्हनसना ।।
✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगाव
आहिरानी बोली कवी कान्हदेश
मो.नं.८८८८९४५३३५
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा