बुधवार, ३१ मार्च, २०२१

पयनात रोज नुस्ता

 🟢🔴🟢🔴🟢🔴🟢


*गझलवृत्त :-आनंदकंद*


*पयनात रोज नुस्ता*


भेटस नही इसावा पयनाज रोज नुस्ता

बलका मुखे नही तो दमनाज रोज नुस्ता


भाकर जरी बनाडे खायेत हात चटका

चुल्हा वरेज तावा हसनाज रोज नुस्ता


दाबी कसट कराले सीमा नही थकानी

उकडा धरेल हाते वयनाज रोज नुस्ता


पैसा नही खिसाम्हां पोटज भरे जराखं

येडाज जीव व्हई बयनाज रोज नुस्ता


देखस जरी सपन तो आशा पुरी व्हयेना

राबीसनी हयाती थकनाज रोज नुस्ता


✍️✍️कवी✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगावकर,चाळीसगांव

मो.८८८८९४५३३५

दि.११/२/२०२१


🟢🔴🟢🔴🟢🔴🟢

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...