🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
*कोन सेतस तुम्हींन*
कोन सेतस तरी तुम्हींन
तुम्हनंज तुम्ही पोखनारा
रीतनं कोन्ही बोलनं का
तेले हाटकिन टोकनारा ?
व्हयना व्हईन तरास तेले
तोज र्हास व्यक्त करनारा
कोन सेतस ह्या कोनले
चमचा,भक्त नाव देनारा ?
खरं तर याज महाभाग
र्हातस तुंबड्या भरनारा
जेना तेना पार्टीना झेंडा
मतलबनी गुंता धरनारा !
कोनलेज बोलू देवो नही
या सेतस ठेका उचलनारा
खोटं पुढे करिसनी कायम
खराना तोंडे त्या दाबनारा !
काय चालू से आठे नेमकं
से का कोन्ही तो देखनारा
गरीब रोज मरस आठे तो
तेले से का कोन्ही तारनारा ?
कान बन,डोया बन,तोंड बन
मिटी मिटी सेतस देखनारा
खेय व्हस कोन्हा आनी
मरस आठे रोजस मरनारा !
"काय येस संगे" हाई सेतस
जरी आठे न्यामीनं सांगनारा
फरक काही पडस नै कधी
जवलोक सेतस अंध्या व्हनारा !
✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर,चाळीसगाव
मो.नं.८८८८९४५३३५
दि.२१/२/२०२१
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा