बुधवार, ३१ मार्च, २०२१

खुर्ची

 ☘️🌸☘️🌸☘️🌸☘️


*अष्टाक्षरी*


*खुर्ची*


खुर्ची म्हनतस माले

मन्हा नाद नका करू

पवथीर मन्हा जीव

नका कधी कूचकरू ...


जेनी से लायकी तेले

देऊ मी कायिम थारा

आते मातर जगम्हा

व्हास उलटा वारा ...


पुढारीस्नी कसं माले

बदनाम करी टाकं

मन्हं वाला पाय व्हडी

कुसं मन्ह मोडी टाकं ...


न्याय निवाडा कराले

लायकिना बठे नही

गरीबले कधीच तो

खरा न्याय भेटे नही ...


बठे जवय मास्तर

मना वरे शायम्हान

ग्यानदान ते महान

कार्ये चाले शानम्हान ...


जाना मन्ही ती गरिमा

नशीबम्हा पदे भारी

आज से सकाय नही

द्याना माले धन्य करी ...


✍️✍️✍️

विजय व्ही.निकम

धामणगाव,चाळीसगाव

मो.नं.८८८८९४५३३५

दि.१४/३/२०२१


☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...