*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*
*भाग- ५९*
महाराज सयाजीरावस्ना प्रशासना कुशलताना बारामा नामदार गोपाळ कृष्ण गोखले येस्नी गव्हर्नर जनरल येस्ना इंपिरीयल कौन्सिमजार उल्लेख करेल व्हता. मा ना. गोखले बोलणात, "शिक्सननी महती जगदुन्यामा बठ्ठास्ले कयाले लागेल व्हत. ब्रिटिश सरकारले मन्ह आस हात जोडीसन कयकयीन सांगण शे की, प्रशासन जर नेम्मन पध्दत मजार आणि तयमय करीसन कार्य करस व्हयीन ते सक्तीना सिक्सन ना बारामा सरकारले हमखास यश येस. मी तुम्ले सयाजीराव महाराजस्ना ह्या संदर्भामजारला प्रशासकीय कुशलतेन मर्म सांगानी इच्छा करस. सयाजीराव येस्नी सक्तीन प्राथमिक मोफत सिक्सन पयले राज्यामा अमरेली तालुका मजार दहा गावस्मा चालू कये तठे तेस्नी आमना प्रमाणे यश येवावर ती योजना आख्खा तालुका मजार चालु कयी. तठे बी नामी यश मियावर तीच योजना बठ्ठा बडोदा राज्यामा तेस्नी लागु कयी आपीन हायी ध्यानमा ठेवाले जोयजे की, महाराजस्ले जे यश मियन तेन्ह कारण परवान करता करेल कल्याणकारी कामस्नी तेस्नी तयमय हायीच शे.
माजी पंतप्रधान देवेगौडा लोकसभा मजार बोलतांना सयाजीराव महाराज येस्न गौरवपूर्ण कवतीक करीसन उल्लेख करीसन बोलणात, "प्रशासनमा भ्रष्टाचार व्हनार नही आसा प्रकारणी शासन नी घडी बसाडता येस. येन्हा करता महाराज सयाजीराव येस्ना प्रशासन व्यवस्था ना आपीन बठ्ठास्नी आभ्यास कराले जोयजे आणि आमलमा आणाले जोयजे."
आपली परवान नी प्रगती साधाणा तेस्नी ध्यास लेल व्हता. त्या युरोप मजार जरी ह्रायन्हात तरी दर हाप्तामा तेस्ना कडे इकडथायीन कामना कागद पत्र टपाल करीसन जायेत नी तथायीन तेस्नावर योग्य शेरा मारीसन कागदपत्र नित्तेनेममजार वापस येत. कामन नी अधिकारस्न इभाजन तेस्नी इतल नामी करेल व्हत की तेन्हामुये रोजना राज्यकारभारमा तेस्नी सगैरहजरीमजारबी नेम्मन चाले. तेस्नी दिर्घ कायनी कारकिर्द शांततानी, भरभराटीनी वैभव नी गयी. जेल्हे आप्ला वयना बारावरीस लगुन राज्यानी धुरा वाहवान सपन बी पडेल नसीन आसा व्यक्तीनी हायी यश मियाव,येन्हामा दैवपेक्षा कर्तृत्त्वानाच जास्ती भाग शे. तस सांगान म्हणजे तेस्नामा सुप्त गुणस्नी उत्कर्ष व्हवानी तेस्ले नामी संधी मियनी हायीच खर तेस्न भाग्य.,!
महाराजस्नी इंग्रजस्ना राजव्यस्थामजारला चांगला भाग लिसन तेन्हामा आप्ली कल्पना सक्तीनी नयी गोटनी भर घाली. तेन्हामुये तेस्ना राज्यकारभारले महत्व पयदा झाय. बडोदा संस्थान मजार महाराजस्नी जुनाट. ग्रामसंस्थांन पुनर्जीवन कये. हर ग्रामपंचायत मजार गावकरीस्नी निवाडी देल नी सरकारनी नेमेल आसा सदस्य ह्राहेत. परवान न आरोग्य, पाणी पुरवठा, धाकला मोठा तंटास्ना न्यायनिवाडा करण, आखो बाकीना काही काम ग्रामपंचायत कडथाईन करी लेत. तसच तालुका पंचायत नी जिल्हापंचायत येस्ले बी आधिकार दिसन ग्रामपंचायती तेस्ले जोडी दिन्ह्यात. लोकस्नी कारभार मजार भाग लीसन स्वयंपूर्ण नी संयंसिद्द व्हवाले जोयजे आसा महाराजस्ना हेतु व्हता. १९०२ पासुन बडोदा मजार हायी व्यवस्था चालु झायी. आप्ला दिवाण रमेशचंद्र दत्त येस्ले लिखेल पत्रामजार त्या म्हणतस, "लोकस्न्या हित न्या योजना तेस्नाज हातीवरी पार पडाव्यात आस प्रकारन तेस्ले सिक्सन देवान्ह मन्ह मुख्य धोरण शे तेन्हा करता स्थानिक स्वराज्यन्या मर्यादा वाढत जाव्हाले जोयजेत. म्हणीसन ग्रामपंचायतीस्ना कडे नी तालुका पंचायतीस्ना कडे जास्ती काम देव्हाले जोयजे लोकस्नी सोताज सोताना इकास करो आस माल्हे वाटस. आप्ली कार्यक्षमता वाढावाकपरता. ज्या सवलती जोयजेत त्या राज्यकर्तास्ना जोये मांगाना लोकस्ना हक शे तश्या सवलती जर तेस्ले नही दिन्ह्यात ते तेस्ना हक्कानी चोरी करण नी निसर्ग ना अपराध करा सारख शे".
*पंचायत राज्यानी महाराजस्नी कल्पना नी आम्मलबजावनी इतली यशस्वी व्हयेल व्हती की, तोच आदर्श डोयास्ना समोर ठीसन व्दैवभाषिक मुंबई राज्याना नंतर महाराष्ट्र मजार यशवंतराव चव्हाण येस्नी नी गुजराथमजार जीवराज मेहता येस्नी पंचायत समित्या नी जिल्हा परिषदस्नी स्थापना कयी. सत्तान विकेंद्रीकरणनी सुरवात स्वतंत्र भारतमा आशी व्हयनी.*
*गुजराथमा १९६० साल ले पंचायत समित्या नी जिल्हा परिषदस्नी सुरवात झायी. तेन्हा उद्घाटन समारंभ मजार बडोदा मा गुजरात ना तियायेना राज्यपाल नवाब जंग येस्ना हातीवरी न्यायमंदिर समोरना पंटागणवर व्हयना. आप्ला भाषण मजार त्या बोलनात, "सयाजीराव महाराजस्नी ५० ते ६० वरीस पयले पंचायत राज स्थापीसन पंचायतीस्ना कारभार यशस्वी करी दाखाडा व्हता. आज बी लोकप्रतिनिधी नी अधिकारी येस्नी महाराजसाहेबस्ना आदर्श सामने ठीसन कारभार करो, येन्हा पेक्षा मी जास्ती काय सांगणार? मातर तेस्ना प्रशासनाना यशना बारामा मी मन्ही एक याद आठे नमुद करस. मी आतेच आय. सी. एस. व्हयीसन हैद्राबादले येल व्हतु. त्या सुम्मारले निजामसाहेबस्ना पाहुणा म्हणीसन हैदराबाद मजार महाराजस्न आगमन व्हयेल व्हत. मी निजामना खल्लीना नातागोताना म्हणीसन महाराजस्ना आनंददायक सहवास माल्हे तव्हय लाभना. तेस्नी बडोदा राज्यामा माल्हे मोठा हुद्दानी नवकरीन निवत दिन्ह व्हत. तव्हय मी तेस्ले बोलणु, "महाराज तुम्ही जास्ती काय परदेस मजार ह्रातस तव्हय आप्ला गैरहाजरीमा संस्थान मजार नवकरपी करण कठीण ह्राहीन.*"
*"म्हणजे मन्ही गैरहजेरीमा राज्यामा गैरव्यवस्था ह्राहीन आस तुम्हले बोलण शे का? पण आते सुध्दा बडोदा मजार बठ्ठा कामकाज ठरेल येना प्रमाणे शिस्तीमा चालु असतीन, येन्ही माल्हे खात्री शे*. *"मी त्यायेले काहीज बोलणु नही. पण जरासा येमजार मी बडोदामा फोन लायी दखा तव्हय बठ्ठ कामकाज नेम्मन चालु शे आस दिशी उन्ह*
राज्यकर्तास्नी सदा लोकस्न आदरतिरथ कराले जोयजे नी तेस्ना कडन स्वागत निवत लेव्हाले जोयजे. तेन्ही बठ्ठा प्रकारना सार्वजनिक कार्यामा हिरीकमा भाग लेवाले जोयजे. म्हणजे महाराज गणपती उत्सव सारखा धार्मिक परसंगले, सिमोल्लंघन ना येले, मोहरमाना सण ना येले, सोता हाजीर ह्राहीसन धार्मिक नी सामाजिक आचारइचार पायेत. समाजसेवान मोठ ध्येय मव्हरे ठीसन काम करत ह्राव्हाण हाऊज खरा राजधर्म शे. आस महाराजस्न मत व्हत. बडोदाले दर वरीस्ले पाच ते दाहा दरबार भरेत. दसरा, उत्रान, हुयीना फाग, महाराजस्ना जन्मदिन, आसा मुद्दाना दरबार ह्राहेत. बठ्ठी मंडयी आप्ली लायकी परमाने आप्ला आप्ला जागावर बसनात म्हणजे महाराजसाहेब, गयरा धीरगंभीर पण आनंदमा दरबार मजार येत त्यायेन्ह तेस्न चालन, नी च्यारीमेय नजर मारण बठ्ठास्ले कवतीक सारख लागे दरबारी मंडई खाडकन उठीसन उभा ह्राहेत तेस्न्या रांगास्मायीन भलता धिमी पावल टाकत डावा, जेवनीकडे दखत त्या सिंव्वासनकडे जायेत. चालत जायेत तव्हय लोकस्ना मुजरा लेत. कोणासंगे मिश्किल हासेत कोणा संगे खुशाली इचारेत. महाराज सिंव्वासनवर बसनात की दरबार चालू व्हये. सोन वाटाण, तियगुयी. नही ते नजराणा स्विकारीण हायी बठ्ठ आपटीसन आरधा पाऊन तासमा हारतुरा, आत्तर गुलाब नी पानसुपारी हुयीसन दरबार उठी जाये.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६