शनिवार, २४ एप्रिल, २०२१

काळीजना घाव*

 *काळीजना घाव*


*वावरमा उगाडस मी*

*मातीमाहीन सोनं*

*कोंब देखीसन कणीसले*

*कोणले सांगु रडगर्हानं*


*कसा जगु मी आते*

*तोंडे उन्हा-व्हता घास*

*मातीमा पेरी पैसा*

*बनना गळाना तो फास*


*कसा लेरे देवबा तु*

*मन्हा मरणवर टपना*

*पयाटीना बोंड भी का?*

 *तुन्हा डोयाम्हा खुपना*


*जगु देरे देवबाप्पा* 

*छाताडावर से कर्ज*

*अस करी नुक्सान*

*भरस का काय मरनना अर्ज*


*परतीना ऊना पाणी*

*बळीना कर्दनकाळ* 

*काळी मातीसंगे म्हणी* 

*जुळी जायल से नाळ*


*देख मन्ह कपाय*

*त्येनावर घामन्या धारा* 

*आयुष्याना ठेवस तु*

*मन्हा सातबारा कोरा*


*मायबाप सरकार*

*माले हमीना द्या भाव*

*आतेलोग घालात तुम्ही*

*काळीजवरच मन्हा घाव*


*कवी- दिपक भाऊसाहेब चव्हाण*

*शिरसगावकर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...