गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास* *भाग -४१*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास*

*भाग -४१*

                परिवारनी दृष्टीखाल महाराजस्ना काय शांततामा जायी ह्रायंन्ता. पोरबी मोठ्ठला हुयी ह्रायंन्तात. तेस्ना आभ्यासपाणीले सुरवात व्हयेल व्हती. पोरस्वर महाराणीस्नी देखरेख ह्राहे. त्या सोता तेस्ना कपडा, आभ्यास, जेवण, खेळ आखो काही गोष्टीसवर बारीकसारीक ध्यान ठेत. महाराज सोता आठवडामा दोन सावा राजपुत्रस्नी शायमा जायेत, नी तेस्ना आभ्यास तपासेत तेस्ना व्यायाम, खेळ नी आखो बाकीन्या गोष्टीस्ना करता सुधारणा सुचाडेत. मि. फ्रेंच, सरदेसाई, नी साळुंखे ह्या तीनजण राजपुत्रस्ना सर्वगुण विकासना बारामा जिम्मेदार व्हतात. कव्हय मव्हय महाराज पोरस्ना संगे आट्यापाट्या नी क्रिकेट खेयेत .

राजपुत्रस्नी सिक्सननी जिम्मेदारी मि. फ्रेंच येस्ना कडे व्हती. येययेले सिक्सनना बारामा महाराज तेस्ले सुचना करेत. इद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वातावरण ह्या नामीना सिक्सन ना च्यार घटक शेत, आस महाराज सोता मानेत. मि फ्रेंच येस्ले लिखेल पत्रामा त्या म्हणतस, "पोरस्न आरोग्यना बारामा तुम्ही चांगली कायजी करा. राजपुत्रस्नी सिक्सनले महत्व नही देणारी काही लोकस्नी इचारसरणी माल्हे आवडत नही. मन्हा आंडरोस्ले सर्वसामान्य सिक्सना शिवाय कोणतबी उपयोग मजार येणार व्यवसायन बी सिक्सन मियाले जोयजे. आशी मन्ही खास आमना शे. आस मी मुद्दाम लिखाण कारण आस शे की, सध्या जे सिक्सन मियस ते पाहिजे तस उपयोगन नही. बदलता काय मजार कोणतीबी परिस्थितीले तोंड देवाले ते समर्थ जोयजे. हल्ली संक्रमणना काय मजार मोठस्ना पोरबी बाकीना वर्गाना पोरस्नासारखा शिखेलसवरेल व्हवाले जोयजेत. पोरस्न माणसिक सिक्सनले मी जास्त महत्व देस. येन्ही जिम्मेदारी तुम्हाणावर असामुये मन्हा इचार तुम्हले मोक्या मनथाईन कळायी राहिनु. आप्ला संगे मांगे सध्या स्वार्थी नी कपटी लोकस्ना भरणा असामुये राजपुत्रस्ना मनवर कसा प्रकारनी छाप पडस, ह्या बारामा आपीन सावध राव्हाले जोयजे. पोरस्ले वाईट संगत ते लागेल नही? येन्ही खबरदारी पालकस्ना संगे शिक्षकस्नी बी लेव्हाले जोयजे. कारण पालकस्ना पेक्षा शिक्षक पोरस्ना नजीक ह्रास. आश्या गोष्टी तेस्न्या जल्दी ध्यानमा येतीस. "

               युवराज फत्तेसिंहराव येस्ले महाराजस्नी सिक्सन करता इंग्लंडले धाड. तठे ऑक्सफर्ड इद्यापीठमा तेस्ले दाखल कय. तठे आभ्यास नी खेय येस्नामा चांगली प्रगती कयी. पण ठरेल आभ्यासक्रम पुरानकरताच त्या बडोदाले वापस उन्हात. तव्हय महाराजस्ले गयर वाईट वाटन. दुसरा राजपुत्र जयसिंहराव येस्ले पयले हॅरो मजारली हायस्कूल मजार नाव टाक. तेन्हा नंतर तेस्ले आमेरीका मजार हाॅवर्ड इद्यापीठ मजार धाड. तेस्नी आमेरीका सारखा लोकसत्ताक देश मजार राहिसन शिकाले पाहिजे आशी महाराजस्नी आमना व्हती. पण तेस्नी तब्बेत नाजूक व्हती म्हनीसन तेस्नाकडथाईन पाहिजे तसा आभ्यास झाया नही. पण तरीबी त्या इद्यापीठ मजार बी ए नी परीक्षा पास व्हयन्हात. महाराजस्ना तिसरा राजपुत्र शिवाजीराव येस्नी तब्येत मस्त व्हती. माणिकराव येस्ना आखाडा मजार त्या नित्तेनेम जायेत. तेस्ले इंग्लंड मजार एक खाजगी शाय मजार टाकेल व्हत. पण त्याबी काही दिवमजार सिक्सन सोडीसन बडोदाले वापस उनात. मंग नंतर त्या मुंबई इद्यापीठनी मॅट्रिक परिक्षा पास व्हयनात. मंग नंतर त्या पुणानी डेक्कन काॅलेज मजार शिकत असतांना तेस्नी क्रिकेट खेय मजार नाव कमाव ऑक्सफर्ड मजारबी त्या शिकेत तव्हय

क्रिकेट, टेनिस खेय मजार तेस्नी नाव गाजाड व्हत. बठ्ठा राजपुत्रस्ले खेयस्नी आवड व्हती.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...