गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार* *भाग - ४७*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*

*भाग - ४७*

               आप्ला बापजादास्नी रणमयदानवर वापरेल शस्त्रास्न संकलन करीसन तेस्नी आकर्षक पध्दतमा मांडणी करीसन शस्त्रागार तयार करान आस महाराजस्नी ठराव. माणिकरावस्ना मार्गदर्शनखाल दौलतराव इंगळे येस्नी मदतलीसन जुम्मादादा व्यायामशायमजारल्या उमा सभागृहमा न्यारा न्यारा प्रकारना शस्त्र मांडीसन ठेवात. नया तरणा जुवानस्नी पिढीले ह्या शस्त्र दखतांना वाडवडीलस्न्या स्मृती जागे व्हतीन तेस्ले पराक्रम नी स्फूर्ती मियीन, असा महाराजस्ना हेतु व्हता. सध्या हायी शस्त्रागार लक्ष्मीविलास पॅलेस मजार शे तेन्ह नाव प्रतापशस्त्रागार आस ठेल शे.या शस्त्रागार मजार छत्रपती शिवाजी महाराज येस्नी तलवार, तसच अकबर, जहांगीर, औरंगजेब, राजा मानसिंग, राणा प्रताप, बाजीप्रभू देशपांडे येस्न्या तलवारी नी दांडपट्टा शेत. इराणना शाहना जंबिया, रामदासस्नी गुप्ती, टिपु सुलतान ना वाघ नख आणि ८०० वरीस पयला जुना घडावन ना आखो हत्यार नी चिलखत तेस्ना कायनुसार काचनी कपाट मजार नामी पध्दतमा मांडी ठेल शे ८०० वरीस पयले हिंदुस्थानमा तयार व्हयेल एक तलवार, जिन्हावर भलत नामी कोरीव काम करेल शे नी तिन्ह म्यान चामडी शे, ते चामड भारत मजारच कमायेल शे. ५०० वरीस पयले नेपाळ मजार तयार व्हयेल खड्गे, जोधपुरना राजाना खांडा (शस्त्र), राणा प्रताप येस्ना येना भाला, पृथ्वीराज चव्हाण येस्ना धाकलपनन चांदिन धनुष्य, शाहू महाराज येस्नी सांग नी मराठाशाहीमजारली मोठ्ठल्या गुप्त्या शेत. छत्रपती शिवाजी महाराज येस्ले पोर्तुगीज लोकस्नी तीन तलवारी देल व्हत्यात. तेन्हापयकी एक सातारा ना किल्लामा शे. दुसरी लंडन ना वस्तुसंग्रहालयमा शे, नी तिसरी बडोदामा प्रतापशस्त्रागार मजार शे. तिन्हीसवर पोर्तुगीज भाषाना अक्षर सारखाच शेत. ह्या तलवारी गयय्रा मोठ्या शेत तेस्ना वापर बहुतेक घोडासवर करेत. शिवरायास्नी भवानी तलवार ह्या तिन्हीस्मायीन कोणती शे ते सांगण कठीण शे. राणा प्रताप येस्नी गयरी जालीम इषारी जिन्हावरी माणुस्ले  जखम व्हयनी ते बरी व्हयेज नही नी देड इंच लोखंड कापणारी तलवार आठे शे. आप्ला चेतक घोडा समरणांगणवर पडना तव्हय राणा प्रताप येस्नी तेन्ही याद म्हणीसन रिकीबमजारल सोन पगाळीसन घोडाना तोंडना आकार ह्या तलवारनी मूठले देल शे. दमास्कन पोलाद वापरीसन तयार करेल टिपु सुलतान नी तलवार आठे शे. छत्रपती शिवाजी महाराज येस्नी अर्गजनी मायबी आठे शे.

              पयले उमा सभागृहमा हायी शस्त्रागार व्हत तव्हय लाॅर्ड मिंटो येस्नी भेट देल व्हती. महाराज बी संगे व्हतात मिंटोले हायी शस्त्रागार गयर आवडन. माणिकरावस्ले त्या बोलणात, "हायी शस्त्रागार इकत देतस का? ह्या शस्त्र लंडनना वस्तुसंग्रहालयमा आम्ही ठेवसुत," ह्या शस्त्र मी बापजन्मी बी इकाव नही. हायी आम्हणा देशन भुषण शे, माणिकराव निग्रहकरीसन बोलणात

      "पण तुम्ही त्या ठेवश्यात कसा? इतला बहुमोल शस्त्र ठेवाले तुम्हले नामी जागा कोठे शे?, "

    सामने उभा राहेल महाराजस्ना कडे बोट करीसन माणिकराव बोलणात," जागा चांगली नही शे ते महाराज आम्ले चांगली जागा देतीन. तेस्नी प्रेरणा लिसन आम्ही ह्या शस्त्र जमा करान काम चालु करेल शे. काहीबी झाय तरी ह्या शस्त्र मी इकाव नही, "मिंटोबी खरा देशभक्त व्हता, म्हणीसन तो माणिकरावना उत्तरवर खुष व्हयना. आणि तेन्ही सोनानी मूठ नी नामी कोरीव काम करेल तलवार माणिकरावस्ले बक्षीस दिन्ही. लगेच काही दिनमाज महाराजस्नी माणिकराव येस्नी इच्छा प्रमाणे राजवाडा मजारच शस्त्रागार तयार कये. तेज ते प्रतापशस्त्रागार. आस परमाने भारत मजार हायी एकच उत्कृष्ट शस्त्रागार शे आस म्हणतस.

     महाराणी चिमनाबाईसाहेबस्ले महाराजास्ना सहवासमुये व्यायामनी गोडी लागनी. त्या रामपायटा मजार उठीसन आंग धुयीसन ७ वाजता लगुन व्यायाम करेत. नी मंग तासभर फिराले जायेत. दिनमाव्हतले ५ वाजनात की त्या टेनिस खेवाले जायेत. टेनिस खेवाले येल मंडयी सेवटलगुन तेस्ना संगे टिके नहीत. तेस्नी आपल्या दासीस्ले प्रो. माणिकराव येस्ना कडथाइन मालीश करान सिक्सन दिन्ह. त्या दासीस्ना कडथाईन त्या मालीश करी लेत. तेस्ले घोडावर बसानी आवड धाकलपनफायीन व्हती. पडदा पध्दत ना इरुध्द राव्हामुये ह्या गोष्टीसवर तेस्नावर टीका व्हये. पण महाराज आणि महाराणी येस्नी त्या गोष्टीसवर आजिबात ध्यान दिन्ही नही. येन्हा उलट आप्ला माणस्ले व्यायाम नी गोडी लागावी म्हनीसन आट्यापाट्याना सामना राजमहाल मजार त्या आयोजित करेत. तसच सरदार, मानकरी येस्ना करता कुस्त्यास्नी दंगल राजमहाल मजार ठेत. दंगल मजार त्या सोता भाग लेत तेन्हामुये तेस्ना मजार खिलाडूवृत्ती पयदा व्हयीसन आपसमजारला तणाव नहीते दुरावा कमी व्हये. महाराजस्ना आंडोर, नातू येस्ले बी टेनिस, क्रिकेट नी पोलोसारखा मयदानी खेयस्मा प्राविण्य दाखाडीसन नामी किर्ती संपादन करेल व्हती

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे))

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...