शनिवार, २४ एप्रिल, २०२१

बाप पाठन आभाय

 बाप घरना से कणा 

जसा बाजरीना दाना

माय वळणनी खाण 

हिरवगार माळरान 


बाप पाठन आभाय 

उनमा तापस सकाय 

माय निर्मळ पाणी 

जगण करस अबादानी


बाप बैलगाडीना आक 

फिरावस संसारन चाक

माय दयान- जात 

पेटीसनी सरस  दिवानी वात


बाप कठोर नागर 

नरम करस वावर 

माय हीवायानी लेकरेसले 

उब देणारी झावर 


उभा माती विटेवरी

बाप पंढरपूरना विठ्ठल

 मायबापनं प्रेम 

बायको आल्यावर आटणं 


दिपक भाऊसाहेब चव्हाण 

9975663626

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...