*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा-व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*
*भाग ४५*
जुम्मादादा ह्या व्यायामक्षेत्रमजारला महान आदरणीय गृहस्थ बडोदान भुषण व्हतात. दादा बम्ह्रचारी व्हतात. बडोदा मजार तेस्नी गयय्रा व्यायाम शाळा काढ्यात बडोदामजारला पहिलवान मंडयीले शिस्त नी आदर्श परंपरा तेस्नी पयदा करी. दादास्नी पहिलवानस्ले प्रतिष्ठा नी मानपान प्राप्त करी दिन्हा. त्यायेले लोकस्ना आसा गैरसमज व्हता की, आकाडामा जायीसन व्यायाम नी कुस्ती करणारा लोक उडाणटप्पू ह्रातस हाऊ गैरसमज दुर करीसन शिखेलसवरेलस्ना विचारस्मा क्रांती करीसन तालमीन रुपांतर व्यायामशायना स्वरुपमा कराण कठीण काम रावसाहेब दिघे नी माणिकरावस्ना साहाय्यानी. महाराजस्नी कये. तेस्नी मदतमुये व्यायामले सांघिक स्वरुप दिसन तेन्हा शायना आभ्यासक्रम मजार समावेश करी लिन्हा. शायस्ले जोडीसन आखाडा तयार करीसन पोरस्नाकरता कुस्ती नी कसरतना शिक्षक म्हनीसन जुनाजमानाना नामचीन पहिलवानस्नी नेमणूक कयी. नी तेस्नावर देखरेख करा करता बळवंतराव निंबाळकर येस्नी निरीक्षक म्हनीसन नेमणूक कयी माध्यमिक शायास्मायीन कुस्ती, मल्लखांब, लांब उडी, उच्ची उडी, कवायत आखो बाकीना खेय शिकाडेत. काॅलेज मजार देशी विदेशी ख़ेयस्ना सामना नित्यनेम चालु ह्राहेत. तसच शायास्मायीन बालवीर सिक्सननी सोय करीसन घोडावर बसण, आग मल्हावण, पाणीमा झेपन, संकटमापडेल लोकस्ले मदत करण आखो बाकीना हिकमतना खेय शिकाडीसन तेस्नामा अष्टपैलूपणा आणेत. भानुप्रसाद दवे ह्या बालवीर सिक्सन ना कमिशनर म्हनीसन काम दखेत आबासाहेब मुजुमदार येस्नी भलता नामी असा व्यायामकोश तयार कया. व्यायाम ज्ञानकोशना दहा खंड शेत, नी तेन्हामा देशी विदेशी खेय नी खेळाडू येस्ना चितरंगस्नासंगे फायदानी माहिती देल शे. तेन्हामुये व्यायामक्षेत्रमजारली मोठी कमतरता भरी निंघनी फॅशनमुये नहिते गुलामीवृत्तीमुये परकास्ना खेयस्नाकडे आकर्षित नही व्हता, आप्ला चांगला व्यायामस्ना प्रकार टिकाडानी शिकवण तरणा जुनानस्वले माणिकरावस्नी दिन्ही. १९ २४ साल ले पॅरीसमा ऑलिंपिकनाकरता ज्या खेळाडू जायेल व्हतात, तेस्नामा बडोदाना खेळाडूस्नी आपल्या काठी नी लेक्षिमन्या सांघिक कौशल्यामुये नी कसरतीस्नी सर्वांस्नी ध्यान आप्लाकडे लायी देल व्हती. त्या खेळाडुस्ले जगदुन्याना वृत्तपत्रास्मा गयरी प्रसिद्धी मियनी व्हती. व्यायामक्षेत्रमजारली महान कामगिरीना बारामा माणिकरावस्ले महाराजस्नी राजरत्न हाऊ बहु मानपान ना किताब बहाल कया व्हता.
जुम्मादादास्न बालपण गयर मोठ रहस्यमय व्हत. तेस्ना जनम जामनगर मजार एक मुसलमान परिवारमा व्हयेल व्हता. जुम्मा पाच वरिस्ना व्हता तव्हय "सुबरात" सण ना दिन तेस्ना जेठा भाऊ फिरोज येस्नासंगे फिराले गयता. सुद नही राहयन्ही, नी त्या दूर भरकटी ग्यात. पेंढारी लोकस्नी तेस्ना आंगवरना डाग (दागिना) दखीसन दोन्हीस्ले भूल दिसन झुयीमा टाकीसन हुटवर बसाडीसन जंगलमा लयीग्यात. तेस्ना आंगवरना डाग काढी लिन्हात तेस्नी जुम्माले त्या दाट जंगलमा सोडी दिन्ह नी फिरोजले तेस्ना संगे लयी ग्यात. जुम्मा रडीरडी आदमला व्हयी ग्या नी झाड खाले जपी ग्या. योगायोगमा बडोदाना बहादुरखाॅं जमादार जोडुदारस्नासंगे चित्ता पकडाले जंगल मजार भवडी ह्रायन्तांत. तेस्ले ते पोरग सापडन. बहादुरखाॅं आनंदराव महाराजस्नी मातोश्री राजमाता येस्ना कडे त्या पोय्रा ले लयी उन्हात, नी बठ्ठा हाकीगत सांगी. राजमातानी त्या पोय्रा ले आप्लाकडे ठीलिन्ह,तेस्नी त्या पेय्रानी बठ्ठी येवस्था बकुळाबाई पिसाळ येस्ना कडे सोपी दिन्ही. तेन्हा काही ठावठिकाणा नही, तालतपास नही, तो जंगलमजार सापडामुये तेन्ह नाव जंगलीराम आस ठेव. तेन्ही कुस्ती, मल्लखांब, झेपन नी घोडावर बसण येन्हा मजार प्रावीण्य मिळाव. तेल्हे लिखता वाचता येव्हाले लागा गये. काही आरत्या, तुकाराम महाराजस्ना आभंग, नी मन ना श्र्लोक तेन्हा तोंडेपाठ झाया. तो मारुती नी उपासना करे नी मारुतीना परमभक्त झायामुये आजन्म ब्रम्हचारी राव्हानी तेन्ही शपथ लिन्ही. व्यायामना परसार करता तेन्ही सोताले झोकी दिन्ह. तेन्हा जेठा भाऊ तेन्हा तालतपास करत बडोदाले उना. आखाडामजारच तेस्नी व्हयख व्हयनी मायले भेटाकरता तो जामनगरले गया. तेन्ही भेटी व्हवामुये मायले गयरा आनंद झाया, नी हार्षवायुना झटका मजार अल्लाले प्यारी व्हयी गयी. त्या नामी हाडवयीद व्हतात. त्या आखाडामाज ह्राहेत पहिलवानस्ले डावपेच शिकाडेत. तेन्हासंगे स्वच्छता, नम्रता, शिस्त नी सेवाभावी निती तेस्नी पयदा करी. माणिकराव ह्या तेस्ना आदर्श चेला व्हतात.
१८५७ ना स्वातंत्र्ययुद्धाना येले जुम्मादादा ६२ वरिस्ना व्हतात. त्या स्वातंत्र्ययुद्धाना नेतास्ना संगे तेस्ना संबंध व्हतात. त्या नेता वेषांतर करीसन फकिरस्ना नहिते अवलियास्ना रुपलिसन बडोदाले यीसन ह्राहेत. तेस्ना मुक्काम जुम्मादादास्नी व्यायामशायमा ह्राहे. तेस्नी जेवण नी व्यवस्था माणिकराव करेत. ह्या अवलियास्न्या भेटीसमुये पैसा कमी पडे नही. उतारवयमजार आप्ला भार दुसरावर नको म्हनीसन त्या तोफखाना नी रखवाली करेत. महाराजस्नी. तेस्ले मानधन लेवानी सुचना कयी, पण दादा बोलणात, "काम कयाशिवाय पयसा लेनार नही," महाराजस्ना नाईलाज झाया मोठ्ठल्ला मोठ्ठल्ला नामचीन पहिलवानस्लेबी धरडपने कष्टाना दिन येतस, म्हनीसन तेस्ना करता काही योजना करीसन व्यायाम परसारन काम तेस्ना उतारवयमा देव्हो आशी महाराजस्नी कल्पना व्हती. तेन्हा बारामा चर्चा करा करता म्हनीसन जुम्मादादास्ले महाराजस्नी तेस्ना पॅलेसला बलाव्ह. दादा येव्हावर तेस्नासंगे महाराजस्नी महत्वानी बोलणी झायी. गप्पा चालू व्हत्यात, नी हुजय्रानी चांदीना ग्लासमा मसालान दुध पेवाकरता आणीसन दिन दादा जाव्हाले निंघताच महाराजस्नी तेस्ना हातमा च्यारशे रुप्यानी भरेल मलमलनी पिसडी तेस्ना हातमा दिन्ही. दादा मुजरा करीसन निंघनात, वापस जातांना हुजरा भेटनात, दादास्नी पिसडीमा हात घाला, नी जितला नाणा हातमा उनात तितला तेस्ले दिनात. आस वाटत वाटत आखिरशेवट बाहेरना फाटकलगुन उन्हात, नी ती उरेल पिसडी शिपाईस्ना हातमा दिसन फकिरबाबा सारखा बाहेर निंघी ग्यात. राजरत्न माणिकराव दादास्नी कडक शिस्तीमा तयार व्हयेल व्हतात. माणिकरावस्नी प्रमुख आखाडाले'जुम्मादादा व्यायाम मंदीर' आस नाव दिन्ह. आशी गाढ निस्मिम श्रद्धा दादास्ना बारामा माणिकरावस्ले व्हती. माणिकरावस्ले सहज एकसावा एकजण नी इचार, "दादा मुसलमान शेत, तरी बी तुम्हणी तेस्नावर इतली श्रद्धा काबर.?," कव्हय माणिकराव बोलणात, "गुरु शिष्यन नात जातपातनापेक्षा उच्च शे. दादा गयरा उच्च कोटीना पुजनीय व्यक्ती शेत.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा