शनिवार, २४ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक* *भाग - ५५

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*

*भाग - ५५*

               जुनी परंपरानामुये संस्थान ना कारभार मजार वायफळ खर्च गयरा मोठ प्रमाणमा व्हये. महाराजस्ले सोताले हाऊ आनुभव येल व्हता. एकसावा तेस्नी सहल निलगिरीले जायीरायंन्ती तव्हय कुन्नुर आठे मुक्काम झाया. महाराज सकायले फिराले गयात तव्हय तेस्ले सामान नी भरेल वीस बैलगाड्या बल्ला उतरतांना भेटन्यात. इतल्या गाडीस्मा सामान तरी काय हुयीन म्हनीसन महाराजस्नी चवकसी करी तव्हय कयन की, आते सध्या वापरमा नहीत त्या जुना आणि तेस्ना आवडता कपडा म्हनीसन महाराज कव्हयबी मांगतीन आसा हेतुनी आणेल फक्त एकटा महाराजस्ना कपडा वीस बैलगाडीस्मा भरेल व्हतात. चालू कामना पुरता कपडा परवास मजार कोणीबी लयस तेन्हामा राजाना कपडा शेत जास्तीत जास्त दोन गाड्या भरीसन आणत जा. पण गरीब लोकस्ना पैसानी उधळपट्टी करु नका. आसा हुकुम दिसीन आसा प्रकारना वायफळ नी वायबार खर्च कमी कया.

                   सुरुवातनी कालकिरती मजार तेस्ना संगे गयरा लवाजमा ह्राहे. उतरता काय मजार फक्त च्यार माणस लीसन प्रवास करेत. येन्हामुये खर्च, येय, वाचे. नी महाराजस्ना आत्माले बी शांती मिये.

                 महाराजस्ना सुवारवाताना दिन नी काटकसरनी एक गोट आशी शे, जयसिंगराव आंग्रे १८८५.मजार महाराजस्ना खाजगी कारभारी व्हतात. त्या मानी आणि कणखर व्हतात. महाराजस्नी पयली राणी मरावर, दुसर लगीन करान ठरण. पोरगी दखानी जिम्मेदारी नी व्यवस्था आंग्रे येस्ले करणी पडणी. च्यार पोरी महाराजस्ना पसंती करता लयनात. पसंती जाहिर व्हवावर पोरी आणि बाप वापस जाव्हाले निंघनात, ते आंग्रे येस्नी तेस्ना जाव्हान भाडतोड नी बाकीना खर्चा नी व्यवस्था कयी. त्या खर्चाले महाराज मंजुरी नही देत. त्यायेले दोन्हीस्नी बाचाबाची...

*महाराज* - *खर्चानी मंजुरी न लेता खर्च करेल चुकीना शे. तुम्ही वायफळ खर्च कया. त्या खुशीमा येल व्हतात तसा जातात. पोरीस्ना बाप पयसावालाज. व्हतात. मी खर्चाले मंजुरी देणार नही.

*आंग्रे -*...मंग हाऊ खर्च मी मन्हा पदरना भरू का काय? काम गायकवाड सरकान तेन्ह वझ मी का उचलू? मी कय ते बठ्ठ योग्य कय.

*महाराज-*बिगरकामना भरमसाठ खर्च करेल शे तेल्हे मी मंजुरी देणार नही.

*आंग्रे-*बडोदा राज्यान लवकीक समायान मन्ह काम व्हत. पाहुणास्नी नेम्मन सोय नही करतु ते बडोदा राज्याना लवकीक नही ह्राता. तुम्ले ह्या रितीरिवाज खावखेडाम्ह्यीन येल मुये माहीत नहीत. मी ते सर्व वयखस. मी मन्ह काम बजायेल शे.

*महाराज-*. तुम्ही बोलानी मर्यादा सोडी ह्रायन्हात हायी बरोबर नही.

*आंग्रे-*.. माफ करा महाराज.

महाराज धीरगंभीर झायात. काहीबी बोलणात नही. पण मंग आंग्रे येस्नी बदली खाजगी खाताम्हायीन महसूल खातामा कयी.

        पयले पयले सुरवात ना कायले आसाच एक गंभीर हमरीतुमरीना प्रसंग व्हयना व्हता. महाराजस्नी तो नामी कौशल्य वापरीसन हाताळा व्हता. महाराजस्ना दत्तक बाप कै. खंडेराव महाराज येस्ना मुसलमान धर्मकडे कल ह्राहे. त्या सोताले महंमद मोठा भक्त समजेत. तेस्नी सिद्दी सुलेमान हाऊ चेलाले सोताना आंडोर सारखा मानेल व्हता. तो नी तेन्हा मयतर अमर आणि बल्लाळ ह्या तिन्हीबी गयरा. मग्रूर व्हयेल व्हतात. त्या मोठ्ठला अधिकारीस्ना आपीमान करेत सिद्दी सुलेमान ते जेठा आधिकारी पेस्तनजी जहांगीर येस्ना वर तलवार उपसीसन आंगवर गयता. महाराजस्नी तेस्ले न्यारा न्यारा खातास्मा नवकरी दिसन आटकायी दिन्हात  पण तेस्नी काम कराण नाकारी दिन्ह. "खंडेराव महाराज येस्नी आम्ले आंडोर सारख मानेल व्हत. म्हणीसन राजपुत्रासारखी आम्हणी तैनात व्हवाले जोयजे,"आशी मागणी कयी, नी ती तीन दिन ना मजार मंजुर नही झायी ते, आम्ही आम्हना हातीवरी सरकारी तिजोरी म्हायीन तैनातनी रक्कम वसूल करसुत, आसा धमकी वजा अर्ज धाडीसन त्या तीनजण नी बाकीना पाचजण मियीसन बंदुका, पिस्तुल लिसण चिमणबागना बंगलाना आवारमा यीसन बंड कराना तयारी मजार ह्रायन्हात यीतला खालना थरवर जाव्हामुये तेस्ले पकडान वारंट काढ नी लगेच सरकारनी बावीस स्वारस्नी सैन्यानी तुकडी चिमणबागना कडे रवाना कयी. बंडखोरस्ले आखरी ताकीद दिन्ही. तेस्नी ती ताकीद नाकारताच तेस्नावर बंदुकीस्न्या फैरी झाड्यात. त्या बी लगेच झाडस्ना आडे बचावनी जागा झामलीसन गोया झाडाले लागी ग्यात. सैन्यानी तुकडी आखो जोरबंद हल्ला कया. त्या बंडखोरस्नी इतला चिवट लढा दिन्हा की, तेन्हामजारला पाचजण मरी ग्यात. नी बाकीना जायबंदी व्हयनात. ह्या प्रकरणा निष्कर्ष इतलाच की, पयली राजवट नी लाडायी ठेल कोनताबी शिरजोर लोकस्ले येन्हा मव्हरे सनदशीर अधिकारस्न बेदरकारसारख उल्लंघन करता येव्हाव नही. आस दाखाडीसन आप्ला आधिकार महाराजस्नी स्थिर कया. नी उध्दट उर्मटसवर कायमनी जरब बसाडी.

                   कोणताबी राज्यानी सुरक्षितता नी योग्यता निःपक्षपातीपणावर आवलंबी ह्रास हायी व्हयखीसन तेस्नी6१८८३ सालले न्यायकमेटी नेमी. तेस्नी ब्रिटिश कायदाना आदर्श सामने  ठिसन जुना कायदास्नी दुरुस्ती कयी. तेन्हामा स्थानिक परिस्थिती ना इचार करीसन नया कायदास्ले. मंजुरी दिन्ही. कायदानी परिक्षा पास व्हयेल नया. न्यायाधीश नेमानी प्रथा चालू कयी. लोकस्ले लगेच निःपक्षपाती न्याय मियाना बारामा महाराज लिखतस, "परवान ले न्याय मियानी सोय करी ठेवाले जोयजे. न्याय कराले जितली मुदत लागस तितली लेवाले हारकत नही, पण जास्ती फाजील येय लागाले नको. परवान ले जरासा ख़रचामा जल्दी खरा न्याय मियावा ह्या उद्देशवर मी सदा ध्यान ठेल शे. इतल करीसन बी न्याय मियना नही ते ती स्थितीन माल्हे दुःख व्हयीन. ब्रिटिशस्नी न्यायव्यवस्था ना मव्हरे आपली न्याय व्यवस्था जोयजे., "

           राज्यामा शांती सुव्यवस्था चांगली राव्हाना करता पोलीस खातानी पुनर्रचना करीसन अधिकारीस्ले नामी परकारन प्रशिक्षण देव्हानी सोय कयी. चांगली कामगिरी करणारा अदिकारीले बक्षीस नी बढती दिसन उत्तेजन मिये गुन्हास्ना तपास करता महाराजस्नी स्वतंत्र योजना तयार कयी नी शाखाना खास लोकस्ले प्रशिक्षण दिसन आखो कार्यक्षम कये. आडानी पोलीस्ले फुकटमा पाट्या पुस्तक दिसन साक्षर कये. कैदीस्ना करता बी तुरुंगमजार सुधारणा कयात. कैदीस्ले गुन्हा ना बारामा आद्दल घडाले जोयजे, नी पश्चाताप व्हयीसन भावी आयुष्य चांगली पध्दतमा जगानी आमना पयदा व्हवाले जोयजे, ह्या हेतुनी महाराजस्नी तुरुंग सुधारणा प्रयत्न कयात. तशी कैदीस्ले उद्योगधंदा नहिते शेतीन सिक्सन देव्हानी महाराजस्नी सोय कयी.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...