*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी करा दलितस्ना उध्दार*
*भाग - ५३*
महाराजस्न उत्तेजन ना सब्द आयकीसन आंबेडकरस्ना आंगमा चैतन्य सयसयु लागण. तेस्ना आंतरमनमा उत्तुंग आस महत्त्वाकांक्षीस्न बी पेरायी गये. जेठा मोठस्न दरसन आस लाभदायक ह्रास. आंबेडकर येस्नी बी महाराजस्नी देल शिष्यवृत्ती ना चांगला उपयोग कया. महाराजस्ना शब्द खरा करी दाखाडा. मुंबईनी एल्फिन्स्टन काॅलेजम्हायीन त्या बी. ए. झायात. मंग बाकीना सिक्सन करता महाराजस्नी तेस्ले आमेरीकाले धाड. तठे तेस्नी पीएच. डी हायी उच्ची पदवी मिळायी. त्या प्रबंधवर तयार ग्रंथ आंबेडकरस्नी महाराजस्ले अर्पण करीसन कृज्ञता व्यक्त कयी. उच्च सिक्सन लिसन परदेस म्हायीन आंबेडकर येताच तेस्ले बडोदा संस्थान मजार सचिवालयमा मोठ उच्चापदनी नवकरी दिन्ही. आसा उच्चपदवर त्या पयला हरिजन व्हतात. तेस्नी नेमणूक म्हणजे महाराजस्नी टाकेल समाजक्रांतीन पाउल व्हत.
आंबेडकरस्ना हातखालना सनातनी नवकर स्पर्श टायाकरता फायली टेबलवर फेकी देत. राव्हानी - खाव्हानी नेम्मन सोय नही व्हती. महाराज बी बडोदा मजार नही व्हतात. डाॅ बाबासाहेब आंबेडकर जरुसा दिन हरिजन वस्ती मजार ह्राहतात, ते महाराज म्हैसुरथायीन येव्हाववर तेस्नी सोय नक्की करतात. शिवाय हरिजन वस्तीवर तेस्ना सिक्सन ना संस्कार बी व्हतात. आखीरशेवट त्या उव्दिग्न मनःस्थितीमा मुंबईले इग्यात. तठे तेस्नी वकिली चालु करीसन दलितस्ना उध्दारन कार्य चालू कये.
दलितस्ना उध्दारन काम एक तरणा राजानी सोता पुढाकार लीसन तयमय नी यशस्वीपणानी करेल उदाहरण जगदुन्याना इतिहास मजार क्वचित घडेल व्हयीन. महाराजस्ना आदर्श ठीसन पुणा, मुंबईले अस्पृश्यस्ना उध्दार करता काम करणाऱ्या संस्था निंघण्यात.
बडोदाना वाङमय परिषदना अध्यक्ष म्हनीसन आचार्य अत्रे आप्ली याद सांगतस, "जुन्या मराठी राज्यामजारल्या ज्या ज्या उज्ज्वल आणि उदात्त परंपरा व्हत्यात, तेस्नावर संस्कार करीसन सयाजीराव महाराजस्नी तेस्न संगोपन करेल व्हत6, तेस्ना सुखकर आनुभव त्यायेले माल्हे उना. बडोदा ना दिवाण व्ही. टी कृष्णम्माचारी येस्नी मन्ही भेट सयाजीराव महाराजस्ना संगे घडायी आणी. मन्ह छापेल भाषण महाराजस्नी पयलेज वाची लेल व्हत आस वाटण. मन्हा भाषणमा डाॅ बाबासाहेब आंबेडकर येस्ना गौरवपूर्ण आसा उल्लेख करेल व्हता., "जादीभेद पुरा पोलादी चौकटमा राहिसन पृश्यअस्पृश्य भेद मांडता येव्हाव नही. हाऊ भेदाभेदना धर्मज सोडाले जोयजे, आशी वीरगर्जना करणारा डाॅ बाबासाहेब आंबेडकर ह्या कालदीस्ना आम्हना शंकराचार्य शेत." ह्या मन्हा भाषणमजारला वाक्यना उल्लेख करीसन महाराज बोलणात, "तुम्हण भाषण साहित्यविषयक ह्राहिसन बी तुम्ही तेन्हामा पुरोगामी इचार मांडात, हायी माल्हे भलत आवडन. "
महाराजस्ना दलितस्ना उध्दारना कार्या ना यश ना बारामा त्या सोता सांगतस - मी धाकला व्हतु तव्हय ढोर चाराले जावु, तव्हय आदिवासी पोर मन्हा संगे ह्राहेत. एकसंगे खेव्हान, एकसंगे भाकरी खाव्हान, एकच झरावर ओंजयीवरी पाणी पेव्हान ह्या गोष्टी खेयमेयमा व्हयेत.अस्पृश्यना संस्कार मन्हावर कवयबी झाया नहीत. त्या कायना मन्हा जिवभावना मयतर तेस्नामजारलाच व्हतात तरीबी माल्हे जातीभेदना बंधन चुकीना वाटणात. म्हणून मी त्या बंधनस्ना नायनाट कराना जोरबंद प्रयत्न कया. तेन्हामा मन्हा अधिकारीस्नी साथ मियामुये माल्हे नामी यश मियन. "
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा