*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*
*भाग - ३९*
लंडन मजार काही दिन राहिसन महाराणी नी संपतराव येस्लेसंगे लिसन महाराज आमेरीका जावाले निंघनात.तठली शैक्षणिक, औद्योगिक नी आखो बारीकसारीक परिस्थितीनी माहिती लिसन तिन्हा उपयोग आप्ला राज्याले कसा करतायीन आस दखुत अशी महाराजस्नी गयरी मनफायीन इच्छा व्हती. तेन्हाकरता त्या पेशाना जिम्मेदार आधिकारींस्नी वयख असण जरुरी व्हत. म्हणीसन लंडन मजारला आमेरीकाना वकील मि. व्हाईटलाॅ रीड येस्नी आमेरीकाना सेक्रेटरी ऑफ स्टेट येस्ले पत्र लिखीसन परिचय करी दिन्हा की, महाराज गायकवाड, नी तेस्नी महाराणी ह्या दोन्हीजन आमेरीका यीह्रायन्हात. महाराज ह्या गयरा चतुर राजा शेत, तेस्ले ब्रिटीशन राजकारण, नी तठल्या. संस्थास्नी चांगली माहिती शे. आमेरिकाले तेस्ना येव्हाना हेतु म्हणजे तठल्या शिक्षणसंस्थास्न निरिक्षण करीसन तठे आप्ला राज्याना इद्यार्थीस्ले धाडानी सोय कशी करता यीन हायी दखन शे. महाराणी ह्या बी शिकेल सवरेल शेत. आप्ली आभ्यासीवृतीना इचार करीसन महाराजस्नी आमेरितानी परिस्थितीन बारीकसारीक आवलोकन कय. हाॅवर्ड इद्यापीठले. भेट दिन्ही. तठे धर्मशास्त्रावर. एक व्याख्यान ठोक. प्रेसिडेंट रुझवेल्ट येस्नी महाराजस्ले मोठी मानपान नी मेजवानी दिन्ही राजकीय, सामाजिक नी शिक्षण क्षेत्रामजारला नामचीन लोक, नी संस्था येस्नी सत्कार समारंभ घडायी आणात.
तिकडना शिक्षणक्षेत्रास्ना तज्ञ लोकस्ले बडोदा मजारल्या शिक्षणसंस्थाले भेट कराले धाड, तेस्नी देखरेख करीसन नामी सुचना मांगाड्यात. आणि आप्ला राज्यामजार औद्योगिक साधनसंपत्तीनी देखरेख करीसन तेन्हामा कोणता नया उद्योगधंदा चालु करता यीन या संबंधाना सल्ला देवाकरता एक तज्ञ माणुस्ले बडोदाले धाड,नी तेल्हे सांग की, 'बडोदे राज्य हायी मुख्यतः कृषिप्रधान शे म्हणीसन तठे कोणताबी उद्योगधंदा चालु करना व्हयीन ते तेस्ले गरज पडणाय्रा साधनास्नकरता तठली शेतीवरज आवलंंबी राहन पडाव शे, म्हनीसन बडोदाले येणारा तज्ञस्नी तठली शेतीना परिस्थितीना पुरा आभ्यास करेल जोयजे. आमेरीकातुन वापस येवावर आपल्या गयय्रा संस्थास्ना कामकाजस्मा सुधारणा करीसन महाराजस्नी काही नया उपक्रम चालू कयात.
१९१०सालनी चीन, जपान सफरले महाराज निंघनात. रस्तावर कोलंबो, सिंगापुर मजारली परिस्थितीन आवलोकन करीसन कॅटनले रेशीम नी हस्तिदंती वस्तु येस्नी यापरी पेठ दखी. चीन मजार तेस्ना बराज जागावर सत्कार झाया. जपानले जाव्हा वर जपान सरकारनी महाराजस्ना दिमतले एक खास आगीनगाडी देल व्हती. इंडो - जपानीज संस्थास्ना तर्फे महाराजस्ले मानपान पत्र दिन्ह. तेन्हा मजार म्हणेल व्हत, "आप्ला राज्यामा सुज्ञ, नी प्रेमळ कारकिरदमा व्हयेल नैतिक नी भौतिक प्रगतीन आम्ही कवतीक करीसन आवलोकन करी ह्रायन्हुत तठे सार्वजनिक आरोग्य नी बांधकाम मजार व्हनारी प्रगती आणि प्राथमिक नी दुय्यम सिक्सन येस्ना जो उत्कर्ष हुयी ह्रायन्हा तेन्हामुये आप्ल बडोदा राज्य बाकीनास्ना करता आदर्श व्हयेल शे. आप्ला उदार, सहानुबुतीना नी कुशल राज्यव्यवस्थामुये. आपीन आम्हना आदरले नी पिरीमले पात्र शेत. "त्या सत्कारन उत्तर देतांना महाराज बोलणात," पाश्चात्य राष्ट्रस्नी ज्या नया सुधारणास्ना आवलंब करेल शे, तेस्ना स्वीकार आपीन कया नही ते आपीन मांगे पडसुत. तरीबी बठ्ठाज पाश्चात्य गोष्टीस्न अंधानुकरण करण, खरच येडापणान व्हयीन. तस न करता चांगल्या गोष्टीस्ना स्वीकार करण हाऊ उन्नतीना रस्ता शे," आणि मंग नंतर जपानना धल्ला बादशाहनी महाराजस्नी भेट लिन्ही.
पंचम जाॅर्ज येस्ना राज्यारोहण समारंभ करता महाराज वापस लंडनले ग्यात. ह्या समारंभाना निमितखाल व्हयेल कार्यक्रममजार तेस्नी हिंदी संस्थानिकस्न पुढारपण कये. थोडाज दिन मजार सर कृष्ण गोविंद गुप्ता ह्या बंगाली गृहस्थस्ले पहिलासावा भारतनामंत्रीना कौन्सिलन सभासद ना मान मियना. महाराजस्ना अध्यक्षखाल तेन्हा सत्कार कया. आप्ला भाषणना आखरी महाराज बोलणात, "माल्हे आशी आस शे की, सध्या जागे व्हयेल सदविवेक बुध्दीनी साहाय्यानी बठ्ठास्ना बाबत पिरीम नी सहकार्य पयदा हुयीसन मानवजातीना प्रश्न सोडावाले आप्ले मदत व्हयीन. जदलगुन बठ्ठ्या मानवजातीस्ना इषयी एकीनी भावना आप्ला मजार येणार नही, तदलगुन आप्ला दुराग्रहना नायनाट व्हनार नही. येन्हा करता जर आप्ला मजारला फरक ना करता येरमेरशी न झगडता आपीन समजु शकू, नी सहानुभूतीमा एकमत करीसन सहकार्य करू शकू, तव्हयच हाऊ प्रश्न सुटीन., "आशी पद्धतमुये महाराजस्ना इचार फक्त आप्ली परवान कल्याणपुरता मर्यादामा न राहता, त्या अखिल मानवजातीस्ना कल्याणना इचार कराले लागणात. नी जमीन तेवढा प्रयत्न बी कयात.
परवासना फायदा सांगेत तव्हय धार्मिक नी सामाजिक गैरसमज कश्या दुर व्हतीस ह्या संबंधमा एक भाषणमजार. महाराज बोलणात, "ज्या हाॅटेलस्मा आम्ही उतरुत तठे आम्ले स्वतंत्र येवस्था करनी पडे, तेन्हामुये खर्च जास्त वाढे. मन्हा आधिकारीस्ना आज्ञानपण ना फायदा त्या लबाड हाटेल वाला लगेच लेत. बराज येल्हे हाटेल मालक आम्हनी येवस्था कराले नाखूष ह्राहेत . कारण आम्हना सयपाक ना वास ना युरोपीन लोकस्ले गयरा तरास व्हये. एक भोंदू हाटेल मालकनी गालीचावर डाग पडणात म्हनीसन नुकसान भरपाई करी व्हती.मव्हरे आम्ले माहित पडन की त्या हाटेल वालानी आम्हना नंतर आसाच दोन लोकस्ना कडथाईन नुकसान भरपाई करी व्हती. मव्हरे मव्हरे जसा आनुभव उन्हात तसा आम्ही शाणा बनी गउत. मव्हरल्या परतेक सफर मजार आम्हन्या गैरसमजुती दुर व्हत गयात. आज नी परिस्थिती आख्खी बदली जायेल शे. आज मराठा नी बामण, दक्षिणी नी गुजराथी, हिंदु नी मुसलमान ह्या बठ्ठा लोक सलोखा करीसन ह्राही ह्रायन्हात. युरोप मजार हल्ली कितली मोठी क्रांती व्हयी ह्रायन्ही तेन्हा कडे आपीन बी ध्यान द्या, नी मंग देशभक्त ह्या नातानी आप्ला समाजन्या चालीरितस्न नी तेस्ना आचारइचारस्न परिक्षण करा. पण जे तुम्हले निरुपयोगी नी हानिकारक वाटीन तेन्हा आप्ला देश करता नी समाजकरता जरूर त्याग करा, "....
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा