शनिवार, १७ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार* *भाग - ४९*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*

*भाग - ४९*

             घोडावर बसण, शिकार करण, नेम मारण, नी बाकीना बठ्ठा लष्करी खेय खेळणे येन्हामा मियेल प्राविण्यना बारामा बडोदाना सेनापती जनरल नानासाहेब शिंदे येस्नी लिखी ठेल शे "१९८७ ना सुमारले मी महाराजस्ना ए. डी. सी. व्हतु. बडोदाना आंगेपांगे महाराज पंधरा वीस कोस मजल मारीसन येत. नी येव्हावर निस्तायपणामा पुस्तक वाचाले बशेत. एखादा प्रांत नी परिस्थिती दखाकरता त्या जव्हय जायेत तव्हय सकाय संध्याकायले घोडावर बशीसन आंगेपांगेना खेडास्मा त्या सोता भेट देत. असा प्रमाणे हरदिन तीस चायीस. कोसना चक्कर व्हये. प्रांतमजारला आम्मल, पोलीस अधिकारी,, नायब सुभेदारस्नी महाराजस्ना संगे घोडावर दौड करेत तव्हय तेस्नी त्रेधा उडे. काहीस्ले घोडावथायीन खाले उतारावर चालता बी ये नही, बराजण घोडावथायीन खाले पडी जायेत. बठ्ठा मुलकी आम्लदारस्नी प्रांतमजार घोडावर फिराले जोयजे, म्हनीसन महाराजस्नी आम्लदारस्ले घोडावर बसानी परीक्षा आवश्यक ठेल व्हती.

           १९०४ सालले महाराज पयलासावा व्दारकाले जायेल व्हतात. सरसुभा समर्थ बंदोबस्त करता तेस्ना संगे व्हतात. बडोदा राज्यानी नी जामनगरनी शीव मियस तठे महाराज धाकल्ला वाळवंट दखाले ग्यात. संगे ए. डी. सी. म्हणीसन मी व्हतु. काम उरकावर महाराज घोडावर निंघनात. त्या येले. समर्थस्नी इनंती कयी की, दिनमाव्हतनी ये व्हयेल शे5, तेन्हामुये टांगाम्हायीन जायेल बर. महाराज बोलणात, "समर्थ माल्हे जराशी जास्ती मेहनत पाहिजे येन्हा करता मी घोडावर येस, तुम्ही या टांगा मा. समर्थस्ना नाईलाज झाया. महाराजस्ले व्दारकाले भिडाले रात व्हणार व्हती. म्हणीसन टांगाम्हायीन वापस जातांना समर्थस्नी रस्तावरला बठ्ठा गावना पाटीलस्ले गावना शिववरा मशाली चेटाळीसन लोकस्ले हाजीर राव्हान सांगेल व्हत. महाराजस्ना संगे ए. डी. सी म्हनीसन मी, चाबुकस्वार अमीर अली नी रस्ता दखाकरता एक पोलीसस्वार व्हतात. पोलीसस्वारले रस्तानी माहिती नही व्हती. तेन्हामुये रस्ता चुकना. हायी महाराजस्ना ध्यानमा येताच नीट दिशा ध्यानमा ठिसन आम्ही चक्कर मारीसन वापस पयला रस्तावर वुनुत. तेवढामा रात व्हयेल व्हती,तरी बी आम्ही घोडास्ले दामटीसन चालत राह्रन्हुत. एक गावना जोये येव्हावर आम्ले मशालीस्न उजाये दिसन, ते दखीसन बठ्ठास्ले बर वाटण. 'हायी समर्थ नी समयसूचकता' आस महाराज बोलणात. चाबुकस्वार नी पोलीस येस्ना हातमा दोन मशाली दिसन आम्ही मव्हरे निंघणुत. येन्हापरमाने कितला तरी गावस्मायीन आम्ही नया मशाली लीसन, नी जुन्या तठे फेकीसन मव्हरे निंघणुत. आखीरकार दहाना सुमारले आम्ही व्दारकाले भिडणुत. समर्थ बंगलाना दारनवर महाराजस्नी वाट दखत उभा व्हतात. तेस्ले दखताच महाराज बोलणात, "समर्थ, आम्हना हट्ट न प्रायश्चित्त आम्ले मियन, तरी बी तुम्हण्या मशालीन्या बारामा समयसूचकताना. बारामा तुम्हले शाबासकी देन्हीच पडीन," घोडावथायीन उतरनात तव्हय मन्हाकडे वाकिसन त्या बोलणात, "Samarth is a man of resourcec." (समर्थ मोठा कल्पक शेत)

                महाराजस्ले नामी घोडा पायाना शोक व्हता. तेस्ले घोडास्ना नामी पारखी व्हतात. 'परीरुप' नावना निय्या रंगना अरबी घोडा तेस्ना जवानीमा आवडता व्हता. 'दमदम' नावना अरबी सुरंग गयराच देखणा व्हता लष्करी खेयस्मा नी डुकरस्नी शिकार मजार ह्या घोडानी बराबरी दुसरा कोणताच घोडा करे नही. मतीन नी मुबीन ह्या घोडा गयरा चपय नी दमदार व्हतात, प्रांतमा फिराणी कामगिरी महाराज ह्या घोडास्वर करेत. खोडास्न खाद्य, तेस्न्या खोडीना नी आखो बाकीन्या गेष्टीस्ना अभ्यास जोगळेकरस्ना ग्रंथस्मायीन महाराजस्नी करेल व्हता. तेन्हापरमाणे घोडान खोगीर, तेस्ना तबेला येन्हा बारामा माहिती त्याच ग्रंथस्मायीन करी लेल व्हती.

               १९२४ फायीन संधीवादना तरासमुये महाराजस्नी घोडावर बसण कमी कय. महाराज बडोदाले ह्रायन्हात की, रोज रामपायटम्हा ठरेल रायडींग रुटनी घोडावर फिराले जायेत. त्यायेले सुन्नाट जनावर, नहीते कुत्ला रस्तावर येणार नहीत तेन्ही कायजी पोलीस अधिकारी डोयामा तेल घालीसन करेत तेन्हामुये आपघात नी भिती नही ह्राहे.

             लष्करी खेयस्मा महाराज हर वरीस्ले भाग लेत. भरधाव घोडावर बशीसन भालावरी मेखा लेन, कड्या लेण, तलवार वरी डोक उडावान नी आखो बाकीना खेयस्मा महाराज सोता हुयीसन भाग लेत. एकसावा खेय मजार मेखा लेव्हान काम सरावर महाराजस्नी जमिनवर लिंबु ठेवान सांग, कोणताच आधिकारीले भालावरी लिंबु उखलका उन्हा नही, लगेच महाराज सोता दमदम घोडावर स्वार व्हयन्हात आणि पयला धावमजारच. भालावरी लिंबु उचला. बठ्ठा लोक आचंबा करेत नी टाटा टीपीसन महाराजस्न कवतीक कये

            डुकरस्नी शिकार नी आवड महाराजस्ले जोधपुरना प्रतापसिंह महाराजस्नी लायी. उत्राण व्हवावर मही नदीना काठवर राखेल जंगलमजार डुकरस्नी शिकारना कार्यक्रम व्हये ह्या जंगल मजार बंदुक वरी शिकार कराले मनाई व्हती. तठे डुकरस्नी शिकार घोडावर बशीसन बलम (भाला) वरी करेत श्रीमंत खाशास्ना शिवाय बाकीनास्ले तठे बंदी व्हती. युवराज फत्तेसिंहराव ह्या तेस्नी जवानी मजार निष्णात घोडास्वर व्हतात. डुकरस्नी शिकार मजार बाप आंडोरस्न्या न्याय्रा न्याय्रा पार्ट्या व्हयेत. दुपारले शिकार करीसन येव्हावर महाराजस्ना संगे पंगतन जेवण व्हये आखरी दिन नदी मजार शोभान दारुकाम करेत. आसा शिकारना हाप्ता आनंदमा पार पडे.

            वाघ, सिंव्व, गेंडा असा मोठमोठा हिंस्र जनावरस्नी गयरा सावा महाराजस्नी करेल व्हती. बराज सावा पायदय. जमिनवरथायीन बी मोठा मोठा वाघ तेस्नी मारेल व्हतात. एक सावा सोनगड ना जंगल मजार एक पटाईत वाघ नी शिकार कराले महाराज जायेल व्हतात. तो पटाईत वाघ ज्या जंगलमा व्हता त्या जंगलमा मचाण बांधासारख झाड नही व्हत. म्हणीसन उच्च वाढेल गवतम्हायीन पायपाये चालत वाघ ना तपास चालू व्हता. वाघले बाहेर काढा करता हाकाय्रा चालु व्हत्यात. महाराजस्ले लागीसन पंचवीस तीस फुटवर तो वाघ दिसना. तेन्ही तोंड फिरायीसन महाराजस्ना कडे एकसावा दख. तेवढाम्हा तेस्नी चपळाईमजार बंदुक ना चाप ताना, गुयी बरोबर वाघना दोन्ही डोयास्ना मजार कपायले लागणी. डरकायी. फोडततच तो खाले कोसना नी लगेच खलास व्हयी ग्या. तो नेम जर चुकी जाता ते गयरा बाका परसंग घडता धैर्य, प्रसंगावधान नी चपळाईमुयेच त्या ह्या प्रसंगमा वाचनात. फक्त दैवानी नही, शारिरीक सुदृढता, चिकाटी, धैर्य आणि ह्या बठ्ठास्ना संयम जेन्हाकडे शे, तेन्हीज शिकारना मर्दानी खेय खेवान. जवानीना वयमजारच नामी शिकारी व्हयेल महाराजसन निसर्गाना संगे नात जुडेल व्हत. पण जस तेस्न नयतरपन कमी व्हत गय तशी तेस्नी शिकारनी हौस कमी व्हत गयी. तेस्ना इचारी मनले वाटाले लागण की, येन्हामजार शोर्यपेक्षा क्रोयच जास्ती शे.

            नित्तेनेमना खेय, व्यायाम, मजार मजार शिकार येन्हामुये महाराजस्मा खिलाडू वृत्ती पयदा व्हयेल व्हती खेय नी शिकार येन्हामुये राज्यकारभारना माणसिक ताण कमी हुयीसन परिवारन दुःख सहीन करान अलौकिक सामर्थ्य तेस्ना मजार पयदा व्हयेल व्हत.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...