*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक*
*भाग - ५८*
महाराजस्नी आप्ली परवान मजारल अज्ञान, गैरसमज, लोकस्नाभरम, धार्मिक नी सामाजिक वाईट रितीरिवाज, नैतिक दुर्गुण नी राजकीय घाबय्रापणा, नी आखो बाकीना दोष्न निर्मुलन कराकरता शासनयंत्रणा ना चतरापना करीसन वापर कया. खर दख ते तेस्ना आवतेभवते पयलापासु सुरुवातन वातावरण काही व्यसनी लोकस्नामुये नाशी जायेल व्हत. त्या मंडईस्ना अवगुण मातर राज्यकरतास्ना मनमा घुसानी शक्यता व्हती. आणि राजाले जर एकसावा दुष्ट लोकस्नी घेरी लिन्ह ते तेन्हाम्हायीन तेन्ही सुटका व्हत नही. कठीण कार्य करणारले जर धाकलपासु आप्ला मव्हरला कार्यांनी कल्पना, शिकवण, नहीते अनुभव राहिना ते तेल्हे भांबरायेल सारख व्हत नही. पण कवळाणा सारख गावखेडाम्हायीन बडोदाना सिंव्वासनवर बशेल महाराजस्नी कल्पना बेफाम व्हती. त्यामुये अश्या कल्पना नही करेल क्रांतीव्हवावर जस काय त्या नयी परिस्थितीमा आप्ला बठ्ठा काय जायेल शे आसा सराव करीसन त्या राज्याना कारभार हाकलत ह्रायन्हात. तेन्हामाज. तेस्नी खरी गोडी शे. परवान मजार बठ्ठी कडे पसरेल अज्ञान, नी आगलबगलमा दिशी येणारी अवनती, वैफल्यमा तडफडा व्हयेल भाऊबन ना इरोध, राजकीय नड अश्या प्रतिकूल परिस्थितीमा बी महाराजस्नी कुशल शासन ना जोरवर यश प्राप्त करी लिन्ह. आप्ला राज्यानी योग्यता वाढवण म्हणजे भारत नी शान वाढीन आस त्या मानेत. येन्हामजारच तेस्ना राज्यानी मोठायकी शे.
आप्ला पत्राम्हायीन अधिकारीस्ले मार्गदर्शन करतस तव्हय त्या लिखतस - परतेकनी नीतीनी, व्यवहाराना शहाणपणामा आणि निख्कय आंतकरनमा वागो. बारीकसारीक नी क्षुल्लक गोष्टीसवर करेल कानीनजर बी कव्हय मव्हय गंभीर आडचन पयदा करणारी ठरस. हुशारी आणि तारतम्य येस्ना शाणपना करीसन वापर कराशिवाय कोणतबी काम नामी रितमा पार पडत नही आत्मइश्र्वास आणि कर्तव्यनी भावना येस्ना बिगर खमकी कृती करता येत नही.
आप्ल ध्येय उदात्त राहिन तरी चुकीना मार्गनी ती साध्य कराना प्रयत्न जर कया ते हातले काहीच लागत नही. आपण गयरा जल्दी नरवस व्हतस. म्हणीसन आपीन पयले आपयस जिरावानी कुवत ठेवाले जोयजे. म्हणजे नरवस व्हवानी पायी येणार नही. आपयशम्हायीन ज्या शिकतस त्याच मव्हरे यशस्वी व्हतस हायी आपीन सदा ध्यानमा ठेवाले जोयजे. "
आधिकारीस्वर त्या गयरा रागेभरेत आणि रागवणात तरीबी सज्जनपणा सोडे नहीत. रागेभरनात की त्या अबोला करेत नहीते बोलणात तरी बी अधिकारीस्नी कडक भाषा मजार बोलेत. मोकेबोलेल नी खर बोलेल ह्या दोन गोष्टी तेस्ले गयय्रा आवडेत. एखादा अधिकारीमजार शौर्य, सत्यप्रित ह्या गुण तेस्ना नजरमा उन ते , त्या आधिकारीले महाराज आपुलकीमा वागेत. गुणस्नी तेस्ले पारख नामी व्हती. आणि आवगुणस्नी पारख बी त्या गयरा जल्दी करेत. हापीसन काम करणारा अधिकारीस्मा दोष दिसणात ते तेस्नाकडे कानाडोया नही करेत, ती तेस्ना ध्यानमा आणीसन समजुतदारपणामा दुर करणा उपाय सुचाडेत. चांगल काम जर दिसन ते तेन्ही वाखानी करीसन काम कराले प्रोत्साहन देत. तेन्हामुये गुणस्ले उत्तेजन देवामुये आधिकारी कार्यक्षम व्हये. काम कराना येना महाराज आणि गप्पा गोष्टी करणारा येना महाराज भलता न्यारा ह्राहेत.
महाराज सोता काम मजार गर्क ह्राहेत. कै. वि द. घाटे सांगतस, "महाराज काममा इतला गढी जायेत की, मरण जरी दारणमा उन्ह तरी त्याले त्या सांगतीन, थोडस थांब रे भो,इतल काम आवरीलेस मंग येस मी. काम मजार तेस्ले येयनी सूद ह्राहे नही म्हणीसन बाजुले बशेल ए. डी. सी. कामनी ये सरावर सुचना नी घंटी वाजाळीसन देत. तरी बी तेस्न काम चालू ह्राहे. कामना तेस्ना मांगे गयरा व्याप व्हता तरी बी त्या कटायेत नही.
सोतान काम कराना बारामा त्या म्हणतस, "मी राजा शे नी राजान पवतीर कर्तव्य कराकरता ह्या येले मी बशेल शे, अशी उच्ची भावना ठिसन गंभीर चेहरा करीसन मन नी एकाग्रता करीसन त्या कामले सुरवात करेत.आनंदना, रागना, नहीते कोणताबी इकारना आहारी न जाता, तेस्नासामने येल प्रकरस्ना निकाल करेत. प्रकरस्नी खातेवार नी महत्वानुसार एक यादी तेस्ना सामने ठेल ह्राहे. तेन्हापरमाणे त्या त्या प्रकरणास्ना कागदपत्र तेस्ना टेबलवर ठेल ह्राहेत कागद कायजीलिसन वाचाणा, गरज पडनी ते नजीकना अंमलदारस्ना संगे चर्चा करानी नी तर्कशक्तीले पटीन आस सोतानी खात्री व्हवावर न्यायले धरीसन निकाल निकाल देवानी पध्दत व्हती. आप्ला कर्तवनाबारामा महाराज एकसावा बोलणात, "राजधर्म गयरा कठीण शे. तेन्हामा स्वार्थ त्याग गयरा करना पडस नी मन बी गयर खंबीर ठेवण पडस. जर राजा आप्ला लोकस्न नी मित्रपरिवारस्न सरकारी काममा आयकत बासनात नी तेस्ना सांगाप्रमाणे करत बसनु ते, काम वशिलाकरेल सारख हुयीसन लोकस्ले तरास हुयीन नी आधिकारी बी तसाच वागतीन म्हणीसन राजाले आप्ली सदविवेक बुध्दीले पटीन नी सत्य वाटीन तेच कराले जोयजे. ह्या तेस्ना उदात्त इचार तेस्नी प्रत्यक्ष कृतीमा उतारेल व्हतात.
*अरविंद घोष म्हणतस, "वर्तमान कायमा महाराजा सयाजीराव एक मोठ साम्राज्यावर शासन कराना लायरीना शेत, आणि राजनैतिक दृष्टीना बारामा बठ्ठा भारत मजार तेस्नी बराबरी कोन्हीच करू शकत नही!*. "
मोठ्ठल्ला सयरस्मा नगरपालिका स्थापीसन महाराजस्नी तेस्नाकडे लोकस्नी आरोग्य नी सुखसोयीस्न्या गोष्टी सोपी दिन्ह्यात. लोकशाही तत्वावर तेस्नी कायदामंडय(धारासभा) स्पापन कये. धारासभामा सरकारी आधिकारी नी लोकस्नी निवाडी देल सभासद ह्राहेत. अश्या गयय्रा पध्दतमा महाराजस्नी आप्ला राज्यकारभार लोकस्ना फायदाना करीसन जास्तीत जास्त लोकस्ले शासनयंत्रणा मजार सामायी लिन्ह नी लोकशाही राज्याना पाया रचा. सोता राजानीच लोकशाही रुजवावान प्रयत्न करेलन उदाहरण जगदुन्यामजारना इतिहासमा क्वचित घडेल व्हयीन. परवान ना राज्यकारभार चालावानी पात्रता येव्हो म्हणीसन तेस्नावर येयेले जिम्मेदारी टाकाना हाऊ भाग ह्रास.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा