*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*
*भाग - ४०*
युरोप मजारल्या बाकीन्या वाईट गोष्टीस्नाबारामा अँडेल्सबर्गहुन नायब दिवाण आठल्ये येस्ले लिखेल पत्रामा महाराज लिखतस, "तुम्हणा समाज मिश्र स्वरूपना शे. त्यामुये तठे गयय्रा संशयास्पद वागणुकीन्या गणिका दिशी येतीस. बराज लोक तेस्ना सहवास मजार मौजमस्ती करत ह्रातस. त्या लोकस्ना हाऊ करमणूकनाज प्रकार शे, नी म्हनीसन तठला समाजकडे, लोकस्नी नैतिक वागणूगकडे सावधगिरीमाज दखन पडीन. "
युरोपन्या चालीरीती नी आपल्याकडन्या चालीरीतीना बारामा महाराज म्हणतस," पाश्चात्त्य सिक्सनमुये आपल्या जुन्या नी लोकप्रिय संस्कृतीमजारल्या बठ्ठा मौज नी आनंद सरत जायी ह्रायन्हा हायी गयरी मोठी खेद नी गोट शे. आपल्या राष्ट्रीन्या चालीरिती आपीन जपी ठेवाले जोयजेत. तसा प्रयत्न बी कराले जोयजे. तेस्ना मांगे एक इतिहास ह्रास. येन्हा आर्थ नक्कीच ह्या बानटपणान्या बारामा नहीत. हायी एकदम खुल्ल शे.
न्याय्रा न्याय्रा विद्यास्ना नी कलास्ना आभ्यास कराले परदेस मजार जाण जरुरीन शे. आस तेस्नी कलकत्ता मजार एक व्याख्यान मजार सांग व्हत. तसच आमदाबादले औद्योगिक प्रदर्शनन उद्घाटनना येले त्या बोलनात, "जर डबुकडान पानासारख आप्ले सडान नशीन तर आप्ली व्यापारीना उन्नीतान आडे येणारा परदेशगमनना जो निषेध शे, तो आपीन झिटकारी देवाले पाहिजे. भाटिया लोकस्ना सारखा जन्मतःच व्यापारी बुध्दीना लोक ह्या येडसर समज मुये परदेस मजार जातस नही. हायी गयरी खेद करानी गोट शे.
परवासना बारामा महाराज लिखतस, "कवळाणानी गरीब संस्कृतीमा वाढेल बाया तर युरोपियन रितीरिवाज आणि एकंदर वातावरण दखीसन भांबारायी गयत्यात तेस्ले गयरा संकोच वाटे. युरोपियन बाया बी तेस्न्या नववारी पातय, कुकु, सोनाना डाग दागिना येस्ना कडे नवलकरी दखेत. युरोपन्या हर सफरमुये बडोदा राज्यामजारल्या आम्हना लोकस्न्या गैरसमजुती कमीकमी व्हयी ग्यात, नी आज ते परिस्थिती बठ्ठी बदली जायेल शे, "महाराजस्ना युरोप आमेरीका प्रवासमुये बडोदा राज्याना बराज दृष्टीनी फायदा झाया. पण तेस्ना सारखा सारखा युरोप जावामुये नी तठे गयरा दिन मुक्काम ठोकामुये बडोदा राज्यानी प्रगतीनी गती कमी व्हयनी व्हयीज. कारण प्रशासनमजारली सर्वास्मा मोठी व्यक्ती गैरहाजीर राहिनी की,तेन्हा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम व्हतसज तेन्ही जाणीव महाराजस्ले बी व्हतीच. तसा त्या सदानकदा खेद व्यक्त करेत. तेस्नी काही मौजमजा माराकरता परदेस वाय्रा नही कयात. येन्हा बारामा एकसावा त्या आप्ला नजीकना मयतरले बोलणात, "परदेस मजार एखादा सामान्य माणुस सारख माल्हे फिरता येस, आम्हन संस्थान दिल्लीना रस्तावर शे. त्यामुये कोन्ही खास स्वारी ह्रायन्ही का, गव्हर्नर, व्हाॅईसराॅय, नहिते राजराजवाडास्ना मुक्काम बडोदा मजार सदानकदा ह्रास नी तेस्ना तैयनातमुये संस्थान गयरा खर्च येस. मी परदेसले ह्रायन्हु म्हणजे हाऊ खर्च तेन्हतेन्हा टयस."सफरना बारामा हायी झायी आर्थिक नी व्यवहारीक बाजु, पण तेन्हाबारामा आप्ल खर आंतररंग तेस्नी कोल्हापूरना छत्रपती शाहू महाराजस्ले लिखेल पत्रामा उघड कर. तेस्नी लिख," आपीन जर युरोपना सफरले जर ग्यात ते युरोपखंडमजारला चित्तवेधक स्थळे नी संस्था दखानी संधी गमावू नका. आस्या संस्थास्न निरीक्षण कराशिवाय पाश्चात्य देशस्मा ज्या न्याय्रा न्याय्रा संस्कृती शेत, तेस्न तुलनात्मक ग्यान संपादन करता येणार नही,"
महाराजस्ना युरोपले जाव्हाना हेतू हाऊ तब्बेत सुधाराना व्हता. तेल्हे ज्ञानार्जन करानी जोड मियनी. पण ह्या प्रवास मजार परवानना कल्याणकरता आप्ला राज्यामा काय काय गोष्टी करता येतीन ह्या दृष्टीमा तिकडनी परिस्थितीना आभ्यास करान तेस्ना मव्हरली सफरना हेतु व्हता. प्राथमिक, नी सक्तीन फुकटन सिक्सन स्थानिक स्वराज्य संस्था, मोफत वाचनालय, आधुनिक सिक्सन ना परसार, देशी वाडयमना विकास, नगररचना, आश्या गयय्रा गोष्टी तेस्नी परदेसमा आभ्यासीसन आप्ला राज्यामा आण्यात. फायदा न्या गोष्टीस्न वर्णन, नी तेन्हावरथाईन सुचणारा इचार लिखी ठेवानी तेस्नी पध्दत व्हती. तसच परवास मजार तेस्ले ज्या इद्वान नी राजकारणी लोकस्ना संगे गाठभेट व्हयेत, तेस्ना संगे आवडता इषवर संभाषण करीसन माहिती मियायेत त्या माहिती ना बी त्या टाचन तयार करी ठेत. गयरा इंग्रज लोकस्ना संगे तेस्नी मैत्री व्हती. महाराणी व्हिक्टोरिया ते तेस्ले मानसपुत्र माने. १९०५ मजार करेल सफरी मातर भारत स्वातंत्र्याना चयवयीन सूत्रसंचालन करण, क्रातीकारस्न केंद्रस्थान पयदा करण, ह्या हेतुनी महाराजस्नी कय्रा व्हत्यात.
केल्याने देशाटन, धर्मग्रंथ अवलोकने
पंडीत मैत्री, सभेत संचार
तया मनुजा, चातुर्य येतसे फार.
हायी सुभाषित महाराजस्ना करता खर लागु पडस...
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा