, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज्यामा - व्यायाम - आरोग्य - अश्र्वारोहण-शिकार*
*भाग - ४८*
'नवसारी मजार राजरत्न देसाई येस्नी आरोग्यप्रदर्शन भरायेल व्हत. उद्घाटन ना करता श्रीमंत सयाजीराव महाराज येल व्हतात रेल्वाई स्टेशन पासुन ते सभास्थानलगुन महाराजस्ले सोनाना रथम्हायीन मिरवणूक करिसन आण व्हत. त्यायेले पिरीममा महाराजास्वर रुप्याना फुल उधळा व्हतात. उद्घाटनना समारोप करतांना महाराज बोलणात, "आरोग्यसंपन्नका हायी तुम्ही तुम्हण पवथीर कर्तव्य समजाले जोयजे. त्यामुये तुम्हणा परिवारन सुख साधायीन नी तुम्हणा दुसरावर भार पडणार नही ज्या माता राष्ट्राना बालकस्ले जन्म देतीस,तेस्ना बालक आरोग्यवान आणि जोमदार व्हतीन आशी करी देव्हान आप्ला सर्वास्ना पवथीर धर्म शे. ज्या सयरमा लोकस्नी आरोग्याना इसर पडेल दिसीन त्या सयरना कव्हयबी इकास व्हणार नही. आणि तेस्ना इकासना दिन बी उगाव नही.
१९०६ ले कलकत्ता मजार काॅंग्रेस अधिवेशन भरेल व्हत. त्या निमित्तानी तठे औद्योगिक प्रदर्शन भरेल व्हत. तठेच खेयस्नबी प्रदर्शन आयोजित करेल व्हत. तेन्हाकरता हिंदुस्थान मजारला ६४ आखाडा येल व्हतात. जपान, फ्रान्स, इंग्लंड नी अमेरिकाना बी नामचीन खेडाळु येल व्हतात. त्यायेले बडोदाना खेळाडुस्नी कौशल्यान लायक खेय करीसन दाखाडात नी सर्वास्नी तेस्न कवतीक कये. कार्यक्रमना आखीरले तेस्नी एक संघगाण म्हण. तेन्हा शेवट आसा व्हता.
बडोदा धन्य है तुझको /जहाॅं व्यायामकी महिमा //
श्री महाराज के व्दारा /प्रजाने गावो दुनियामे//
ह्या कार्यक्रम ना आध्यक्ष सोता महाराज व्हतात. तेस्ले आप्ला लोकस्ना बारामा धन्यता वाटणी.
मुंबईनी "बाॅम्बे सॅनिटरी असोसिएशन" ह्या संस्थाना व्याख्यान मालामा त्या तयमय करीसन बोलणात, "शरिरना इकासनाशिवाष निव्वय मन ना इकास माणुस्ना नैतिक सामर्थ्याले विघातक ठरस. आरोग्याना सोयना बारामा जितला जास्तीतजास्त इकास व्हयीन तितल माणुस्न आयुष्य वाढाले फायदान व्हयीन.
बडोदामजार धाकल्ल्या मोठल्ल्या व्यायामपिरीमले महाराजस्नी चालना दिसन वातावरण कस पयदा कर येन्हा बारामा कविवर्य प्राचार्य हसित बुच लिखतस, "श्रीमंत सयाजीराव महाराज व्यायामनी नियतकडे गयराच आस्थानी ध्यान देत. कारण परवान सुसंस्कृत, नितीवान, आरोग्यवान व्हवाले पाहिजे आस तेस्ले वाटे. खेळाडू, कसरतपटु ह्या देशना आधारस्तंभ शेत. खेळाडूपणामुये निर्भयता, काटकपना आसा गुण आंग मा भिनतस. बाया बी त्या कायमा व्यायाम क्षेत्रामजार मव्हरे येव्हाना करता आयकोया करेत. बडोदाना व्यायामशायस्मा तरणा जुवान ते दिसतच, पण धल्ला धुल्ला बी उत्साह मजार व्यायाम करतांना दिसतस. समाज मजार बी आते व्यायाम प्रेमीस्न मनमोक्या मनथुन कवतीक होये. काय सांगु, त्या कायना जमानाच काही न्यारा व्हता. खेय, कला, व्यायाम, समाज जागृती येस्ना जसा काही महापूर येल व्हता. तेन्ही महती आजनी येल ले सांगो तरी कस? जुम्मादादा व्यायामशायमा खेय, व्यायाम, झेपान येन्हा संगे हाड बसाडाना दवाखाना, तेन्हा करता लागणारा औसद, तेल, मलम तयार कराकरता रसायनशास्त्र हायी ते व्हतच. पण शरीर विकासनासंगे मानसिक इकास घडाले जोयजे म्हणीसन नामी वाचनालय बी व्हत. आणि मोठ्ठला लोकस्ना व्याख्यान बी भरायेत. आसा परकारे न्यारा न्यारा अंगथाइन आशी उपयोगी व्यायामशाया भारत मजार दुसरी नही शे आस माल्हे वाटस. आशी बडोदानी व्यायामक्षेत्रमजारली ख्याती उदंड शे. येस्न बठ्ठ प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान नी आश्रयस्थान श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड शेत. "
सर्वसामान्य लोकस्ले व्यायामनी गोडी लागाले जोयजे, आरोग्यानी महती कयावी, येन्हा करता महाराज राज्यामा आरोग्य प्रदर्शन भरायेत. मातास्न आरोग्य हायीच राष्ट्रान खर धन शे आस तेस्ले वाटे. त्या सदानकदा म्हणेत," बायास्ले शारिरीक कसरतनी गयरी गरज सशल शे निरक संतान व्हवा करता बाया बी निरक राहण गरन शे. पोरीस्नी शारिरीक सोय व्हावी म्हणीसन, कन्या आरोग्य मंदिर, नी स्थापना कयी. तेन्ह बठ्ठ श्रेय रावसाहेब दिघे आणि माणिकराव येस्लेच जास. सौ. मनोरमाबाई दिघे नी श्रीमती नजरबी शेख येस्नबी तेस्ले नामी साहाय्य मियेल व्हत. बाकी ना कायमा तेस्नी कन्या सुमती दिघे आणि वसुमती दिघे येस्नी मदत मियनी. तेस्न लगीन व्हवालगुन गयरी मदत कयी.
आबासाहेब मुजूमदार येस्नी पन्नास वरीस पासुन चालायेल'व्यामाम मासिक' आज बी आप्ली परंपरा टीकाळीसन शे. 'व्यायाम ज्ञानकोश' आबासाहेब येस्नी तयार कया. नी तो मोलना शे. महाराजस्ना प्रोत्साहनमुये दरवरीस्ले जागोजागी बालमहोत्सव भरायेत. मातास्नी कस राव्हान, आप्ला बालकस्न संगोपन कस करान हाऊच उद्देश ह्या बालमहोत्सव ना व्हता.' महाराणी मॅटर्निटी लीग' हायी संस्था बायीस्ना बायतपनले मदत करे, तसच औसद, सकस आण, तेस्ना आरोग्य येस्नी कायजी ले. येन्हाशिवाय स्वच्छता नी आरोग्य येस्ना संबंध आडानी बायीस्ना मनवर उसकावाना करता मजार मजार व्याख्यान भरायेत. आसामुये व्यायाम नी आरोग्यनी आवड पयदा कयामुये परवान पिरीम लाभामुये महाराजस्नीया गाजावाजा परका राज्यामा बी दिशी ये.
आज सुध्दा पयला सारखच बडोदा मजार व्यायामक्षेत्रमजारली परंपरा जतन कराना प्रयत्न चालु शे. माणिकरावस्नी परंपरा मव्हरे चालु ठेवाण बडोदाना वसंतराव कप्तान, लोणावळाना कैवल्यधामना स्वामी कुवलयानंद, नाशिकना यशवंत व्यायाम मंदिर ना महाबळ गुरुजी, अमरावतीना हनुमान व्यायामशायना अंबादास वैद्य नी अनंतराव वैद्य, दादरना समर्थ व्यायाममंदिरना श्री काळे येस्ना सारखाच बाकीना निष्ठावंतस्नी व्यायामपरसारन काम भारतभर कये. तेन्हा मजारल्या महत्वान्या व्यायाम शाया मव्हरल्या शेत. - शिवाजी मराठा सोसायटी पुणे, सिद्धनाथ आरोग्यवर्धन मंडळ म्हसवड, राष्ट्रीय शाया अंधेरी मुंबई, श्रीरामदास तालीमखाना नंदुरबार, मराठा बोर्डिंग ग्वाल्हेर, नॅशनल हायस्कूल सुरत, गुरुकुल महाविद्यालय वृंदावन, सार्वजनिक व्यायामशाया अम्मयनेर, मारवाडी हायस्कूल वर्धा, तसच धुये, शहादा, पालनपुर नी आखो. माणिकरावस्नी पाश्चात्य व्यायाम प्रकारनी जोड दिसन भारतीय व्यायामपध्दतना इकास कया.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा