*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - राजपुत्रस्ना व्यक्तीइकास*
*भाग - ४३*
सभ्यपणा आणि हिंमत आंगे आणाना प्रयत्न करा. निडरपने सत्कर्म करत ह्राव्हा. ह्याच गुणस्ना मदतम्हायीन समाधानकारक राज्य चालाव्हा करता तुम्ही समर्थ व्हश्यात. मी तुम्ले आठे आणि ऑक्सफर्डमा शक्यव्हयीन तितल सिक्सन प्राप्त करी देल शे. उच्च प्रतीन सिक्सन नी पोक्त इचार या गुणस्मुये नामी राजकर्ता का व्हता येणार नही? तुम्ही सदा परवान ना इचार तेस्न्या अपेक्षा हायी बठ्ठ आप्ला मनमजार साठी ठेवावे जोयजे. हिंदुस्थानना किर्तीवान व्यक्तीस्मा तुम्हणी गिनती व्हवाले जोयजे. तुम्ही युवराज्ञीना बुद्दीना नी तडफना नामी उपयोग करी लेव्हाले जोयजे. आस जर झाय ते तुम्हणा कितला तरी महत्त्वाना कार्यामा ती तुम्हणी सहकारी होवु शकीन. युवराज,एक खास गोट ध्यानमा ठेवाले पाहिजे की, आपीन दुसरान्या आडचनीस्नाकडे ध्यान देवाले जोयजे. तसच बठ्ठास्नासंगे पिरमथाईन वागाले जोयजे. राजकुमार, तुम्ही आपली परवान नी सिक्सन देवानी दिशा जसजशी वाढावश्यात तसतशी तुम्हणा ठिकाण नी जिम्मेदारी कमी व्हत जायीन. इतलज नही ते तुमन्हा सुधारणानाबारामा परवान ना इरोध व्हवाना संभव जास्ती ह्राहणार नही.
"संसारना बारामा कर्तव्य समाजाडीसन सांगतांना माल्हे तुम्हले इतलज सांगान जरुर वाटस की, तुम्ही संसार सुखमा सर्वस्वी मगम ह्राव्हान नही. मित्रस्ना नी नातेवाईकस्मा हासळतखिदळत तुम्हणी ये खर्च करीसन चालाव नही, तुम्हणा प्रपंच बठ्ठा काम आवरीसन बाकीनी ये परवान (प्रजा) ना सुखदुःख करता खर्च कराले जोयजे. राजकुमार, ह्या बठ्ठ्या गोष्टीस्न तुम्ही चिंतन करश्यात नी आम्मल करानी कोशिश करश्यात आसा इश्वास करस. असो माफ करा मयतरस्वन, मन्ह भासन जास्ती लांबी गये. आपीन जेवण करता उत्सुक शेत, आप्ले बठ्ठास्ले शुभेच्छा दिसन आप्ली रजा लेस.
मव्हरे बराच वरीस्मा राजपुत्र युवराज प्रतापसिंह येस्ले महाराजस्नी राजकोटना प्रिन्स काॅलेजम्हायीन काढीसन पुणाले फग्र्युसन काॅलेजमा नाव लिख. तेन्हा नंतर तेस्ले उपदेश करीसन महाराजस्नी पत्र लिख. त्या पत्रामा महाराज म्हणतस, "युवराज, आप्ले प्रिन्स काॅलेजम्हायीन काढीसन सामान्य इद्यार्थीस्ना काॅलेजमा नाव टाक येन्ह कदाचित तुम्ले वाईट वाटन हुयीन. पण तेन्हा मांगे मन्हा गयरा न्यारा आणि चांगला हेतु शे. येन्हा पयले मी तुम्हणा वडील कै. युवराज फत्तेसिंहराव आणि तेस्ना भाऊ येस्ले इंग्लंड, आमेरिकान्या नामचीन इद्यापीठस्मा धाडेल व्हत कारण माल्हे सोताले जव्हय पाहिजे तव्हय सिक्सन मियन नही,तस तेस्ना बारामा घडाले नको हायी मन्ही आमना व्हती. पण त्या कव्व्या वयम्हाज परिवारफायीन गयरा दुर राव्हामुये, नही ते संगतगुण मुये अपेक्षा सारखा नामी परिणाम व्हयना नही. तीच गोट आप्ला बारामा होवु नये आस माल्हे मनफायीन वाटस. माल्हे आस बी वाटस की, पुणानी काॅलेजमजार तुम्ले सिक्सन ते नामी मियीनच, तेन्हा संगे तुम्ले सामान्य परिवारना पोरस्ना संगे मियीमिसळीसन ह्राहता यीन. नी त्यामुये तेस्न्या आडचनी, सुखदुःख येस्नी व्हयख व्हयीन. तेन्हा मव्हरे तुम्ले राज्यकारभार चालावाले नामी उपयोग व्हयीन. दुसर आस की, त्या काॅलेजले लो. टिळक, आगरकर, व ना गोखले येस्नी थोर परंपरा लाभेल शे. तेन्हासंगे महाराष्ट्रीय संस्कृतीन हायी केंद्र शे, म्हनीसन तुम्हणा टवर पुणेरी संस्कार व्हवाले जोयजेत आस माल्हे वाटस. मन्हा सद्हेतु आपीन समजी लिश्यात नी आम्हनी आमनापरमाने बठ्ठागुणस्नी प्रगती करी दाखाडश्यात आशी आस धरस."
*महाराजस्नी कडक शिस्त नी हिसाबीपणामुये राजपरिवारमजारला बराज व्यक्ती नाराज ह्राहेत*. *तेन्ह एक उदाहरण - राजपरिवारमजारला हर व्यक्तीले वरला खर्चाकरता ठरावीक रक्कम इतमामापरमाणे खानगीम्हायीन मिये. धाकला राजपुत्र धैर्यशीलराव ह्या महाजस्ना जास्ती लाडकोडना व्हतात. तेस्ले ठरायेल रक्कम कमी पडे, म्हनीसन महाराजस्ले भेटीसन तेस्नी आप्ली नड सांगी. महाराजस्नी तेस्ले समाजाडीसन सांग, "खर्चामा आपीन कंजुसी कराले जोयजे. हायी सवय धाकलपणफायीन लायी लेव्हाले जोयजे. हायी सवय मी धाकलपने लायी लेल व्हती* 'तेन्हावर धैर्यशीलराव बोलणात," *महाराज, मी राजपत्र शे*. *माल्हे तसाच रुबाबमा वागण पडस*. *तुम्हणी गोट न्यारी व्हती. तुम्ही धाकलपने राजपुत्र नही विहतात.' आस बोलण आयकीसन महाराज व्यथित हुयीसन बोलणात," राजकुमार, परवानना पैसा आप्ली मौजमस्ती करता खर्च करण चुकीन शे, हायी तुम्ले समजाले पाहिजे. महाराज शांत व्हयन्हात, नी सोतालेच बोलणात," मन्ह आंतरमन कोणी समजी लेत नही, हायी मन्ही खरी खत शे* "
*वरला आनुभव येलवर महाराजस्नी खबरदारी म्हनीसन राजाना पैसा नी राज्याना म्हणजे परवान (प्रजा) ना पैसा असा स्पष्ट उल्लेख व्हणारा कायदा कया. तेन्हामा तेस्ना हेतु आसा व्हता की, त्या कायदामुये आपलानंतर राज्यावर येणारा राजाले सोतानी मौजमज्या करता राज्याना (परवान) पैसा खर्च करता येणार नही. ह्या तरदुतमुये भारतले स्वतंत्र मियावर संस्थान विलीकरन करावर बडोदा सरकारनी गयरी मोठी संपत्ती नी गंगाजयी भारत सरकारले मियनी. बाकीना संस्थान मजार आसा कायदा नही राव्हामुये राजाना नी राज्याना पैसा राजाना मालकीना आसामुये विलीकरन व्हवावर भारत सरकारले लेता उनी नही. दुर्दैव आस की वैफल्यग्रस्त राजालोकस्नी बठ्ठा पैसा सोतानी मौजमस्ती मजार उडावात. म्हणीसन इतिहासकार म्हणतस की, सयाजीरावस्ना सारखा देशभक्त द्रष्टा राजा फक्त श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाडच!*
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा