रविवार, १८ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी करा दलितस्ना उध्दार* *भाग - ५०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी करा दलितस्ना उध्दार*

*भाग - ५०*

                  'कोणताबी राष्ट्रमा आरधा गुलाम नी आरधा लोकस्न स्वतंत्र आसा इरिखीरी व्हयेल समाज सुखमा जगू शकस नही.' आस अब्राहम लिंकन अमेरिकन काॅंग्रेसमा बोलणा व्हतात.

                 जगदुन्याना मानवसमाज हाजोरो वरीसफायीन गयय्रा जातीधर्मस्नामुये न्यारा न्यारा व्हयेल शे. तेन्हामुये जगदुन्याना मजार गयरासावा संघर्ष व्हयेल शे. आसा संघर्ष व्हवाले नकोत नी जगदुन्यामजार शांतता प्रस्थापित व्हवाले जोयजे आसा इचार रुसो, विल्बर फोर्स आणि मार्क्स येस्नी जगदुन्याना मव्हरे मांडीत.

                भारतमजारली सनातन हिंदुस्नी पुराणप्रियता आणि रुढीप्रियता इतली आंधी आणि चिवट व्हयेल शे की, देशकालमानना तेस्नावर जरुसाबी परिणाम व्हत नही. पयले जैन, बौद्ध, नी हिंदु साधुसंतस्नी. प्राचीन, मध्यकालीन अस्पृश्यस्ना उध्दार करता थोडफार प्रयत्न करा व्हतात. पण त्या बठ्ठा वैयक्तिक स्वरुपना व्हतात. पाश्चात्य संस्कृतीना प्रभावमुये भारतमा अस्पृश्यस्ना उध्दार ले चालना मियनी. ह्या कार्यमा. म. फुले, बंगालना शशीपाद बॅनर्जी, नी तिसरा क्रम लागस श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ना शे. महाराजस्नी परवान मत धीरे धीरे अनुकूल बनायीसन अस्पृश्यस्नाउध्दारना पाया रचा. छत्रपती शाहूमहाराज येस्नी अस्पृश्यस्नाउध्दारनी प्रेरणा, म. फुले नी श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ना कडथाइन लेल व्हती. ह्या चयवयनी धुरा महाराजस्नी सदा आप्ला खांदावर लिसन, बठ्ठा हिंदुस्थानभर चालीयीसन त्या हमेशा बठ्ठा पुढारीस्ना मव्हरे ह्रायन्हात म्हनीसन महाराज फक्त संस्थान अधिपती नही व्हतात, तर त्या अखिल भारतना लोकमत ना नेता, समाजसुधारक आणि राजकारण कुशल मुत्सद्दी व्हतात. खास म्हणजे हायी काम तेस्नी स्वयंस्फूर्तीनी कये. तव्हय तेस्न वय फक्त वीस वरीस व्हत.

              तेस्नी आप्ला राज्यामा हरिजन इद्यार्थीस्ना करता नी आदिवासी इद्यार्थीस्ना करता स्वतंत्र शाया चालु कयात. कालांतरमा लोकमत जस बदलाले लागण तस बठ्ठा जातना पोरस्ले राज्यामजारल्या शायस्मा प्रवेश चालु कयात. महाराजस्नी शिखेलसवरेल हरिजन उमेदवारस्ले तेस्नी लायकी नुसार नवकय्रा देवाले सुरवात कयी. तसज वाघेर ह्या रानटी जमातना शिखेलसवरेल जुवानस्ले पोलीस खातामा नवकरी दिन्हीकी त्या लोक जिम्मेदारीना काम नामी पध्दतमा कराले लागणात. तेन्हामुये ज्या लोक लुटारू नहीते दरोडेखोर व्हतात, त्याच लोक महाराजस्ना प्रयत्नमुये कायदा नी सुव्यवस्था राखान उपयोगन काम कराले लागणात दलितस्नाउध्दारना बारामा लोकमत अनुकूल करा करता महाराजस्नी ज्योतिबा फुले येस्नी 'दलितोध्दार', 'स्त्री-स्वातंत्र' नी 'हिंदुस्थानना शेतकरी' ह्या इषयस्वर व्याख्यान भरायी काढात. दुर्दैव आस की, थोडाज दिनमा ज्योतिबा पुणाले पक्षघातनामा आजारी पडनात. तेस्नी स्थिती गयरी दयनीय व्हयेल व्हती. मामा परमानंद येस्नी महाराजस्ले कळाव की, 'भारतना एक थोर महात्मा बराज दिन फायीन आंथरुनवर पडेल शे. तेस्ना कडे कोणीच ध्यान नही. तेस्ले आर्थिक मदत नी गयरी गरज शे. आपला शिवाय हायी काम जास्ती तयमयमा कोण करीण?' महाराजस्नी लगोलग एक हजार रुप्या दिसन कारभारी धामणस्कर येस्ले पुणाले रवाना कय. पण दुर्दैव त्या थोर महात्मान निधन एक दिन पयलेज व्हयेल व्हत.

                  बडोदामजार अस्पृश्य पोर - पोरीस्ना करता तेस्नी गुरुकुल पध्दतवर खास वसतीगृह काढ. पंडीत आत्माराम ह्या उच्चीजातना त्यागी पुरुष गुरुकुलना प्रमुख व्हतात. तठे निवास, जेवण, व्यायाम, संस्कृतपठण, येस्नी खास व्यवस्था करेल व्हती. आशी नमुनादार शाय भारतमजार एकच व्हती. भारतमजारला नी भारतबाहेरना थोरपुरुषस्नी आठली शिस्त, स्वच्छता नी रमणीय वातावरण दखीसन गैारवेादगार काढा व्हतात. नामचीन उद्योगपती जुगलकिशोर बिर्ला येस्नी आश्रम दखीसन प्रभावित हुयीसन पंधरा हजार रुप्यानी देणगी दिन्ही. हायी शाय दखीसन इंदुरना महाराज तुकोजीराव होळकर येस्नी हरिजन पोर-पोरीस्ना करता फुकट वसतीगृह इंदुरले चालु कये व्हत.

               बडोदा, अमरेली, पाटण नी नवसारीना बोर्डिंगमजारला हरिजन नी आदिवासी पोरीस्ले शिवणकाम नी सयपाक शिकाडानी सोय कयी. त्या बोर्डिंगमजारला एक सतरा वरीस्नीअनाथ पोरन लगीन उच्चीजातना पोय्राना संगे तेस्ना मर्जीनुसार लायी दिन्ह.. दरबारकडथायीन नवरीले स्त्रीधन म्हनीसन रोकडा रक्कम दिन्ही. कारण आर्थिकबाजु मजबूत राहिनी ते कर्मठ लोक जास्ती तरास देतस नही.

*क्रमशः*

*ता. क.* - *६ फेब्रुवारीपासून हायी लेखमाला चालु करेल शे, आज ५० सावा भाग लिखा. हायी लिखाणामांगे फक्त आप्ला बापजादास्ना इतिहास जित्ता ठेवानी तयमय शे, "डाॅ बाबासाहेब बोलणा व्हतात, जो आप्ला इतिहास इसरस तो कव्हयच आप्ला इतिहास घडावु शकस नही... कोण वाचस नही वाचस, कोणी प्रतिसाद, प्रतिक्रिया देस नही देस, तेनी माल्हे फिकीर नही, मी मन्हा सोताना गाजावाजा करता कोणतच काम करत नही... येन्हामव्हरेबी करणार नही... मन्हा खान्देश भविष्यमजार सोनाना व्हवो हायीज आमना करस नी, आजना हाऊ ५० सावा भाग मा आदरणीय बापूसाहेब हटकर मन्हा बठ्ठा सहकारी, नी वाचक मंडयीले, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ले मानपान ना मुजरा करीसन अर्पण करस*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...