*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाडच येस्नी करा दलितस्ना उध्दार*
*भाग - ५१*
बडोदा राज्यामा बठ्ठा दवाखाना नी ग्रंथालय अस्पृश्यस्ना करता मोक्या कयात. ज्या कायना डाॅ बाबासाहेब आंबेडकरस्नी महाडना चवदार तळावर सत्याग्रह कया नी नासिकमा मंदिर प्रवेसनी चयवय चालु कयी. तेन्हा पयले बडोदा राज्यामा महाराजस्नी दलितस्ना उध्दारनी आघाडी मारेल व्हती. आप्ल खंडेरावन मंदीर तेस्नी हरिजनसिना करता मोके करेल व्हत. आशी पदिदतमा परवान ले महाराजस्नी धडा घाली दिन्हा. दलित वर्गानी बी आप्ला सोताना उत्कर्ष करा करता गयरी मेहनत कराले जोयजे, आस त्या सदानकदा म्हणेत. महाराजस्न्या सुधारणा सावकास व्हयेत म्हनीसन सनातनी लोकस्ले टीका करणा पलिकडे काहीच करता ये नही.
काहीदुरना इचार करीसन महाराजस्नी आप्ला समाजन रोगराई नी तेन्हावर उपाययोजना करान पक्क मनवर लेल व्हत. तेस्न आस ठाम मत व्हत की, सामाजिक सुधारणा ना बिगर समाजनी बठ्ठा बाजुथायीन प्रगती व्हणार नही. तस दखाले गेते सामाजिक सुधारणाना सर्वसामान्य ज्या तीन आंग सशल शेत - व्यक्ती सुधारणा, परिवार सुधारणा नी एकदंर समाजरचना सुधारणा ह्या तिन्ही आंगस्नाबारामा इचार, आचार, नी उच्चार अश्या तीन्ही प्रकारना महाराजस्नी आप्ली हयातीमा सामाजिक सुधारणा घडायी आणी.आपीन सोता तेन्हापरमाने वागीसन लोकस्ले सुधारणाना धडा घाली दिन्हा. लोकस्ले सारखा सारखा उपदेस करीसन नी आप्ली राजसत्तानी मदतलीसन सामाजिक कायदा करीसन समाजनी परगतीले नी उत्कर्षले नामी अशी योग्य सामाजिक परिस्थिती घडायी आणी.
दलित वर्गस्ना लोकस्नी बी आप्ला सोताना उत्कर्ष करा करता प्रयत्न कराले जोयजे आस त्या सदानकदा सांगेत. महर्षी शिंदे येस्ना 'डिप्रेस्ड क्लास मिशन' ह्या संस्था नी चालायेल शायना बक्षीस समारंभना येले महाराज बोलणात, "मन्हा राज्यामा ह्या दलित वर्गाना करता कष्ट कराले सवर्ण लोक नाराज असामुये त्या कामाकरता माल्हे ख्रिस्ती नी मुसलमान शिक्षकस्नी योजना करनी पडनी हायी खेदनी गोट शे. माले सोताले तुम्हणा बारामा दलित हाऊ सबद आवडस नही. आणि तुम्ही दलित राव्हा नहीते उच्ची स्थितीले जावो हायी गोट बठ्ठी तुम्हणा कष्टावर आवलंबेल शे. पोटपाणीन साधन प्राप्त करी लेन्ह हाऊ जरी तुम्हणा सिक्सन ना हेतु शे तरीबी बाकीन्या दृष्टीना इचार करीसन तुम्ही आप्ली सुधारणा करी लेव्हाले जोयजे.
१९०९ ना सालले पुणामा महाराजस्ना बय्राच संस्थानाकडथायीन सत्कार झाया. त्यायेले पुणा सयर नी कॅपमा राहणाऱ्या अस्पृश्य लोकस्नी महाराजस्ना अस्पृश्यस्ना उध्दारन कार्य करता जाहीर कवतीक करासाठे वाजागाजा लायीसन महाराजस्ले त्या आप्ली वस्तीमा लयी ग्यात. तठे महाजस्ना दर्शन करता जेठामोठा लोकस्नी गयरी गर्दी जमा व्हयेल व्हती. दलित बायास्नी महाराजस्ले पंचाआरती करीसन ओवाये. महाराजस्नी बी परतफेड म्हनीसन तेस्ना ताटस्मा सोना न्या मोहरी ठीसन गोड समयसूचकता दाखाडी. हरिजन नेतास्नी पिरीमनी प्रतीक म्हनीसन त्या समारंभ मजार भावपूर्ण मानपान पत्र अर्पण कये. तो एकंदर देखावा गयरा ह्रदयस्पर्शी व्हता. काही दिनमा हरिजन समाजना पुढारी शिवराम जानबा कांबळे नी श्रीपतराव थोरात येस्ले बडोदाले बलाव्ह नी तेस्ना संगे दलितस्नी प्रगती ना बारामा इचारइनमय करीसन तेस्ना सत्कार कया. तेस्ले आप्ला संगे जेवाले बसाड.
मुंबईमा अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद १९१८ साल ले महर्षी शिंदे येस्नी प्रयत्न करीसन भरायी. ह्या सभाना अध्यक्ष श्रीमंत सयाजीराव महाराज व्हतात. परिषदले विठ्ठलभाई पटेल, बॅ. जयकर, बिपीनचंद पाल, येस्ना सारखा नामचीन नेता हाजीर व्हतात. करवीर इद्यापीठ ना शंकराचार्य डाॅ कुर्तकोटी, व्दारकाना शंकराचार्य, रविंद्रनाथ टागोर, आणि महात्मा गांधी येस्ना संदेश ह्या परिषदले येल व्हतात अध्यक्षीय भासन मजार महाराज बोलणात, "सामाजिक नवजीवनना रेटामुये नी शास्त्रीय ग्यान ना सामने अज्ञानमूलक नी जातीअभिमान येस्ना चिरकाल टिकाव लागण शक्य नही. अस्पृश्यता हायी माणुस्नी पयदा करेल शे. देवनिर्मित नही." अस्पृश्यस्ना संभाव्य धर्मांतरमुये पयदा होणारा धोकाना निर्देश करीसन त्या मव्हरे बोलणात," आम्ही आम्हना धर्मामा चांगला नी उपयुक्त सुधारणा घडायीसन अस्पृश्यस्ना प्रश्न सोडाले जोयजे. "
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा