बुधवार, २१ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी करा दलितस्ना उध्दार* *भाग - ५२*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी करा दलितस्ना उध्दार*

*भाग - ५२*

             आशी पध्दतमा ऐतिहासिक नी तात्विक समालोचन करीसन महाराजस्नी सार्वजनिक प्रसंगले अस्पृश्यस्न उच्चाटन येन्हापयले व्हयेल शे आसा दाखला नमुद कयात. तसच अस्पृश्य लोकस्ले नामी संधी मियनी असती, ते बाकीन्या जातीस्नी बरोबरी करू शकतस हायी खर्डानी लढाई मजार पराक्रम गाजाडेल शिदबा महारस्न उदाहरण दिसन पटायी दिन्ह. अस्पृश्यता नष्टकरी ते समाजमजारला एक मोठा वर्गान माणुसकीन नष्ट व्हयेल हक्क तेल्हे वापस मियीसन त्या वर्गावर व्हयेल अन्यायले जरासा तरी परिमार्जन व्हयीन आस सांग. 

परिषद ना दुसरा दिन लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे आणि ठक्कर बाबा ह्या हाजीर व्हतात. त्यायेले ठराववर भाषण करतांना लोकमान्य टिळक बोलणात, "अस्पृश्य वर्गाना प्रश्न हाऊ राजकीय नहि ते सामाजिक दृष्ट्या जल्दी मा जल्दी निकालमा काढाले जोयजे नी तो काढासारखा शे. बामण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन मेढ्या वर्गस्ले ज्या आधिकार शेत त्या शूद्र वर्गालेबी शेत. प्रत्यक्ष जर देव अस्पृश्यता पावू लागणा ते मी त्याले देव म्हणीसन व्हयखणार नही., "ह्या परिषदले व्दारकाना शंकराचार्यस्नी तार करीसन संदेश धाडीसन निषेध व्यक्त करेल व्हता. तेन्हा मजार तेस्नी रागमा म्हणेल व्हत," सयाजीराव गायकवाड आणि लोकमान्य टिळक ह्या दोन्ही महान उपदव्यापी भ्रष्ट हिंदु शेत, "पण त्या दोन्हीस्नी तिकडे ध्यान दिन्ही नही. 

             परिषद ना आखरी दिन एक जाहिरनामा काढा. जाहिरनामानुसार हर पुढारीनी 'वैयक्तीक दैनंदिननी आचरणमा अस्पृश्यता पायानी नही' आशी सपथ लिन्ही. ह्या परिषदमा केशवराव अत्रे स्वयंसेवक म्हनीसन हाजीर व्हतात. तठींग स्फूर्ती लिसन तेस्नी जोम मा सामाजिक कामले सुरुवात कयी. 

             दलित उध्दारना गयरा कठीण सुधारणा महाराजस्नी नामी काम करामुये सुधारकस्नी तेस्ले' पतितपावन 'हायी पदवी बहाल कयी. ह्या पदवीना महाराजस्ले गयरा आभिमान वाटे. महात्मा गांधी सारखा युगपुरुषले ज्या कर्मठ लोकस्नी सताव, त्याज सनातनी समाजनी शंभर वरीस पयले ह्या तरणा राजाले कितल हैराण कय व्हयीन येन्ही कल्पना करेल बरी. 

                कृष्णाजी केळुसकर आणि दामोदर यंदे येस्नी आंबेडकर ह्या तरणा इद्यार्थीले सयाजीराव महाराजस्ना कडथाईन सिक्सन करता आर्थिक मदत मियावी, येन्हा करता प्रयत्न करेल व्हता. एक दिन यंदे आंबेडकरस्ले लिसन मुंबईले मलबार हिल मजारला जयमहाल पॅलेसमा महाराजस्ले भेटाले ग्यात. यंदे ती याद सांगतस, "बागना प्रवेशदारना सामने आम्ही दोन्हाजन गाडीना खाले उतरणुत आणि मन्हा संगे महालमा येव्हा करता मी आंबेडकरस्ले आग्रोव्ह कया, पण त्या बोलणात," मी महार शे, मजार कसा येवु? महाराजस्नी बलाव्ह ते यीसु, "यंदे मजार ग्यात. तेस्ले दखताच महाराज बोलणात," या, मि. यंदे, आज काय खास बातमी?" 

           "महाराज, अस्पृश्य वर्गाना एक पोय्राले मी लयी येल शे. पोरग हुशार नी होतकरू शे. मॅट्रिक लगुन शिकेल शे, पण नादारीमुये मव्हरल सिक्सन लेता येत नही. महाराजस्नी जर मदत कयी ते तेन्ही शिकानी उमेद शे.," 

"पण तो पोरगा कोठे शे? "

" तो बाहेर उभा शे "

" का? तेल्हे बाहेर काबर उभ कये? तुम्ही तुम्हणा संगे मजार काबर लयना नहीत? "

" तेल्हे मजार येव्हान बोलणु मी, पण तो बोलणा मी दलित शे. मजार कसा येऊ? "

        " दख मि. यंदे, परंपरांनी रुढीमुये आपीन अस्पृश्य शेत, आसीज ह्या लोकस्नी समज व्हयेल शे. बर तेल्हे मजार बलावा, "एक हुजराले धाडीसन आंबेडकरस्ले मजार बलाव्ह. मजार येताच तेस्नी महाराजस्ले मुजरा कया, नी दुर उभा ह्रायन्हा. 

" आसा नजीक ये बाळ, नाव काय तुन्ह?" 

"भिमराव रामजी आंबेडकर "

" सिक्सन कितल व्हयेल शे "

" मॅट्रिक पास व्हयेल शे महाराज"

मव्हरे कितलालगुन शिकानी उमिद शे? मव्हरे सिक्सन व्हवावर काय कराना इचार शे?"

महाराजस्नी आज्ञा व्हयीन तसा मी वागाले तयार शे" 

सिक्सन संपादन करावर तुम्ही आप्ली जातना अज्ञान लोकस्न करता सिक्सनना परसार करानी कामगिरी हातमा लेव्हाले जोयजे तुम्ही तुम्हणा ग्यान ना उपयोग मांगे ह्राहेल समाज करता कराले जोयजे. "

" आप्ली आज्ञा पायीसन वागसु महाराज" 

"दर महिनाले पन्नास रुप्या शिष्यवृत्ती तुम्हले देव्हान आत्तेज सेक्रेटरीले सांगस. "

" आभारी शे महाराज. "

" जाव्हा, चांगला आभ्यास करा, तुम्हणी आक्कल हुशारी दखीसन तुम्ले आखो मदत मियीन."

   *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...