मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीरान गायकवाड महाराज आणि कुशल प्रशासक* *भाग - ५६*

 *श्रीमंत सयाजीरान गायकवाड महाराज आणि कुशल प्रशासक*

*भाग - ५६*

                      जमाखर्च हाऊ कोणताबी यशस्वी कारभारना कणा शै. तेव्हा करता आजिबात हलगर्जीपणा नई दुर्लक्ष व्हवाले नको. राज्यान मुख्य उत्पन्न हायी कर वसुली ह्रास. ती नरम नी सोपी ह्रायन्ही तरज परवानले आप्ली आर्थिक सुरक्षानी हमी ह्रास. महाराजस्नी करना बारामा निश्चित आस धोरण पक्क करीसन नया जमानाले वयीन आसा बदल घडायी आणा.

                      जमीन महसुलन्या जुनाट जुलमी मक्तेदारी पध्दतना पेक्षा तेस्नी ब्रिटिश मुलखमजारली रयतवारी पध्दत चालु कयी. येन्हामुये सरकारना प्रवाशी सिदा संबंध चालु झाया. मक्तेदारस्नाकडथायीन जो जलुम नी छळ व्हये तो कमी झाया. जमीन ना मदगगुर ठरायीसन तिन्ही मोजमाप करीसनकर आकारणी निश्चित कयी. ह्या कठीण नी जबाबदारीना कामकरता मुख्य आधिकारी म्हनीसन प्राचार्य इलियट येस्नी नेमणूक महाराजस्नी कयी. त्या अनुभवी तत्ज्ञ व्हतात नी तटस्थ नियतीना व्हतात. बडोदा संस्थामा धाकल्ला धाकल्ला राज्य व्हतात. वाजदा, कडी, आखो बाकीना व्हतात बडोदा संस्थानले खंडणी ना रूपामा त्या ठराविक रक्कम देत महाराजस्नी ती पध्दत करीसन तठला शेतकरीस्ना संगे सोता संबंध प्रस्थापित कयात. तेन्हामुये पिळवणूक होनारा सामान्य शेतकरी सुखी व्हयनात. जमीनमहसुलन्या सुधारणा हितकारक असीनबी तेन्ह स्वरुप न समजामुये काही अडाणी नी दृष्ट लोकस्नी तेन्हाविरुद्द हुल्लडबाजी कयी. तेन्हामायीन पिलवाईना दंगान प्रकरण उदभवन.

               दुष्कायसारखा संकटना येले उपयोग व्हावा म्हनीसन राज्यानी तिजोरी मजार कायमनी गंगाजळी जोयजे, तेन्हा बारामा एक हुतुममा महाराज लिखतस, "राज्यामा उत्पन्नाम्हायीन बठ्ठा खर्च वजा करीसन दरसाले वीस टक्का रक्कम पोते पडाले जोयजेच. साधारण पणे च्यार वरीस्ना उत्पन्ना यीतली रक्कम तिजाेरीमा गंगाजळी सदा शिल्लक ठेवानी. वायबार खर्च कमी करीसन दरसालले बचत ठीसन मोठी शिल्लकनी रक्कम तयार करी ठेवानी गरज शे.," राज्यान उत्पन्नान नी खर्च येस्न वार्षिक अंदाजपत्रक तयार करीसन तेन्हापरमाने वसुली नी खर्च येस्न ठराविक धोरण लायी देव्हानी गरज शे. ह्या धोरणनासंगे आम्मलबजावनी व्हस का नही येन्हावर महाराजस्नी बारीक ध्यान ह्राहे. महाराज सोता दप्तर तपासणी ना संगे हिसाबनी बी तपासणी करेत. तेस्नी १८८७ साललगुन राज्यानी इस्कटेल घडी नेम्मन बसाडी. ह्या सुमारले महाराजस्न २४ वरीस वय पुर व्हयेल व्हत.

                महाराजस्ना कार्यमा तेस्ले वरिष्ठ अधिकास्नाकडथायीन नामी सहकार्य मियत व्हत. शहाबुद्दीन काझी, जयसिंगराव आंग्रे, रमेशचंद्र दत्त, अरविंद घोष, चिटणीस, प्रधान, नेने, अप्पाजी रामचंद्र गुप्ते, यशवंतराव आठवले, वासुदेव महादेव समर्थ, लक्ष्मण जगन्नाथ वैद्य, पेस्तनजी खंडाळवाला, डाॅ भालचंद्र, प्राचार्य फ्रेडिक इलियट नी आखो कर्तबगार आणि विव्दान अधिकारी प्रशासनले नामी गती देव्हान काम करेत. पयले पासुन बठ्ठा जातना नी बठ्ठा प्रांतंना लोक आप्ला राज्यामा नवकरीले ठीसन राज्याले तेस्नी बुध्दीमत्तीना, कर्तबगारीना आणि प्रामाणिकपणाना लाभ करी लेव्हो आस महाराजस्न धोरण व्हत चांगला नी लायक माणस निवाडानाबारामा महाराजस्न कोशल्य वाखाण सारख व्हत युराेपीन लोकस्ना वक्तशीरपणा ना नीटनेटकेपणा तेस्ले गयरा आवडे म्हणीसन आप्ला पेहराव नी देखभाल करणारा व्हॅली नी बग्गी हाकलाकरता युरोपीन नवकर ठेयेत. रजपूत, मराठा नी मुसलमान येस्ना मा काही उपजत गुण ह्रातस म्हणीसन तेस्ले पोलीस दलमा नहीते लष्कर मजार भरती करेत. माणस्ले मोठ व्हवानी संधी दिन्ही म्हणजे काही माणस मोठी होवु शकतस, आसा महाराजस्ले इश्वास व्हता.

              अरविंद घोष १८९० सालले आयपीएस व्हयनात. उमेदवारीना काय सरावर अश्वारोहणनी  कसोटी ह्रास. पण तिन्हा करता अर्ज करान तेस्नी नाकारी दिन्ह. तेन्हा परिणाम आसा झाया की, तेस्ले आयपीएसनी यादीम्हायीन वगळी दिन्ह. नेमक ह्याच येले एक योगायोग घडना. महाराजस्ना मुक्काम लंडनमा व्हता. त्या समर्थ प्रशासकना शोध मजार व्हतात. जेम्स काॅटन ह्या माणुस्नी अरविंदास्नी महाराजस्ना संगे भेट घडायी आणी. मुलाखत व्हवावर त्या बडोदाले आधिकारी म्हनीसन रुजू व्हयनात. आप्ल नित्तेनेमन काम समायीसन त्या बडोदा काॅलेजमा इंग्रजीना प्राध्यापक म्हनीसन काम कराले लागणात तठे त्या गयरा इद्यार्थिप्रिय व्हयनात. विद्वत्ता, वक्तृत्व, चारित्र्य नी प्रसन्न व्यक्तिमत्त्व ह्या दैवी गुणस्नी संपन्न आसा आरविंदान जीवन इद्यार्थीस्ले आदरणीय नी अनुकरणीय वाटे. अरविंदासारखा तयमयना अधिकारी महाराजस्ना प्रशासनना कार्यमा उपयोगी ठरणात. बडोदामा व्हतात तव्हयज मृणालिनी देवीनासंगे तेस्न लगीन झाय. 'मेघदूत 'नी 'सावित्री 'ह्या महाकाव्य इंग्रजी मजार तेस्नी बडोदाले लिखी काढात. इंग्रजस्ना ससेमिरा मुये तेस्नी बडोदा सोडी दिन्ह.

             महाराजस्ना रोजना काम मजार ए. डी. सी हायी महत्वानी व्यक्ती ह्राहे. ए. डी. सी न व्यक्तीमत्व कस अपेक्षित व्हत येन्ह वर्णन जनरल नानासाहेब शिंदे येस्नी देल शे. 'ए. डी. सी. बठ्ठ्याज गोष्टीस्मा निष्णात नी सर्वज्ञ ह्राव्हाले जोयजे. तेल्हे घोडावर नेम्मन बसता येव्हाले जोयजे. नी तो निशाणीबाजीमा तरबेज जोयजे. देशीविदेशी चालीरितीस्न नी रितीरिवाजस्न तेल्हे आख्ख ग्यान जोयजे. इजजरी कडायनी तरी तेन्ही शांती अढय जोयजे. धाकल्या पार्टीस्नी नी डिनरनी येवस्था तेल्हे करता येव्हाले जोयजे. महाराजसाहेबस्ले सदा खुष ठेवानी कला तेल्हे अवगत जोयजे. राजवाडाना बठ्ठा नोकरस्वर सदा तेन्ही कडक नजर राव्हाले जोयजे. तेल्हे बठ्ठा खातास्नी माहिती जोयजे. मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी भाषान त्याले चांगल ग्यान जोयजे. त्या भाषा बी तेल्हे नामी बोलता येव्हाले जोयजे. रोज वर्तमानपत्र वाचीसन जगदुन्यामा, देशमा नी राज्यामा काय चालू शे येन्ही माहिती तेन्ही माहिती मिळायीसन ठेवाले जोयजे. राजघराणा नी मंडईना संगे कस वागान येन्ह तारतम्यन ग्यान तेल्हे नेम्मन जोयजे. राज्याना मोठल्ला अधिकारीस्नी तेल्हे माहिती जोयजे. महाराजस्ना मव्हरे राज्याना कारभारना बारामा महत्वाना कोणता कोणता प्रश्न विचारमा शेत तेस्नी तेल्हे आख्खी माहिती जोयजे. महाराजस्ना मान मरातब बाकीना राज्यामा कसा राखाले पाहिजे हायी तेन्ही समजी लेव्हाले जेयजे. नुस्ता इसारावरी, खुणवरी, नहीते एकदोन सूचक सब्दस्मा महाराजस्न मनोगत व्हयखीसन काम कराले जोयजे. सांगानी गोट म्हणजे तो चवरंगी जेयजे. ज्या ए. सी. डी. मजार येस्ना पयकी जास्ती गुण व्हतीन तो महाराजसाहेबस्ले जास्ती आवडे. "

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...