गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग-३६

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग-३६*

      समद्यापरकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्ना मनमजार रुजाले पाहिजेत म्हनीसन लोकसिक्सननी गयरी गरज ह्रास. तेन्हा करता महाराजस्नी आप्ला राज्यामा सिक्सनपरसार नी वाचनालयस्ना गयरा पसारा वाढावा. ज्या समाजसुधारणा स्वतंत्र भारत मजार आजुनबी नही झायात, त्या समाजसुधारणा महाराजस्नी १०० वरीस पयले आप्ला राज्या मजार करेल व्हत्यात. त्या यशस्वीपणे राबाड्यात. जगदुन्यामा आसा सामाजिक क्रांती घडायी आणणारा पहिला राजा म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या शेत. सामाजिक क्रांती हायी राजकीय क्रांती सारखी लगेच घडायी आणता येत नही. समाजना तो प्रगतीना परवास ह्रास. स्वातंत्र्योत्तर कायमजार सामाजिक नी राजकीय चयवय मजार मराठी नेतास्नी जर सजाजीरावस्ले प्रेरणास्थान मानतात ते आज महाराष्ट्राना इतिहास सामाजिक, राजकीय बाबत मजार कवतीक करा सारखा ह्राता. हायी निश्चित.

             ह्या उदारमतवादी खान्देशी राजाने आप्ला राज्यामजारला गुजराथी जनताले आप्ल करीसन तेस्ना मजार स्वामिनिष्ठा पयदा करी. तेन्हा बद्दल इतिहासाचार्य राजवाडे महाराजस्न कवतीक करतांना बोलणात, "गुजराथी लोक जिकेल नी मराठी लोक जिकणारा हाऊ भेदभाव मांगला दिडशे वरीस बडोदा मजार जास्ती करीसन भासे. पण हाऊ भेद समदा नायनाट कराकडे महाराजस्नी उत्कट प्रवृत्ती शे. राज्यकारभारना न्यारा न्यारा खातामजार गुजराथीस्नी संख्या वाढतच जायेल शे. इतलज नही, ते लायकीना गुजराथी जर मियना ते तेल्हे मुख्यखाताना मुख्याधिकारी नही ते, परसंगले दिवाणबी व्हयेल शे. हाऊ चमत्कार महाराजस्नी बडोदा मजार घडायी आणा. संस्थानमजारली जनता गुजराथी जरी असनी तरी महाराज साहेब आप्ली जनता नी आपीन एकच शेत ह्या पिरीमभावनामा आणि जिव्हाळा मजारच वागतस. काही काय नंतर ह्या सुधारणास्ना गयरा फायदा व्हयीन. तो आसा की, गुजराथीस्नी व्यापारीवृत्ती मराठीस्मा यीन, नी मराठीस्नी झुंजारवृत्ती गुजराथीस्मा यीन. सारांश, सुयत्रंना, सुव्यवस्था, समदृष्टी, नी न्यायप्रियता ह्या गुण सयाजीराव महाराजस्मा दिसतस., "

             जातपातना इरुध्द महाराजस्ना इचार कितला प्रगल्भ व्हतात नी आचार कसा निरमय व्हतात हायी श्रीपाद जोशी येस्नी 'तरुण भारत' मजार प्रकरणे मांडेल शेत. त्या म्हणतस," चातुर्वर्णास्मा उतरंडीमा बामणस्ले जे बठ्ठास्मा उच्च स्थान देल शे,ते गयरच तकलादू नी पोकय, फसव ह्राहीसनबी बामण समाज त्या बेगडी मोठपणवर खुष हुयीसन ह्राहेल शे आणि इमाने - इतबारे बाकीना समाजस्नी सेवा करत ह्रायन्हा. या वस्तुस्थितीनी कल्पना बडोदाना राजा सयाजीराव महाजस्ले असीन. म्हणीसन तेस्नी कोणतीबी जातना इरुध्द तक्रार न करता बठ्ठा समाजना उत्थाननाकरता बठ्ठ्या जातीजमातीस्नी मदत लिन्ही. तेस्ना त्याग, सेवाभावना, सामाजिक बांधिलकी ह्या बठ्ठ्याज गोष्टी इतल्या अदभुत नी आदरणीय व्हत्यात की, तेस्ना कडे बठ्ठास्नी तयमयमा दख. आमुक एक जातना, भाषाना त्या पुढारी शेत, आस तेस्ना गुजराथी जनताले कव्हयज वाटन नही. पण तेस्ना मनना तो मोठेपणा, तेस्नी दृष्टीनी विशालता आम्ले पेलावनी नही, आणि त्या दुर्लक्षित नी आनुल्लेखित ह्रायन्हात. "

पिडित, दलित आणि उपेक्षितस्नी मुक्तीनी नी प्रगतीनी महाराजस्नी तयमय फक्त संत ज्ञानदेवयेस्ना सब्दस्माज सांगता यीन.

  दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्म सुर्य पाहो/

जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात//


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३५*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३५*

         अमरेली आठे सत्कार समारंभ मजार बोलतांना वाईट चालीरिती आपीन झटकी देवाले जोयजेत आस महाराजस्नी आवरजीसन सांग. तव्हय त्या बोलणात, "आप्ला धर्मग्रंथस मजार जर काही चुकीन्या गोष्टी दिसण्यात त्या गोष्टी काढानी आपीन हिंमत दाखाडाले जोयजे. बराज दिनफाईन चालत येल रितीरिवाजस्मा काही हानीकारक गोष्टी व्हतीन त्या सोडाले जोयजेत. सदविवेक बुध्दीना इचार करीसन काही चांगल्या गोष्टी पदरमजार पाडाले जोयजेत. पण नुसता देखावा म्हनीसन काही गोष्टी चुकीन्या येत असतीन त्या टायाले जोयजेत. आस जर तर तरच आपीन ह्या शर्यतना जमाना मजार तग धरसुत. बाईस्ले सिक्सन देव्हानी गरज शे. पण पाश्चात्य देशस्माजसा बाया माणस्ना स्वातंत्र्यना नाववर आतिरेक व्हस तो आप्ला नही व्हवाले जोयजे. तेन्ही आपीन कायजी लेवानी गरज शे. बाईस्ले माणस्ना इतलज स्वातंत्र्य मियाले जोयजे, तेन्हा करता आपीन प्रयत्न कराले जोयजे. बाईस्ना आंगे जे सामर्थ्य शे ते आप्ल कोणज ध्यानमा येत नही. माणस्नी आपला जोये जी शक्ती शे ती बाईस्ना सुख मजार भर टाकाकरता खर्च कराले जोयजे. त्यामुये त्या वर्गाले समानता प्राप्त व्हयीन आशी मन्ही समज शे.

               "व्यक्ती आणि समाज येस्ना येरमेरशी घट्ट संबंध शेत, नी त्या येरायेरवर आवलंबी शेत. व्यक्कीना इकास म्हायीन समाजना इकास घडायी आणता यीन. पण हाऊ इकास कायदा करीसन नही व्हवाव. तेन्हा करता लोकस्ना मन वयाळान, तेस्ले एखादी गोट पटायी देवान आणि तेस्नी बठ्ठी समाजशक्तीनी पातयी उंचावन हाऊज खरा रस्ता शे. जेस्ले समानता जोयजे तेस्नी सोता समानता आचरण मजार आणाले जोयजे. नुस्त्या तोंडन्या वाफा वाया घाला पेक्षा येवाया वायबार घाला पेक्षा आशी सुधारणा घडायी आणाकरता प्रत्यक्ष कृती करेल माल्हे आवडस. "

        बडोदा मजार सयाजीविहार क्लब उघाडा. तेन्हा उद्घाटनना येल्हे धाकल्ला संस्थानस्ना समाजजीवन मजार कस महत्व ह्रास हायी सांगतांना महाराज बोलणात," आश्या सामाजिक संस्थास्ना मुख्य उपयोग समाजमा प्रेमय विचारविनिमय नी परस्पर स्नेहसंबंध पयदा व्हावा हाऊ शे, तठला सभासद या क्लब मजार यीन तव्हय आप्ला वायबार मनोविकार ठिसन नी तठींग बाहेर जायीन तव्हय मजारल प्रेमय इचार लीसन जातीन आशी आस शे."

             महाराज सोता आप्ली गुजराथी जनतामा गयरा प्रिय व्हतात. कारण तेस्नी गुजराथी, मराठा, बामण आसा कोणताबा भेदभाव तेस्ना धोरनस्मा येवु दिन्हा नहीत. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टी इतल्या आदरणीय व्हत्यात की, तेन्हामुये महाराजस्नाकडे बठ्ठास्नी आत्मियता मजारच दख सुवर्ण महोत्सवस्ना समारंभ मजार न्यारा न्यारा जातना लोकस्नीज इचार व्यक्त करात. पारशी समाजना मानपान पत्रा मजार लिखेल व्हत..

   "महाराज, आपण आमच्या लहानशा जातीचे रक्षक आहा."

अंजुमन - इस्लामना मानपान ना पत्रा मजार म्हणेल व्हत...

"जो हक थे रयते सुन्निके, कुछ तो दिये है, कुछ दवोगे /

सबपर है निगा महाराजाकी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह //"

                 आसा सब्देस्मा आप्ले महाराजस्नी समानता मजार वागामुये महाराजस्ना आभार मानात. उत्तर देतांना भाषणमजार महाराज बोलणात, "आप्ला मजार दिसणारा धर्मना मी जातना कितला बी फरक ह्रायन्हा तरी आप्ली संकुचित जातनी नजर टाकी देव्हानी गरज शे. आप्ल्या गंजलागेल चालीरितीस्ना त्याग करीसन आप्लामदारला उपयुक्त रिवादस्ना जतन कराले जोयजे. परकी संस्कृतीमदारला चांगला भागस्ना आपीन जरूर आनुकरन करा. आस कर ते आप्ल कल्याण नी आप्ली प्रगती नक्की व्हयीन. "

              सयाजीरावस्ले ज्या वातावरण मजार आणि ज्या काय मजार सामाजिक सुधारणा करण्या व्हत्यात तेन्ह एक गंमतन उदाहरण - बडोदाले पयला सावा आगीनगाडी सुरु झायी तवयस्नी गोट शे. बडोदा मजारला, नी आजुबाजुना खेजास्ना बामण लोक नवलकरत आगीनगाडी दखाले येल व्हतात हायी गोट सनातनी बामनस्ले सहीन झाय नही. त्या ज्या यवनस्नी आगीनगाडी दखाले जायेल बामण व्हतात तेस्ले जात बाहेर काढी दिन्ह. ह्या उदाहरणवरथाईन महाराजस्न सामाजिक सुधारणास्न कार्य कीतल कठीण व्हत येन्ही कल्पना येस.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३४

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३४*

     सोवळापणाना बाबत मजार महाराज आप्ला एक जुना आनुभव तेस्नी एक व्याख्यानमाला मजार सांगा.त्या बोलणात, "मी पयले चांगला लोकस्ले जेवण ले बलाऊ लागनु, त्यायेले मन्हा सामने गयय्रा आडचणी येव्हाले उन्ह्यात. त्याकायले आप्ला लोकस्ना मन मजार गयय्रा खोल समजुती व्हत्यात. आप्ला जातना लोकस्ना संगेबी त्या जेवाले बसेत नही, तयारबी व्हयेत नही. नी बाकीना सामाजिक येवहार ठेवाले बी त्या खालनी पातयी समजेत. ज्या शामियाना मजार जेवणनी येवस्था करेल ह्राहे तेन्हा कपडाना परदा, जेवणन्या खुर्चीस्ना खाले टाकेल सतरंज्या नी टेबलवरना कपडा ह्या गोष्टीस्ले त्या इटाय मानेत. आसा परसंगले जेवणन पक्वान्न आणि वाढन येस्ना बाबत पाहुणास्नी मी समजूतले मान देव्हान काम तेन्ही तजवीज माल्हे करनी पडे. तरी बी मी देल निवतालेबी काही लोकस्ले जातन बंधन मोडाना प्रयत्न नी शक येत ह्राहे. पण ह्या कामले मी चिकाटी धरीसन ठी. मन्ह निवत लेवानं मी कोणलेज जबरदस्ती करी नही. नी मन्हा निवताले नकार दिन्हा तरी मी तुम्हणावर नाराज नही आसा सब्द देवु. लोकस्ना मत जरी माल्हे आवडना नहीत, तरी मी तेस्ना मानपान नी कायजी लेत ह्रावु. आशी जव्हय पंगती व्हयेत तव्हय मी न्यारा न्यारा जातीस्ना न्यारा सयपाक, न्यारी पंगत, न्यारा वाढपी, तेस्ना पान न्यारा मांडानी मी येवस्था करु. जेस्नी इच्छा ह्राहे तेस्ना पाटला खालनी सतरंजी काढी टाकुत. हायी चिकाटी मुये मव्हरे माल्हे यस उन्ह. लोकस्न्या चालीयेल समजुतीस्ना इरुध्द तेस्ले जबरदस्तीन वर्तन कराले भाग पाडन ह्या पध्दतवर मन्हा आजिबात भरोसा नही व्हता. हायी ध्यानमा ठेवा. आतेलगुन मी सक्कीना पेक्षा मन वयावयावानी पद्धतच सदानकदा वापरी. माल्हे वाटस सक्तीना वापर अचीतटीलेच वापराले पाहिजे. बाकीना येल्हे मनपरीवर्तननाज रस्ता परिणामकारक ह्रास. खास करिसन बाकीना आधिकारीस्नी हायी गोट ध्यानमा ठेवानी गरज शे, ".

          बडोदा मजार संस्कृत पाठशायना बक्षीस समारंभना पुजाइधीना कारेकम मजार त्या बोलणात," पुजारी लोकस्नी बदलतली परिस्थिती दकीसन आप्ल धोरण बी बदली कराले जोयजे. तेन्हा करता तेस्ले आप्ला कर्तव्यान ग्यान जोयजे. जठे ज्या विधीनी गरज नही त्या अनाठायी इधीस्ले फाटा देव्हानी गरज शे, ते तेस्नी कराले जोयजे. तसज लगीन वयनी मर्यादा, लगीन सोबन ना खर्च, जातपोट जातीस्ना लग्न, परदेस वारी, श्रध्दानी संस्कार, दान नी पध्दत, आखो बाकीन्या गोष्टीस्ना पुजारीस्नी सुक्ष्म इचार करीसन नयी परिस्थितीले धरीसन लोकस्ले आदर्श वाटतीन आश्या पुजाइधी ठेवाले जोयजे, ".

                   बडोदा मजार मराठा सिक्सनपरिषदनी बैठक भरायेल व्हती. सरदार शंभुसिंहराजे मालेगावकर ह्या अध्यक्ष व्हतात. त्यायेले समाजसुधारणांस्नी उपयुक्तता नी आवश्यकता येन्हा बाबत महाराज मार्गदर्शन करतांना बोलणात," छत्रपती शिवाजी महाराज येस्ना इतिहास वरथाईन गयरा बोध लेव्हा सारख शे. प्राचीन नी आर्वाचीन गोष्टीस्ना इचार करीसन इतिहास ना आर्थ ध्यानमा ठेवाले जोयजे. युरोप मजार मार्टिन ल्युथरना येल्हे धर्म सुधारणा झायी. त्याच येल्हे आप्ला कडे संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास नी आखो गयरा महापुरुषस्नी सामाजिक सुधारणा कयात. तेस्ना इतिहास दखा. छत्रपती शिवाजी महाराजस्न नी त्याकायना साधुपुरुषस्ना इचार संकुचित नही व्हतात. तेस्नी बठ्ठा लोकस्नी उन्नती करता काम कय. तसाच तुम्ही बी बठ्ठा देशवासियांनस्ना करता प्रयत्न कराले पाहिजेत., "

                 न्या. रानडे, डाॅ भांडारकर नी सार्वजनिक काका येस्नी महाराजस्ले पुणाले'फिमेल हायस्कुलना' वार्षिकउत्सवले अध्यक्ष म्हणीसन बलायेल व्हत. त्यायेले तठली सामाजिक तणावले ध्यानमा ठिसन महाराज बोलणात," बामण, नी मराठा येस्नामा सध्या जी तेढ तयार व्हयेल शे, ती बठ्ठा समाजस्ले गयरी हानीकारक शे. समाजस्ले प्रगतीना रस्तावर लयी जावा करता बठ्ठ्या जास्तीस मजार एकी ह्राव्हाले जोयजे. आणि सुज्ञ लोकस्नी त्या दृष्टीकोन म्हायीन मनापासून प्रयत्न कराले जोयजे.,". 

       त्याच मुक्काम मजार मराठा पुढारीसनी महाराजस्ले पानसुपारी दिन्ही. त्या येले वरला बठ्ठा पुढारी हाजार व्हतात. तेस्नी महाराजस्ना नेतृत्वामजार मराठा नी बामन कार्यकरतास्नी दिलजमाई घडायी आनी. त्यायेले महाराज फक्त बावीस वरीस्ना व्हतात. 

            लंडन युनिव्हर्सिटीना मुख्य दिवाणखाना मजार न्यारा न्यारा देशस्ना राजा, इद्वान नी मुत्सद्दी येस्नी जगदुन्यानी शांती करता जागतिक शांतता परिषदन पयल आधिवेसन भरायेल व्हत. त्या समारंभन अध्यक्षस्थान महाराजस्ले देल व्हत. अध्यक्षीय भाषण मजार सामाजिक समतान व्यापक स्वरूप म्हणजे इस्वबंधुत्व हायी तत्व समजाडीसन सांगतांना महाराज बोलणात, "जगमजारला मानवस्ना सामाजिक प्रश्न काही नया नहीत. पण म्हनीसन त्या सोडाले बी सोप्या शेत आस बी नही. तरी बी माल्हे आशी आस शे की, सध्या जागेव्हयेल सद्सद्विवेकबुद्दीनी मदत लीसन बठ्ठास्ना बद्दल पिरीम, सहकार्यांनी भावना पयदा हुयीसन मुख्य प्रश्न सोडाकरता मदत व्हयीन. जदलगुन बठ्ठा मनुष्यजातीना बाबत एकत्वानी नी समतानी भावना आप्ला मजार येणार नही, तदलगुन दुरावा नष्ट व्हनार नही. येन्हा करता जर आप्ला मजारला फरक येरमेरशी न झगडता आपीन समजु शकू नी सहानुभूतीनी एकमत करीसन सहकार्य करसुत तव्हयज ह्या प्रश्न सुटतीन, ". 

*क्रमशः*

          (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३३

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३३*

आंधश्रध्दा नी भोयापणामुये लाखो रुप्या ना जो चुराया खिचडी (तांदुय, दाय) ना व्हये, नी दानधर्म करता वाटाये तो महाराजस्नी बंद कया आणि आयसी, भुकटखाऊ लोकस्नी मिजास बंद कयी. सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन कायदाना सामने बठ्ठा सारखा शेत, हायी तत्व आम्मल मजार आनीसन खरा आर्थ ना सामाजिक न्याय प्रस्थापित कया. धाकल्ला पोरस्ले कारखाना मजार कामले लावान, नी तेस्ले बिडी, तंबाखू इकाले लाव्हन येन्हावर बंदी कयी, नी तसा कायदा कया. तो गुन्हा शे आस बी ठराव. बडोदा संस्थान मजार आफु पेण हाऊ गुन्हा शे आस ठरायीसन गुन्हेगारले सजा व्हवाले लागणी. आफु नी लागवड बी धीरे धीरे बंद करी टाकी.

या काय मजारली आजुन एक सुधारणा म्हणजे 'येडास्ना आश्रम' चालु कया. येन्हा पयले येडास्नाकरता न्यारी आसी सोयज नही व्हती, तेस्ले साधा तुरंगस्मजार कोंडी देत. पण हायी निरदयपन नी पध्दत बंद करीसन १८९६-९७ सालले आसा लोकस्ना करता आरधा लाख रुप्या मोडीसन एक हायली न बांधकाम कये. नी येडास्ना डाॅक्टरस्ना देखरेख मजार तो आश्रम तेस्ना ताबा मजार दिन्हा.

      . मुंबईल् 'हिंदु क्लबन' आधिवेशन भरेल व्हत. त्या वखतले महाराजस्ना सत्कार कया व्हता. त्यायेले स्त्री शिक्षणाबद्दलना आप्ला दृष्टीकोन सांगतांना महाराज बोलणात, ", मी आते आतेज जपान, अमेरिका, युरोप नी आखो बराज ठिकाणवर जायेल व्हतु. त्यामुये न्याय्रा न्याय्रा चालीस्नी वयख कराले माल्हे मियनी. बाकीना लोकस्न्या चालीरीतीस्नी वयख करीसन आपीन आप्ली सुधारणा कराले जोयजे. बाईस्ले सिक्सन देव्हाले पाहिजे येन्हा बाबत आते कोठेबी मतभेद दिसणार नहीत. पण ते सिक्सन म्हणजे नुस्ती परिक्षा दिसन पास व्हनआस नही व्हस. बाईस्ले सवसार करान बी सिक्सन देव्हानी गरज शे. आप्ला कारभारीस्ले तिस्नी येसन पासुन दुर कस ठेवता यीन हायी बी तिस्ले शिकाडानी गरज शे. जर घर मजार बाई शिकेल सवरेल ह्रायन्ही ते ती ग्यानना नी घरसुखसमाधानना उज्ज्वल प्रकाश घर मजार पाडाले समर्थ ह्रास. नी आप्ला आजुबाजुना लोकस्ना निर्दय नी आपमतलबी कपट युक्त्यासफाईन जशी फसस तशी फसणार नही. "

                        युवराज फत्तेसिंहराव येस्ना लगीन सोबन ना निमित्तथाईन युरोपना लोकस्ले पंगत दिन्ही. तव्हस्ना परसंगले बाईस्ले समभावमजार वागाले जोयजे आसी तयमय महाराज येस्नी व्यक्त कयी. त्या बोलणात," आम्हणा हिंदु समाज मजार कितल्या तरी जुन्या रुढीस्ना योग मुये बाया आसा समारंभ मजार मिसयतीस नही, हायी गयरी खद करानी गोट शे. तरीबी बाहेरनी पाश्चिमात्य सिक्सन नी इचार येस्नी प्रगती इकडे जल्दी व्हयी ह्रायन्ही. हायी गयरी आनंद नी गोट शे. बाईस्ले बी माणस्ना इतलच स्वातंत्र मियाले पाहिजे तेन्हा करता आपीन खटाटोप कराले जोयजे. बाया माणस कव्हय ना कव्हय माल्हे एकंदर बशेल भेटतीन आसी माल्हे आशा शे. बाया आप्ला संगे शेत, नी त्या आप्ला परतेक सुकदुक मजार सामिल व्हतीन येन्ही माल्हे आस शे, त्या हरएक काम मजार आप्ला संगे समर्थ शेत हायी आस मी संगे लीसन फिरस. बाईस्ना ज्या कलागुण शेत त्या आप्ला हिंदु समाजमुये उजाया मजार येतीस नही. माणस्नी आप्ला जोये जी ताकद शे ती आपल्या बाईस्ना सुकदुक करता खर्च कराले जोयजे. बाया, माणस हाऊ वर्ग सारखाच समसमान शे आसी मन्ही पक्की समज शे. आम्हना धाकला महाराज आप्ली कारभारीना संगे मायाळुपणी वागणुक करतीन नी तिस्ले उच्च दर्जा न सिक्सन देथीन आसी माल्हे आस शे. महाराजस्ना ह्या पुरोगामी इचार त्या १०० वरीस पयले समारंभ मजार हाजीर व्हयेल बामण, मराठा मंडईस्ले जीरना नसतीन, पण कायना ओघ मजार धीरे धीरे तेस्ना पचनी पडेल ध्यान मजार यीन.

             काही समाजस्मा गोषानी गयरी वाईट चाल व्हती. त्यामुये बाईस्न गयर नुकसान व्हयेल शे. गोषा. पध्दत बंद कराना करता सोताना परिवारन्या बाईसपासुन महाराज स्नी सुरवात कयी. महाराणी चिमनाबाई येस्नी धीरे धीरे गोषा पध्दत बंद कयी. त्यामुये महाराजास्वर चांगल्या बी नी वाईट बी टीका झायात. पण टीकास्ले उत्तर देवानी हिंमत तेस्ना मजार व्हती. आप्ले नाव ठेवाबिगर समाज मजार ह्राहता. येत नही, ते गयर कठीण शे. मातर नामी टीका आपीन समजी लेवाले जोयजे. तशी दखल लेव्हाणी गरज शे.

          एक समारंभ मजार महाराज बोलणात, "कोणताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक नी धार्मिक आचरणवर आवलंबी ह्रास. ज्या समाज मजार आपसम्हा द्वेष, झगडा चालु शेत तेस्नी प्रगती ना इचार करालेज. नको. जनता मजार येकी नी ग्यान येस्नी जर वाढ झायी ते तेस्ना मांगेमांगे सुराज्य खात्रीमजार यीन आप्ल बठ्ठास्न महान श्रेय हायी शे की हिंदुस्थान मजार एकराष्ट्रीयत्व पयदा करण हायी शे. हायी करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या जोयजेत. नी तश्या त्या व्हवा करता तेस्ना मजार सामाजिक येवहार सुरू व्हवाले पाहिजे. "

        सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन तेस्ले कायदा मजार आनीसन बठ्ठा कायदा ना सामने समान शेत हायी तत्त्व आम्मल मजार लयनात. धाकल्ला पोरस्ले कारखाना, नी हाटेल मजार कामले बंदी कयी.

           हिंदू समाजनागत जैन लोकस्ना मजार बी गैरसमजुती व्हत्यात, कमी वय मजार पोर पोरीस्ले जबरी करीसन दिक्षा देत तेन्हा मुये मव्हरल आयुष्य त्या मरेल सारख कठेत. म्हणीसन पयले महाराजस्नी जैन धर्म मजार धाकल्ला पोरी पोरस्ले दिक्षा देतस तेन्ह काय धर्मशास्त्र मजार आधार शे का, हायी तपासा करता समिती बनायी. शास्त्र मजार आसा काहीज आधार नही, आसा जव्हय महाराजस्नी खात्री व्हयनी तव्हय तेस्नी कायदा कया. ह्या कायदामुये. देल दिक्षा बेकायदेशीर शे आस ठराव. नी मियकत मजार तेस्ना हक्काले कोणताबी प्रकारनी बाधा येत नही आस ठराव. धाकल्ला पोर पोरीस्ले जर दिक्षा दिन्ही ते ते करणार वर फौजदारी गुन्हा दाखल करीसन जेल मजार टाकेत.आस.प्रकारे महाराजस्नी जुनाट रुढ्या मोडी काढयात. नी कायदा मजार कठोर शिक्षा करान नियोजन कये. ह्या सुधारणास्ना मुये जैन लोकस्ना राग महाराजस्नी आंग वर व्हढी लिन्हा.

     .... सामाजिक सुधारणा करतांना लोकमत दुखावणार नही येन्ही त्या कायजी लेत. गयर धीरगंभीर पणा लिसन तेस्न समाज सुधारणाना काम तेस्नी चालु कय.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३२

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३२*

            समाजन बारीक सारीक अवलोकन, बठ्ठवाचनले स्पर्श करेल नी, गयरा मोठा जगदुन्याना. प्रवासमुये महाराजस्ले आस वाटे की, बठ्ठा सुधारणास्न मुळ समाज सुधारणाज शे. समाजसुधारणा हुयीन तो निस्ता कायदा करीसन व्हनार नही, तेन्हा करता समाज ना भरभक्कम पाठिंबानी गरज शे. तुर्कस्थानना हुकुमशाहा केपालपाशा येस्नी काही समाज सुधारणा कायदाना जोरवर झटपट करी दाखाड्यात. पण काही दिवमजार ते वातावरण तठे टीकन नही. महाराजस्ले धीरे धीरे एकबाजुथाईन लोकमत बनायीसन दुसरीबाजुथाईन समाज सुधारणाना भरभक्कम पाया भरणा व्हता. म्हणीसन तेस्नी धीमी पण टीकनारा रस्ताना स्विकार कया. समाज सुधारणाना बाबत मजार महाराज उतावीळ नी उधय नही व्हतात. तेस्ना इचार ह्या बाबत मजार निश्चित स्वरूपना नी पक्का व्हतात. आप्ला इचार कृतीमजार आणासाठे निश्चयीपना तेस्ना मजार व्हता. तेस्नी समाज मजार होणारा धाकला मोठा दांगडोले वारावांधी न रूप येवु दिन्ह नही. 

              कोणाताबी सामाजिक प्रश्न हाऊ समाजना धार्मिक राजकीय, नी आर्थिक जीवनले चिटकेल ह्रास. सामाजिक प्रश्नना इचार न्यारा करता येतस नही. तेन्हा बद्दल महाराज आर्यसमाजना संमेलन मजार अध्यक्षन भासन करतांना बोलणात, "कोणाताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक मी धार्मिक आचरण वर आवलंबीसन ह्रास. ज्या समाजमजार आप्ला आप्ला मजार वैर, द्वेष, झगडा चालु ह्रातस तेस्नी राजकीय उन्नती व्हावा नी आशा खुडायी जास. जनता मजार एकोपा6, ग्यान येन्हा जर इकास झाया तेस्ना मांगेमांगे सुराज्य चालत येस. जर का कोणाताबी देश मजार सरकार मजार जनतानी भरती करेल व्हयीन, नी ते सरकार जर आप्ली जनता करता सहानुभूती नसीन तर तो दोस जनताना ह्रास. तेव्हा करता पयले आप्ला मजारला दोस काढा ते तुम्ही तुम्हणी सुधारणा करश्यात. तर सरकारबी तुम्हणी प्रगती ना आडे येणार नही."

                 मानवी समाजन बठ्ठ दुक तेन्हा मुळ न्यारा न्यारा थरस्वर विभागेल शे, आस महाराजस्ले वाटे. मुंबई मजार 'आर्यन ब्रदरहूड 'हायी संस्थानी महाराजस्ना सत्कारना येले एक पंगत देल व्हती, तव्हय न्या. चंदावरकर येस्ना स्वागतना भासन नंतर उत्तर देवाणा येल्हे महाराज बोलणात, "आप्ला मव्हरल बठ्ठास्मा पयले श्रेष्ठ ध्येय म्हणजे हिंदुस्थान मजार राष्ट्रीयत्व तयार करण हायी शे. ते करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या पाहिजेत. नी त्या होव्हाकरता तेस्ना मजार सामाजिक येवहार चालु व्हवाले जोयजे. सार्वजनिक कामसमजार महिलांस्नी भाग लेन म्हणजे आप्ली प्रगती न लक्सन मी समजस. कारण त्या निमित्ताथाईन माणस्ले दाक्षिण्य सभ्यता यीन., "

             सिक्सन ना संगे नया इचारस्ना समाजनी स्विकार कराले जोयजे. म्हणीसन जुन्या गंजेल गोष्टी महाराजस्नी धीरे धीरे बंद कयात. बालविधवास्ना वापस लगीन लाव्हा करता चालना दिन्ही. सोता पुढाकार लिसन महाराजस्नी आस लगीन घडायी आन. १९१८ सालनी गोट शे. गणेश सदाशिव भाटे नाव ना एक पंडीत नी बायको तरणा वय मजार मरी गयी. दुसर लगीन करता एक वीस वरीसनी तरणी रांडमुंड रूपवान कलावती बाईले तेस्नी लगीन करता तयार करी. भाटे माय बापस्नी गयरा इरोध कया. विधवास्न वापस लगीन करा करता महाराजस्नी भाटेले मदत कयी. महाराज सोता हायी लगीन ले हाजार व्हतात. बॅरीस्टर जयकर बी हाजीर व्हतात. नृत्यतारका रोहिणी भाटे हायी त्या भाटेस्नीजस आंडेर. आसा सामाजिक सुधारणास्ले सनातनी लोक टिंगलटवायी करेत. पण महाराजस्ले तेस्नी फिकीर नही व्हती. सामाजिक सुधारणा पजाले थोडीशी जड जाईन हायी महाराजस्ले माहीत व्हत. 

              महाराजस्नी आप्ला मनथाईन आस ठराव की, धर्म हाऊ हारेक माणुस्नी आवडनी बाब शे. तेन्हावर कोनाबी दबाव नको. आसा दबाव शारीरिक जुलुमस्ना नही ते आर्थिक स्वरूप ना राहु शकस. म्हणीसन १९०१ साल ले 'धार्मिक स्वातंत्र्य निर्बंध' कायदा कया. तेन्हामुये जुलूम करीसन जो धर्मांतर व्हये तेल्हे प्रतिबंध व्हयना. तसच ग्रामपंचायतीस्ले न्याय ना आधिकार देवामुये गावखेडास्मा मजारल्या अन्याय करणाय्रा जातीपमचायतीस्ना नायनाट झाया. बालविवाह नी चाल बंद करी टाकी, नी पोर पोरीस्न लगीन व्हय निश्चित कय. तसा कायदा करीसन त्या कायदा ना काटेकोर पणे आम्मलबजावनी कयी.  ब्रिटीश हिंदुस्थान सरकार नी बी शारदा कायदा पास करीसन बालविवाहले बंदी आनी. पण तेस्ना कायदा नी आम्मलबजावनी नेम्मन झायाज. नही. 

               घटस्फोट ना कायदा पास करीसन महाराजस्नी सामाजिक क्षेत्रा मजार जोरबन क्रांती कयी. दत्तक विधान मजार बी व्यवहार्य आसा कायदाना बदल कया. दत्तक जायेल व्यक्तीले तेस्ना सग्गा भाऊस्ना इस्टन मजार वाटा देव्हाना नही आसी ती तरदुत व्हती. तसज रांडमुंड बाईले तिन्ही इच्छेनुसार जीवन कटता यीन आसा कायदान संरक्षण दिन्ह. परिवार कर्ज फेडीना कायदा कया. गव्हानदी कुटुंब मजारला माणुस्नी जर शिकेल सवरेल ना जोरवर संपत्ती कमायेल. व्हयीन ती तेल्हे, नी तेन्हा वारसस्ले मियाकरता. 'विद्यार्जित धनना' कायदा कया. आसा गयरा कायदा पास कयात. नी त्या कायदा समाजना सुख करता गयरा उपयोगी ठरनात. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा* *भाग.. ३१

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*

*भाग.. ३१*

गाडी सोनगड स्टेशन मजार घुस्नी. त्यायेले स्टेशनवर तेस्ना स्वागत करता हाजीर व्हयेल लोक दखा नंतर तेस्ले आप्ला राजापण नी जाणीव व्हयनी. नवसारी प्रांतना सुभेदार खासेराव जाधव येस्नी संकट जितला निवरतीन तितला प्रयत्न करेल व्हतात. तेस्नी महाराजस्ले संगे लिसन सोनगड पासुन पन्नास - साठ कोस बल्लाखल्लास्ना प्रदेश घोडावर बशीसन फिरानी येवस्था करेल व्हती. त्या भयाण जंगल मजार मुक्काम करासाठे संगे तंबू, तेन्हामाज जेवण, वाचन, झोपनी आखो बाकीनी येवस्था करेल व्हती. ऊन इतल तपेल व्हत, की आंघधव्हान थंड पाणी सुध्दा गरम व्हयेल व्हत, हात घालात ते हात भुंजी जायीन. मुंबईथाईन बरफनी येवस्था करेल व्हती. तेन्हामुये पेव्हाले पाणी तरी गारेगार भेटीन. मुंबईथाईन बरफ न पार्सल रेल्वाई नी सरतवरथुन सोनगडले नी तठींग मव्हरे पन्नास साठ कोस उंटसवर जंगली भाग मजार रोज लयेत.

             महाराज नी खासेराव सकायमा सातले घोडावर निंघेत. बारा एक लगुन फिरीसन वापस मुक्कामनी जागावर येत. मरेल मानसस्ना हाडस्ना पिंजरा जागाजागावर पडेल दिसनात की, खासेराव ना डोयास्ले धारी लागेत. महाराज बी गयरा व्यथित व्हयेत. सोता राजा खेडापाडास्मा जनता करता ऊनतहान मजार फिरी ह्रायन्हात हायी दकीसन आधिकारीस्नी बी कात टाकी. त्या आंग मोडीसन काम कराले लागणात. मोलमजुरी ना काम काढीसन लोकस्ना हात ले काम दिन्ह. काही लोकस्ले दुसरी जागावर हालाव. नी तेन्हामुये हजारो गणती माणस नी ढोरपोर मरना दारम्हाईन वापस उन्हात.

            खासेराव महाराजस्ना पेक्षा जेठा व्हतात नी तेस्न कार्य नी निस्वार्थपणा येन्हामुये महाराजस्ना कडे तेस्न गयर वजन व्हत. दोन्हीस्नी मयतरी अतूट व्हती. खासेराव येस्नी कामनी तयफ दखीसन महाराज म्हणेत, "आम्हना खासेराव म्हणजे इज ना तार शे" कितला बी बाका प्रसंग राव्हो पण महाराजस्न भान, नी जमिनवरना पाय सुटे नहीत.

                  दुस्कायन काम म्हनीसन बांधेल एक धरणन उद्घाटन ना प्रसंगना भाषण मजार महाराजस्नी अधिकारीस्ले गयर नामी मार्गदर्शन कये. "दुस्कायन निवारण करा करता उपयोग मजार येणारा साधारण तीन मुख्य वर्ग करता येतीन. पहिला वर्ग मजार तात्कालिक मदत देव्हाना आंतरभाव ह्रास. धान्यनी मदत, पेव्हान पाणी मियायी देव्हान, आनाथ आश्रम उघाडान, नया काम काढीसन लोकस्ले रोजगार देव्हान ह्या त्या इलाज शेत दुसरा जास्ती फायदाना उपाय म्हणजे दयनवयन येवस्था, नी वाहतुक नी येवस्था जास्ती परिणामकारक करान. त्यामुये दुस्कायन भाग मजार अन्नधान्य पवसाडता यीन, नी दुस्कायनी झय कमी लागीन. सर्वास्मा महत्वान म्हणजे येहरी खंदान्या. पाटबंधारा ना काम कराना, पाटचाय्रा काढान, झाड लाव्हानी तयारी करान, पेव्हान पाणी नी काम नी कायम येवस्था करान ह्या शेतह्या प्रत्यक्ष उपाय सोडीसन दुसरा अप्रत्यक्ष उपाय म्हणजे आप्ला लोकस्ना मनम्हाईन कमजोरी, नी दुसरावर आलंबन नी स्थिती सुधारले जोयजे. तसा प्रयत्न आपीन कराले जोयजे. ह्या समद्या गोष्टीस्न समाधान म्हणजे सिक्सन शे. ह्या करता शिक्षकस्नी प्रत्येकले सोतान पायवर कस उभ राहता यीन येन्ह सिक्सन देवानी गरज शे. तस तेस्नी लोकस्ले शिकाडाले जोयजे. "

             महाराजस्नी १९०९ साल ले बडोदा राज्य मजार स्वतंत्र शेतकी खात चालु कय. दिवाण बहादूर समर्थ येस्ले त्या खाताना मेढ्या करा. शेतकरीस्ले सस्त दरमजार सवलत दिसन कर्ज दिन्ह, नी सावकारस्ना जाच म्हायीन सोड. शेतकरीस्ना पोरस्ना करता शेतकी सिक्सनना वर्ग खोलात. १९०५ साल ले काश्मिरमजार रेशमन्या पैदाशीस्न सिक्सन लेव्हा करता रावजीभाई पटेल येस्ले धाड. तसच बंगाल इलाखाना शेती खाताना मुख्य अधिकारी सिल्क तज्ञ मुखर्जी येस्ले बडोदाले काही महिनापुरता बलायीसन नवसारी नी बडोदा मजार रेशीम पैदास कशी करता यीन येन्हा करता महाराजस्नी तेस्ना संगे इचार इनमय कया. फिरता तपासनीस नेमीसन शेती सुधारणाना कार्यावर सदा ध्यान ठी. तसच जनावरस्नी, नी कोंबड्यास्नी पैदास नी डेअरी संबंधी माहितीनापत्रक येस्ना शेतकरीस्मा प्रसार कया. तज्ञस्ले खामगावले पशुसंवर्धन केंद्रामार्फत ट्रेनिंग करता धाड. जनावरस्ना करता २१ दवाखाना काढात. ह्या गोष्टी बडोदा मजार ऐंशी वरीस पयले कय्रात. येन्हावरथाईन महाराजस्नी दूरदृष्टीना नी कर्तबगारीनी कल्पना येस. 

           १९०९ साल ले बडोदा काॅलेजना बक्षीस समारंभना परसंग ले इद्यार्थीस्ले उद्देशीसन करेल भाषण मजार महाराज बोलणात, "शेतकरी नी कामकरी हंया देशमजार आन्नधान्यान उत्पन्न करतस. ह्या वर्गान्या सुखदुखन्यायेवस्थावर देशना इकास आलंबन शे शिकेल सवरेल लोकस्नी ह्या गोट कडे ध्यान देन हायी तेस्न कर्तव्य शे, "

                 १९ १४ सालले बडोदा मजार सहकारी संस्थास्नी अखिल भारतीय परिषद भरनी  व्हती. तिन्ह उद्घाटन करतांना महाराज बोलणात," खेडास्मा पिकनारा माल एकत्र करिसन तो सयर मजार योग्य भाव मजार इकन तसच खेडास्ना लोकस्ले लागणारा माल किफायतशीर भाव मजार इकन ह्या गोष्टीस्ले सहकारी चयवयन जास्ती महत्व शे. फक्त सरकारवर आवलंबन न राहता लोकस्नी सोतानी चयवय उचली धराले जोयजे. जर्मनी, डेन्मार्क ़हाॅलंड नी बाकीना देशस्मा सहकारी योजनास्नी शेतकरी वर्गस्नी अपूर्व सुधारणा घडायी आणेल शे. येन्हा पयले त्या देशस्मा दैन्य नादारी व्हती. तठे आते हल्ली सुख समृद्धी नांदी ह्रायन्ही. नी त्यायोगे राष्ट्रीय उन्नतीना पाया त्या देशस्मा चांगली रित मजार रोवन. हायी चयवय ना आप्ला देश मजार चांगला फायदा व्हयीन. बरा वाईट आनुभव धरीसन हायी चयवय मव्हरे लयी जाव्हाले पाहिजे. 

                नवसारी प्रांत मजार सोनगड व्यारा आठे शेतकी बॅकनी स्थापना १९०५ ना सुमारले करी. ह्या बॅंक मार्फत शेतकरीस्ले सवलत मजार कर्ज दिसन बठ्ठा परकारनी मदत देव्हाले सुरवात करी. तेन्हा त्या भागस्ना शेतकरीस्ले गयरा फायदा झाया. तव्हय पासुन हायी योजना बठ्ठा राज्य मजार चालु करी. ह्या बॅंकनी राज्या मजार हरिजन नी आदिवासी शेतकरीस्ले जास्ती सवलती दिन्ह्यात. कारण महाराजस्न्या तश्या सुचना होत्यात. 

           महाराज बडोदाले येव्हावर पन्नास वरीस्मा (१९२६) त्या आपली जन्मभूमी कवळाणा मजार येल व्हतात. त्यायेले तेस्ना सत्कार पंचक्रोशी मजार च्यार पाच दिन चालनात. तेस्ना दर्शन करता आजूबाजूना जनसमुदाय मालेगावले जमेल व्हता.

             त्यायेले काकासाहेब वाघ, रावसाहेब थोरात, सटाणाना अजबादादा नी अभिमान पाटील, वालचंद शेठ, राजेबहाद्दर येस्नी महाराजस्ना स्वागतना परसंगले मालेगावले भव्य शेतकी प्रदर्शन भरायेल व्हत. तेन्ह उद्घाटन महाराजस्नी कर, तव्हय महाराज बोलणात, "शेतीमालवर आधारित कारखाना सहकारी पद्धतवर शेतकरीस्नीच चालावाले पाहिजेत. तव्हयज तेस्ले तेस्ले जास्ती उद्योग नी शेतीमालले चांगला भाव मियीन. नया तंत्रस्न नी यंत्रस्ना वापर करान सिक्सन देवाले पाहिजे. आसा प्रकारे जर सदा उद्योग करत ग्यात ते उत्पादन वाढीन. नी नामी मोबदला बी भेटीन आणि आप्ल सर्वांस्न जीवन नी भरभराटी व्हयीन., "महाराष्ट्र मजारल्या आजन्या सरकारी बॅंका, सहकारी शेतकी संघ, सहकारी साखर कारखाना आणि सूतगिरण्या येस्ना जो इकास व्हयेल शे, तेन्हामांगे महाराजस्नी अप्रत्यक्ष प्रेरणा शे. जेस्नी महाराष्ट्र मजार सहकारी चयवय रुजाळी, वाढाई त्या बराजजन बडोदाले शिकेल व्हतात.

                 पयला काय मजार शेतीवर आवलंबी ह्राहेल सुतार, लोहार, सोनार, शिपा, नी धाकल्ला यापारी, दूधवाला, भाजीवाला, नी आखो येस्ना सारखा गरीब लोकसवर गयरा कर बसाडेल व्हतात. पयसावाला लोक मातर त्यायेले मोक्या सुटेल व्हतात. हायी आन्यायकारक आर्थिक विषमतानी गोट महाराजस्नी धीरे धीरे बदलायी टाकी. वरला गरीब लोकस्ना कर माफ करी टाका, नी पयसावाला लोकस्ले इन्कम टॅक्स लाव्हा. तव्हय सुरवातले १०० रुप्या जेन्ह. उत्पन्न व्हत तेस्ले इन्कम टॅक्स लायेत. ती मर्यादा धीरे धीरे वाढायीसन ७००रुप्या जेस्न उत्पन्न शे तेस्ले बी कर माफ कया.

                 शेतीमालले चांगला उठाव करा करता राज्याना अंतर्गत व्यापार वरना निर्बंध दूर करीसन राज्या मजार उत्पन्न व्हयेत त्या वस्तुसवर जकात कमी कयी. आस समतान धोरण स्वीकारामुये राज्याना उत्पन्न मजार स्थैर्य नी निश्चयता पयदा व्हयनी.

             मजार मजार महाराज तब्येत ना निमित्त करीसन, नही ते काही दौरा निमित्त युरोप मजार ह्राहेत. तरी जशी घार आभाय मजार उडस पण तीन्ही बठ्ठी ध्यान आप्ला घरटा मजारला पिल्लासवर ह्रास, तसीच गोट महाराजस्नी व्हती, त्या ह्राहेत युरोप मजार पण बठ्ठी कायजी जनतानी ह्राहे. परिस्थितीनी बदल जशी व्हयनी, तसतसा बदल करीसन महाराजस्नी शेतकरीस्ना च्यारीमेय प्रगती घडायी आणी. महाराजास्ना काय मजार हिंदुस्थान मजार बठ्ठास्मा जास्ती सुखी, समाधानी, संपन्न, शिकेल सवरेल जनता फक्त बडोदा राज्यामजारच व्हती हायी ध्यान मजार ठेवा सारखी गोट शे.

     *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा भाग.. ३०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*

*भाग.. ३०*

             जोतिबास्नी करेल कवतीक मुये महाराजस्ले गयरी स्फूर्ती मियनी. नया जोम मजार कामले लागणात. खाशेराव जाधव येस्ले १८९९ ले इदेशले धाडीसन तठे खेती ना क्षेत्रा मजार व्हयेल नवीन सुधारणांस्ना अभ्यास करी लिन्हा.

             खाशेराव म्हणजे मुर्तीमंत उत्साह! परत बडोदाले य्व्हावर तेस्नी बठ्ठी कडे दौरा चालु करीसन शेतकरीस्ले तेस्ना गावखेडास्माच तेस्नी मियायेल माहिती मॅजमकलॅटर्नन्या मदतवरी देव्हाले सुरवात करी. मजार मजार खेतीन प्रदर्शन त्या भरायेत. तठे त्या आप्ला भासन मजार तेस्नी खुबीमा त्या देशभक्तीना डोस शेतकरीस्ले पाजेत नी जागे करेत. ग्यानसागर, जागृती, नी संघटना ह्या तीन काम एकससावा करा करता महाराजस्ले खाशेराव येस्ना पेक्षा कोणी लायक दिसे नही., "शेतकरीस्ना हातजारल्या गोष्टीस्न ग्यान मी तेस्ले देस, तेस्ना हातमजार. जे नही शे ते पाणी पुरावान कार्य आपीन आप्ला हात मजार ल्या" आसा आग्रोव्ह खाशेरावस्नी महाराज येस्ना कडे चालु करा. पावसाया आप्ला देश मजार बिगर भरोसाना शे, तेन्हा मुये पाटबंधारा आखो बाकीन्या सोयीसकरता खाशेराव येस्नी पाठपुरावा चालु ठेवा. ह्या सोयी जास्ती खर्चिक शेत म्हनीसन महाराज येस्नी सुरवात ले जागा जागीवर येहरी खंदी काढ्यात. तेन्हामुये पयसावाला शेतकरीस्ना पेक्षा नादारी ना शेतकरीस्ले तेन्हा जास्ती फायदा झाया. त्यामुये पुनर्वसनन कठीण प्रश्न सुरवातले निर्माण झाय नही. शेतकरीस्ले आर्थिक मदत करासाठे सहकारी पतपेढीस्नी सुरवात आपीन कराले जोयजे, आस खाशेराव येस्नी महाराजस्ले सुचाड, तव्हय महाराज येस्नी तेस्ले इसारा दिन्हा, "गो स्लो, म्हणजे धीरे धीरे करुत, नही ते ह्या योजना इंग्रजस्ना डोयामा खुपतीन.

             बडोदा राज्य मजार खेतीन उत्पादन वाढाले लागी गये. औद्योगिक येवहार वाढणा. पण आमदाबाद, सुरत, नी भडोच ह्या यापरी केंद्र आपीन जर बडोदाना संगे नही जोडात ते आप्ला माल तसाच पडीन नी तेन्हा मुये आप्ला लोक निरव्हस व्हतीन, आसी भिती महाराजास्ना अधिकारीस्ले वाटणी. बडोदा राज्यानी जमीन नरम नी भुसभुशीत शे. तेन्हामुये पक्का रस्ता बांधन खर्चान काम व्हत. नी तसा रस्ता जास्ती वरीस टीकतस नही. कारण बी तस व्हत ६० टक्का खर्च बांधकाम मजार खर्च व्हयेत, नी बाकीनी रक्कम अधिकारीस्ना डाचामा जाये. म्हणीसन महाराजस्नी आप्ला राज्या मजार रेल्वाई न जाय वाढावाले सुरवात कयी. रेल्वाई मुये दयन वयन जल्दी व्हस नी गयर प्रमाण मजार व्हस. तेस्ना ह्या निर्णयमुये झटपट लखपती व्हता यीन आसा बांधकाम खाताना आधिकारी नरवस व्हयनात.

           १९०२ मजार आमदाबादले काॅंग्रेसन अधिवेसन भरेल व्हत. तठल शेती प्रदर्शन महाराजस्नी कये. त्या प्रसंगले शेती येवसायना बाबत महाराज बोलणात, "आप्ला देश खेती नी उद्योग मजार मांगे राव्हान कारण म्हणजे सिक्सन ना कडे दुर्लक्ष करेल हायीच शे. येन्हा उलट युरोप मजार सिक्सन ना उपयोग  बठ्ठी कडे जीवन नी दयन वयन कडे ध्यान ठीसन करेल शे. आप्ली खेती मजार चांगल, नी जास्ती उत्पन्न येव्हा करता शेती सुधारणा करानी गरज शे. बीट पासुन साखर कराना उद्योग, नी कपाशी न्या जातीस्नी जी सुधारणा झायी ती एक रासायनिक क्रिया परिणाम शे. उस, कापूस हायी आप्ला देश न मुख्य उत्पन्न शे. युरोप मजार बीट ना कंदमुया सावधहुयीसन निवाडाना, तेन्हा मजार शेतकीन. रसायनशास्त्राना उपयोग करीसन धीरे धीरे साखर उद्योग वाढावा. हिंदी साख उद्योगस्ना करता हाऊ शे की, आप्ला स्पर्धकस्नी युक्ती उसनी लेवान करता लाजो नही. नी चांगला उस तयार करानी गरज शे. तसज देशी कपाशी मजार सुधारणा करी तव्हयज आपीन स्पर्धा मजार टीकसुत. आपण तस करसुत आस माल्हे वाटस. पण तेन्हा करता कायजी करीसन शोध लावानी गरज शे. जव्हय कपाशी नी चांगली जात झामली काढसुत तव्हयज शेतकरी चांगल उत्पन्न लीन.

              "शास्त्राफाईन आप्ले चांगला फायदा शे. शास्त्र आप्ले मदत करीनच, पण तेन्हा करता शेतकरीस्न मजारला अज्ञान पणा, नी आयसीपना जाव्हानी गरज शे, ते कठीण काम पयले करन पडीन. आते लढाया कमी व्हयेल मुये शिपाई लोक बी खेती कराले लागेल शेत. तेन्हामुये खेती वर जास्ती लोकस्न जीवन आवलंबेल शे. तेस्नी खेती करानी रीत मागासेल शे, आवजार जुनी नी परंपरागत शेत, बठ्ठासम्हा कमतरता म्हणजे नादारी शे. दुस्काय पडना ते सोतान पोट भरान येस्ले मुश्कील व्हस. ह्या गेष्टीसवर ध्यान देवानी गरज शे. जमीन हायी निकस व्हयी ह्रायन्ही हायी एक गयरी चिंता ना इषय शे.

             "शेती सुधाराना दोन उपाय शेत. पयले शेतीनी रीत नी आवजार सुधारानी गरज शे आणि दुसरा उपाय म्हणजे सिक्सन परसार. सरकारनी दुसरी एक गोट कडे ध्यान देल शे. नी प्रश्न शे ढोरढाकर वाढावाना. तरी बी परिणाम आजुन बी पायजे तसा आशादायक नही शे,पण जदलगुन. लोकस्नी साथ मियाव नही तदलगुन तेन्हा परिणाम वाया जातीन. येन्हा बाबत आजुन गयर करासारख शे आस माल्हे वाटस. बठ्ठ्या गोष्टी सरकार आवलंबा पेक्षा लोकस्नी येरमेरले मदत कराले जोयजे. खेती ना बांधसवर नी आजुबाजुले झाड लावान, उपयोगी रोपवाटिका तयार करान, चांगला बीयबीयावन तयार करान, ह्या काम येरायेरनी मदत लीसन करा सारख शे.

             "खेती पावसायान पाणीवरज आवलंबेल ह्रास. येन्हा करता शेतकीन्या परतेक सुधारणामजार पाटबंधारा मुख्य मानाले जोयजे. सम्राट अशोक पासुन येहरी, नी तलाव बांधान काम राजान एक कर्तव्य व्हत. मुसलमानी राजधान्यास्ना नजीक दिसी येनाय्रा गयय्रा जुन्या येहरी आणि मद्रास इलाखाम्हायीन दिसी येणारा धरण ह्या तव्हयस्नी एक करतबगारीन उदाहरण शे. येहरी खंदामुये दुस्कायना येले देश न राखण व्हवासारखश शे. मन्हा राज्या मजार ह्या कामकरता देल तगावी हुशार अंमलदारस्ना देखरेखखाल चांगला फायदा करी ह्रायन्हा. जुना तलाव दुरुस्ती, नी पाणी साठायी ठेवाना दुसरा काम सुरू करानी बठ्ठी येवस्था करेल शे. 

           पावसाया मुये धूप व्हयेल काही जमिनीस्ले कृत्रिम खतस्नी गयरी गरज शे. शेतकीवालास्नी ध्यानमा ठेवा सारखी गोट म्हणजे खोल मुयीना गवतस्नी गरज शे, जे दुस्काय मजार तग धरस. नी ढोरढाकरस्नी उपासमार कमी व्हस. येन्हा बाबत आपीन आष्ट्रेलीयान आनुकरण कराले जोयजे. खेतीना धंदा मजार नयानया प्रयोग करणारा साहसी, शिकेल सवरेल नी चतुर लोकस्नी मव्हरे येव्हाले जोयजे. येन्हा शिवाय शेतकरी घर बशीसन काही धंदा करु शकतीन, तेन्ही गयरी गरज शे लाकूडवर कोरीव काम, चह्राट, भरतकाम, चितरंग ह्या काम शेतीना मोसम सरानंतर सवय भेटीन त्या दिनमजार, खासकरीसन बाया करु शकतीन. "आस शेती, शेती संबंधी उद्योग येवसायन मार्गदर्शन महाराजस्नी कय. 

            सन १९०० मजार बठ्ठा पावसाया कोल्ला पडना. आक्टोबर लगुन ते दुस्काय न्या झया वाढण्यात. हजार गणती लोक, ढोरपोर उपासमारी नी मराले लागी गयात. बठ्ठा देश मजार दुस्कायनी झय पसरनी. ह्या संकटनी जाणीव व्हताच बडोदा सरकारनी दुस्काय निवारण करानी तयारी चालु करी. परिस्थिती नी देखरेख करीसन महाराजस्नी आधिकारीस्ना संगे दुस्कायना भाग मजार दौरा सुरू कया. निराधार लोकस्ले रोख रक्कम, धान्य, नी बाकीना लोकस्ले तगावीना स्वरुप मजार मदत करा करता आधिकारीस्ले तातडीना हुकुम दिना. महाराजस्नी दुस्कायनी झय इषयी आप्ली रोज लिखानी वही मजार लिख, "डभोई स्टेशन ना बाहेर पडावर जो देखावा मी दखा, तेन्ही नुस्ती याद उन्ही तरी मन्हा आंग वर काटा उभा ह्रातस. कडक ऊन पडेल व्हत, बठ्ठा कडे भयाण शांतता पसरेल व्हती. वारानी झुळुक बी ये नही. दुर लगुन नजर फिरायी तरी कोठेबी एकबी गवत नी काडी, नी झाडस्ले पान दिखन नही. निय्य नी इशाल आभाय मजार एक बी घार उडतांना, नही ते फयफयतांना दिसनी नही. सयर मजार माणस्नी गजबज नही व्हती. जमीन सुय्राना उनमुये भुंजायी जायेल व्हती. एक आनाथगृहमजार गवु, तठे दोनेकशे पोर नी बाया व्हत्यात. तेस्ना हाडस्ना पिंजरा बनेल व्हता. कातडी चिटकी जायेल व्हती. डोया खोल जायेल व्हतात. देव करो नी आसा बाका प्रसंग वापस दखाले नही मियो. 

           मंग महाराज सुरतथाईन सोनगडकडे  जाव्हा करता रेल्वाईनी निंघनात. गाडी जोरमा सुटनी. खिडकीम्हायीन महाराजस्नी जे भयाण दुस्कायन चितरंग दख, ते दखीसन त्या अस्वस्थ व्हयनात. खंगरेल ढोरढाकर, तेन्हाबी पेक्षा वाईट अवस्था ढोरक्यास्नी दखी, नी त्या इचार करता करता तेस्न मन भुतकाय मजार गये. नी १८७२ - ७३ ना दुस्कायनी तेस्ले याद उन्ही. त्या येले त्या आप्ला जन्म गावले कवळाणाले व्हतात. ढोर समयान काम त्या करेत, जंगल मजार चारा नही व्हता. जेठ, आखाड नी सावन महिना बी कोल्ला जायेल व्हता. लोक हादरी जायेल व्हतात. वरुणदेवनी करुणा कराकरता रातना येले गावस्मजारला धाकला मोठा बाया माणस चौक मजार जमा व्हयेत. कडुनिंबन्या डसका डोकाले नी कंमरले बांधीसन एकले मस्त सजाडेत तोच धोंड्या वरुण देवन रूप ह्राहे. तेन्हा आंगवर पाणी टाकेत नी गाण म्हणेत.... 

        धोंड्या धोंड्या पाणी दे 

        साय माय पिकू दे //

बठ्ठाजन नाचत कुदत गल्लीम्हायीन जायेत. आभाय मजार एक बी ढग नही व्हता. चांदण्या पडेल व्हत्यात. वारा बी शांत व्हता. दफडा ना तालवर बठ्ठाजन तयमय करीसन गाण म्हणेत... 

             हाय हाय रे दयाळा 

              हाय हाय रे दयाळा 

              कशा कया रे उन्हाळा 

              कशा कया रे उन्हाळा 

              गायी म्हशीस्ना आरंताळा

              हाय हाय रे दयाळा 

      .        हाय हाय रे दयाळा 

               कशा कया रे उन्हाळा.. 

तेवढाम्हा गाडी धाड धाड करत सोनगड स्टेशन मजार घुस्नी नी महाराजस्नी तंद्री भंगणी. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...