*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*
*भाग.. ३०*
जोतिबास्नी करेल कवतीक मुये महाराजस्ले गयरी स्फूर्ती मियनी. नया जोम मजार कामले लागणात. खाशेराव जाधव येस्ले १८९९ ले इदेशले धाडीसन तठे खेती ना क्षेत्रा मजार व्हयेल नवीन सुधारणांस्ना अभ्यास करी लिन्हा.
खाशेराव म्हणजे मुर्तीमंत उत्साह! परत बडोदाले य्व्हावर तेस्नी बठ्ठी कडे दौरा चालु करीसन शेतकरीस्ले तेस्ना गावखेडास्माच तेस्नी मियायेल माहिती मॅजमकलॅटर्नन्या मदतवरी देव्हाले सुरवात करी. मजार मजार खेतीन प्रदर्शन त्या भरायेत. तठे त्या आप्ला भासन मजार तेस्नी खुबीमा त्या देशभक्तीना डोस शेतकरीस्ले पाजेत नी जागे करेत. ग्यानसागर, जागृती, नी संघटना ह्या तीन काम एकससावा करा करता महाराजस्ले खाशेराव येस्ना पेक्षा कोणी लायक दिसे नही., "शेतकरीस्ना हातजारल्या गोष्टीस्न ग्यान मी तेस्ले देस, तेस्ना हातमजार. जे नही शे ते पाणी पुरावान कार्य आपीन आप्ला हात मजार ल्या" आसा आग्रोव्ह खाशेरावस्नी महाराज येस्ना कडे चालु करा. पावसाया आप्ला देश मजार बिगर भरोसाना शे, तेन्हा मुये पाटबंधारा आखो बाकीन्या सोयीसकरता खाशेराव येस्नी पाठपुरावा चालु ठेवा. ह्या सोयी जास्ती खर्चिक शेत म्हनीसन महाराज येस्नी सुरवात ले जागा जागीवर येहरी खंदी काढ्यात. तेन्हामुये पयसावाला शेतकरीस्ना पेक्षा नादारी ना शेतकरीस्ले तेन्हा जास्ती फायदा झाया. त्यामुये पुनर्वसनन कठीण प्रश्न सुरवातले निर्माण झाय नही. शेतकरीस्ले आर्थिक मदत करासाठे सहकारी पतपेढीस्नी सुरवात आपीन कराले जोयजे, आस खाशेराव येस्नी महाराजस्ले सुचाड, तव्हय महाराज येस्नी तेस्ले इसारा दिन्हा, "गो स्लो, म्हणजे धीरे धीरे करुत, नही ते ह्या योजना इंग्रजस्ना डोयामा खुपतीन.
बडोदा राज्य मजार खेतीन उत्पादन वाढाले लागी गये. औद्योगिक येवहार वाढणा. पण आमदाबाद, सुरत, नी भडोच ह्या यापरी केंद्र आपीन जर बडोदाना संगे नही जोडात ते आप्ला माल तसाच पडीन नी तेन्हा मुये आप्ला लोक निरव्हस व्हतीन, आसी भिती महाराजास्ना अधिकारीस्ले वाटणी. बडोदा राज्यानी जमीन नरम नी भुसभुशीत शे. तेन्हामुये पक्का रस्ता बांधन खर्चान काम व्हत. नी तसा रस्ता जास्ती वरीस टीकतस नही. कारण बी तस व्हत ६० टक्का खर्च बांधकाम मजार खर्च व्हयेत, नी बाकीनी रक्कम अधिकारीस्ना डाचामा जाये. म्हणीसन महाराजस्नी आप्ला राज्या मजार रेल्वाई न जाय वाढावाले सुरवात कयी. रेल्वाई मुये दयन वयन जल्दी व्हस नी गयर प्रमाण मजार व्हस. तेस्ना ह्या निर्णयमुये झटपट लखपती व्हता यीन आसा बांधकाम खाताना आधिकारी नरवस व्हयनात.
१९०२ मजार आमदाबादले काॅंग्रेसन अधिवेसन भरेल व्हत. तठल शेती प्रदर्शन महाराजस्नी कये. त्या प्रसंगले शेती येवसायना बाबत महाराज बोलणात, "आप्ला देश खेती नी उद्योग मजार मांगे राव्हान कारण म्हणजे सिक्सन ना कडे दुर्लक्ष करेल हायीच शे. येन्हा उलट युरोप मजार सिक्सन ना उपयोग बठ्ठी कडे जीवन नी दयन वयन कडे ध्यान ठीसन करेल शे. आप्ली खेती मजार चांगल, नी जास्ती उत्पन्न येव्हा करता शेती सुधारणा करानी गरज शे. बीट पासुन साखर कराना उद्योग, नी कपाशी न्या जातीस्नी जी सुधारणा झायी ती एक रासायनिक क्रिया परिणाम शे. उस, कापूस हायी आप्ला देश न मुख्य उत्पन्न शे. युरोप मजार बीट ना कंदमुया सावधहुयीसन निवाडाना, तेन्हा मजार शेतकीन. रसायनशास्त्राना उपयोग करीसन धीरे धीरे साखर उद्योग वाढावा. हिंदी साख उद्योगस्ना करता हाऊ शे की, आप्ला स्पर्धकस्नी युक्ती उसनी लेवान करता लाजो नही. नी चांगला उस तयार करानी गरज शे. तसज देशी कपाशी मजार सुधारणा करी तव्हयज आपीन स्पर्धा मजार टीकसुत. आपण तस करसुत आस माल्हे वाटस. पण तेन्हा करता कायजी करीसन शोध लावानी गरज शे. जव्हय कपाशी नी चांगली जात झामली काढसुत तव्हयज शेतकरी चांगल उत्पन्न लीन.
"शास्त्राफाईन आप्ले चांगला फायदा शे. शास्त्र आप्ले मदत करीनच, पण तेन्हा करता शेतकरीस्न मजारला अज्ञान पणा, नी आयसीपना जाव्हानी गरज शे, ते कठीण काम पयले करन पडीन. आते लढाया कमी व्हयेल मुये शिपाई लोक बी खेती कराले लागेल शेत. तेन्हामुये खेती वर जास्ती लोकस्न जीवन आवलंबेल शे. तेस्नी खेती करानी रीत मागासेल शे, आवजार जुनी नी परंपरागत शेत, बठ्ठासम्हा कमतरता म्हणजे नादारी शे. दुस्काय पडना ते सोतान पोट भरान येस्ले मुश्कील व्हस. ह्या गेष्टीसवर ध्यान देवानी गरज शे. जमीन हायी निकस व्हयी ह्रायन्ही हायी एक गयरी चिंता ना इषय शे.
"शेती सुधाराना दोन उपाय शेत. पयले शेतीनी रीत नी आवजार सुधारानी गरज शे आणि दुसरा उपाय म्हणजे सिक्सन परसार. सरकारनी दुसरी एक गोट कडे ध्यान देल शे. नी प्रश्न शे ढोरढाकर वाढावाना. तरी बी परिणाम आजुन बी पायजे तसा आशादायक नही शे,पण जदलगुन. लोकस्नी साथ मियाव नही तदलगुन तेन्हा परिणाम वाया जातीन. येन्हा बाबत आजुन गयर करासारख शे आस माल्हे वाटस. बठ्ठ्या गोष्टी सरकार आवलंबा पेक्षा लोकस्नी येरमेरले मदत कराले जोयजे. खेती ना बांधसवर नी आजुबाजुले झाड लावान, उपयोगी रोपवाटिका तयार करान, चांगला बीयबीयावन तयार करान, ह्या काम येरायेरनी मदत लीसन करा सारख शे.
"खेती पावसायान पाणीवरज आवलंबेल ह्रास. येन्हा करता शेतकीन्या परतेक सुधारणामजार पाटबंधारा मुख्य मानाले जोयजे. सम्राट अशोक पासुन येहरी, नी तलाव बांधान काम राजान एक कर्तव्य व्हत. मुसलमानी राजधान्यास्ना नजीक दिसी येनाय्रा गयय्रा जुन्या येहरी आणि मद्रास इलाखाम्हायीन दिसी येणारा धरण ह्या तव्हयस्नी एक करतबगारीन उदाहरण शे. येहरी खंदामुये दुस्कायना येले देश न राखण व्हवासारखश शे. मन्हा राज्या मजार ह्या कामकरता देल तगावी हुशार अंमलदारस्ना देखरेखखाल चांगला फायदा करी ह्रायन्हा. जुना तलाव दुरुस्ती, नी पाणी साठायी ठेवाना दुसरा काम सुरू करानी बठ्ठी येवस्था करेल शे.
पावसाया मुये धूप व्हयेल काही जमिनीस्ले कृत्रिम खतस्नी गयरी गरज शे. शेतकीवालास्नी ध्यानमा ठेवा सारखी गोट म्हणजे खोल मुयीना गवतस्नी गरज शे, जे दुस्काय मजार तग धरस. नी ढोरढाकरस्नी उपासमार कमी व्हस. येन्हा बाबत आपीन आष्ट्रेलीयान आनुकरण कराले जोयजे. खेतीना धंदा मजार नयानया प्रयोग करणारा साहसी, शिकेल सवरेल नी चतुर लोकस्नी मव्हरे येव्हाले जोयजे. येन्हा शिवाय शेतकरी घर बशीसन काही धंदा करु शकतीन, तेन्ही गयरी गरज शे लाकूडवर कोरीव काम, चह्राट, भरतकाम, चितरंग ह्या काम शेतीना मोसम सरानंतर सवय भेटीन त्या दिनमजार, खासकरीसन बाया करु शकतीन. "आस शेती, शेती संबंधी उद्योग येवसायन मार्गदर्शन महाराजस्नी कय.
सन १९०० मजार बठ्ठा पावसाया कोल्ला पडना. आक्टोबर लगुन ते दुस्काय न्या झया वाढण्यात. हजार गणती लोक, ढोरपोर उपासमारी नी मराले लागी गयात. बठ्ठा देश मजार दुस्कायनी झय पसरनी. ह्या संकटनी जाणीव व्हताच बडोदा सरकारनी दुस्काय निवारण करानी तयारी चालु करी. परिस्थिती नी देखरेख करीसन महाराजस्नी आधिकारीस्ना संगे दुस्कायना भाग मजार दौरा सुरू कया. निराधार लोकस्ले रोख रक्कम, धान्य, नी बाकीना लोकस्ले तगावीना स्वरुप मजार मदत करा करता आधिकारीस्ले तातडीना हुकुम दिना. महाराजस्नी दुस्कायनी झय इषयी आप्ली रोज लिखानी वही मजार लिख, "डभोई स्टेशन ना बाहेर पडावर जो देखावा मी दखा, तेन्ही नुस्ती याद उन्ही तरी मन्हा आंग वर काटा उभा ह्रातस. कडक ऊन पडेल व्हत, बठ्ठा कडे भयाण शांतता पसरेल व्हती. वारानी झुळुक बी ये नही. दुर लगुन नजर फिरायी तरी कोठेबी एकबी गवत नी काडी, नी झाडस्ले पान दिखन नही. निय्य नी इशाल आभाय मजार एक बी घार उडतांना, नही ते फयफयतांना दिसनी नही. सयर मजार माणस्नी गजबज नही व्हती. जमीन सुय्राना उनमुये भुंजायी जायेल व्हती. एक आनाथगृहमजार गवु, तठे दोनेकशे पोर नी बाया व्हत्यात. तेस्ना हाडस्ना पिंजरा बनेल व्हता. कातडी चिटकी जायेल व्हती. डोया खोल जायेल व्हतात. देव करो नी आसा बाका प्रसंग वापस दखाले नही मियो.
मंग महाराज सुरतथाईन सोनगडकडे जाव्हा करता रेल्वाईनी निंघनात. गाडी जोरमा सुटनी. खिडकीम्हायीन महाराजस्नी जे भयाण दुस्कायन चितरंग दख, ते दखीसन त्या अस्वस्थ व्हयनात. खंगरेल ढोरढाकर, तेन्हाबी पेक्षा वाईट अवस्था ढोरक्यास्नी दखी, नी त्या इचार करता करता तेस्न मन भुतकाय मजार गये. नी १८७२ - ७३ ना दुस्कायनी तेस्ले याद उन्ही. त्या येले त्या आप्ला जन्म गावले कवळाणाले व्हतात. ढोर समयान काम त्या करेत, जंगल मजार चारा नही व्हता. जेठ, आखाड नी सावन महिना बी कोल्ला जायेल व्हता. लोक हादरी जायेल व्हतात. वरुणदेवनी करुणा कराकरता रातना येले गावस्मजारला धाकला मोठा बाया माणस चौक मजार जमा व्हयेत. कडुनिंबन्या डसका डोकाले नी कंमरले बांधीसन एकले मस्त सजाडेत तोच धोंड्या वरुण देवन रूप ह्राहे. तेन्हा आंगवर पाणी टाकेत नी गाण म्हणेत....
धोंड्या धोंड्या पाणी दे
साय माय पिकू दे //
बठ्ठाजन नाचत कुदत गल्लीम्हायीन जायेत. आभाय मजार एक बी ढग नही व्हता. चांदण्या पडेल व्हत्यात. वारा बी शांत व्हता. दफडा ना तालवर बठ्ठाजन तयमय करीसन गाण म्हणेत...
हाय हाय रे दयाळा
हाय हाय रे दयाळा
कशा कया रे उन्हाळा
कशा कया रे उन्हाळा
गायी म्हशीस्ना आरंताळा
हाय हाय रे दयाळा
. हाय हाय रे दयाळा
कशा कया रे उन्हाळा..
तेवढाम्हा गाडी धाड धाड करत सोनगड स्टेशन मजार घुस्नी नी महाराजस्नी तंद्री भंगणी.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा