*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*
*भाग-३६*
समद्यापरकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्ना मनमजार रुजाले पाहिजेत म्हनीसन लोकसिक्सननी गयरी गरज ह्रास. तेन्हा करता महाराजस्नी आप्ला राज्यामा सिक्सनपरसार नी वाचनालयस्ना गयरा पसारा वाढावा. ज्या समाजसुधारणा स्वतंत्र भारत मजार आजुनबी नही झायात, त्या समाजसुधारणा महाराजस्नी १०० वरीस पयले आप्ला राज्या मजार करेल व्हत्यात. त्या यशस्वीपणे राबाड्यात. जगदुन्यामा आसा सामाजिक क्रांती घडायी आणणारा पहिला राजा म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या शेत. सामाजिक क्रांती हायी राजकीय क्रांती सारखी लगेच घडायी आणता येत नही. समाजना तो प्रगतीना परवास ह्रास. स्वातंत्र्योत्तर कायमजार सामाजिक नी राजकीय चयवय मजार मराठी नेतास्नी जर सजाजीरावस्ले प्रेरणास्थान मानतात ते आज महाराष्ट्राना इतिहास सामाजिक, राजकीय बाबत मजार कवतीक करा सारखा ह्राता. हायी निश्चित.
ह्या उदारमतवादी खान्देशी राजाने आप्ला राज्यामजारला गुजराथी जनताले आप्ल करीसन तेस्ना मजार स्वामिनिष्ठा पयदा करी. तेन्हा बद्दल इतिहासाचार्य राजवाडे महाराजस्न कवतीक करतांना बोलणात, "गुजराथी लोक जिकेल नी मराठी लोक जिकणारा हाऊ भेदभाव मांगला दिडशे वरीस बडोदा मजार जास्ती करीसन भासे. पण हाऊ भेद समदा नायनाट कराकडे महाराजस्नी उत्कट प्रवृत्ती शे. राज्यकारभारना न्यारा न्यारा खातामजार गुजराथीस्नी संख्या वाढतच जायेल शे. इतलज नही, ते लायकीना गुजराथी जर मियना ते तेल्हे मुख्यखाताना मुख्याधिकारी नही ते, परसंगले दिवाणबी व्हयेल शे. हाऊ चमत्कार महाराजस्नी बडोदा मजार घडायी आणा. संस्थानमजारली जनता गुजराथी जरी असनी तरी महाराज साहेब आप्ली जनता नी आपीन एकच शेत ह्या पिरीमभावनामा आणि जिव्हाळा मजारच वागतस. काही काय नंतर ह्या सुधारणास्ना गयरा फायदा व्हयीन. तो आसा की, गुजराथीस्नी व्यापारीवृत्ती मराठीस्मा यीन, नी मराठीस्नी झुंजारवृत्ती गुजराथीस्मा यीन. सारांश, सुयत्रंना, सुव्यवस्था, समदृष्टी, नी न्यायप्रियता ह्या गुण सयाजीराव महाराजस्मा दिसतस., "
जातपातना इरुध्द महाराजस्ना इचार कितला प्रगल्भ व्हतात नी आचार कसा निरमय व्हतात हायी श्रीपाद जोशी येस्नी 'तरुण भारत' मजार प्रकरणे मांडेल शेत. त्या म्हणतस," चातुर्वर्णास्मा उतरंडीमा बामणस्ले जे बठ्ठास्मा उच्च स्थान देल शे,ते गयरच तकलादू नी पोकय, फसव ह्राहीसनबी बामण समाज त्या बेगडी मोठपणवर खुष हुयीसन ह्राहेल शे आणि इमाने - इतबारे बाकीना समाजस्नी सेवा करत ह्रायन्हा. या वस्तुस्थितीनी कल्पना बडोदाना राजा सयाजीराव महाजस्ले असीन. म्हणीसन तेस्नी कोणतीबी जातना इरुध्द तक्रार न करता बठ्ठा समाजना उत्थाननाकरता बठ्ठ्या जातीजमातीस्नी मदत लिन्ही. तेस्ना त्याग, सेवाभावना, सामाजिक बांधिलकी ह्या बठ्ठ्याज गोष्टी इतल्या अदभुत नी आदरणीय व्हत्यात की, तेस्ना कडे बठ्ठास्नी तयमयमा दख. आमुक एक जातना, भाषाना त्या पुढारी शेत, आस तेस्ना गुजराथी जनताले कव्हयज वाटन नही. पण तेस्ना मनना तो मोठेपणा, तेस्नी दृष्टीनी विशालता आम्ले पेलावनी नही, आणि त्या दुर्लक्षित नी आनुल्लेखित ह्रायन्हात. "
पिडित, दलित आणि उपेक्षितस्नी मुक्तीनी नी प्रगतीनी महाराजस्नी तयमय फक्त संत ज्ञानदेवयेस्ना सब्दस्माज सांगता यीन.
दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्म सुर्य पाहो/
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात//
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा